Tuesday, August 8, 2017

सुजाण पालकत्व २०१७-१८

पालकवर्ग : इयत्ता ८ वी

वयात येणा-या मुलांच्या रोजच्या वागण्या-बोलण्यात होणारे बदल, आक्रमक वृती, बंडखोरपणा यामुळे पालक थोडे संभ्रमावस्थेत असतात. अशावेळी मुलांशी असलेले आपले मायेचे नाते जपण्याविषयी, एकमेकांना समजून घेण्याविषयी पालकांना मार्गदर्शन केले तर मुलांची जडणघड्ण योग्य प्रकारे होईलच, त्याबरोबर कुटुंबाचे स्वास्थ्यही टिकून राहील या हेतूने दहिसर येथील विदया प्रसारक मंडळ पालकांना मार्गदर्शन करणारा 'सुजाण पालकत्व' हा उपक्रम गेली १५ वर्षे यशस्वीपणे राबवीत आहे. कै. विजय ठाकूर स्मृतिनिधीद्वारे ह्या उपक्रमाला अर्थसाहाय्य करण्यात येते.

मानसोपचार क्षेत्रामध्ये देशभरात तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्यातनाम असलेले डॉ. हरीश शेट्टी यानी यावर्षी इयत्ता ८ वी च्या मुलांच्या पालकांशी संवाद साधून फार मोलाचे मार्गदर्शन केले. मुलांच्या वर्तणुकीतील समस्या, व्यसनाधीनता यासारख्या गंभीर विषयांवर हसत खेळत संवाद साधल्याने पालकांच्या मनावरील ताणही काहींसा हलका झाला, निश्चितच!

काही क्षणचित्रे....

डॉ. सौ.वसुंधरा नाटेकर

(प्रकल्प समन्वयक)

DSC_7597

DSC_7602

DSC_7641

DSC_7624

No comments: