किती शांत वाटतय इथे.
आई, मी तरंगतॊय, बागडतो, नाचतोय तुझ्या सहवासात.
मी इथे खुप खूष आहे, आनंदात आहे.
एक सांगू, रागाऊ नकॊस हं!
मला इथेच रहायचय, बाहेर नाही यायचयं...............
मी एकलय, बाहेर धर्म नावाचा प्रकार आहे.
*आता मी एक छोटासा जीव आहे पण जन्म घेताच हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन यात माझी विभागणी केली जाईल.
मला स्वत:ला नाही विभागायचयं
मला इथेच रहायचय, बाहेर नाही यायचयं...............
* बाहेर दहशतवाद, आतंकवाद खुप वाढलाय असं मी एकलय.
निर्दोशांना मारलं जातय, गोळ्या झाडल्या जातायत.
मला रक्ताच्या थारोळ्यात नाही पडायचयं
मला इथेच रहायचय, बाहेर नाही यायचयं...............
*स्वाइनफ्लू, इबोला, झिका अश्या काहितरी कठिण नावाचे रोग येऊ लागलेत.
जगात ब-याच लोकांनी त्यामुळे आपले जीव गमावलेत.
तुझ्या गर्भात असताना मला ही कुठलीच बाधा होणार नाही.
कारण मला माहीतीय तु मला या सर्वांपासून सुरक्षित ठेवशील.
म्हणूनच मला इथे रहायचय, बाहेर नाही यायचयं...............
* मी एकलय बाहेरच्या जगात सगळेच शर्यतीच्या घोड्यासारखे पळतात.
काही घोडे अंतिम रेषेपर्यंत पोहोचतात तर काही घोडे यशाच्या शोधात आयुष्यभर पळतच रहातात.
अगं मला तर अजुन चालताही येत नाही आणि या शर्यतीत उतरायची माझी ईच्छा ही नाही.
माझ्या या छोट्याश्या भावविश्वात तरंगायलाच मला आवडतय.
ए आई, मला इथे रहायचय, बाहेर नाही यायचयं...............
* ९०%, ९५% या चक्रव्युहात मला नाही फसायचयं
मला बाहेर नाही यायचयं...............
* गाड्यांच्या धुरात, ट्रेनच्या गर्दीत नाही अड्कायचयं
मला बाहेर नाही यायचयं...............
* आई तुझ्या कुशीतच मला वाढायचयं
मला बाहेर नाही यायचयं...............
मोठं झाल्यावर नोकरीसाठी वणवण करत नाही भटकायचयं
मला बाहेर नाही यायचयं...............
एक मिनीट, एक मिनीट..........................
मी एक गोष्ट विसरतोय..............
तु, बाबा, आजी, आजोबा सगळेच माझ्या येण्याची किती आतुरतेने वाट पाहताय आणि तुम्ही सगळे आहातच मला सांभाळायला, मग चिंता कसली.
या जगात येऊन मला ही नाव कमवायचय, तुमच नाव मोठ करायचयं.
छत्रपती शिवाजी व्हायचयं, ए.पी.जे अब्दूल कलाम व्हायचयं, आर्यभट्ट, राजा अशोक व्हायचयं.
यातलं काही होता नाही आलं तरी चालेल पण निदान एक चांगल माणूस तरी व्हायचयं.
आई, मला बाहेरच्या जगात यायचयं
मला बाहेरच्या जगात यायचयं
- सौ. नेहांकी परितॊष संखे
Assistant Teacher, English Primary Section
2 comments:
Khup chaan lihile aahe. :-)👍
ऩेहांकी मँडम,खूप छान|
Post a Comment