Monday, September 18, 2023

विद्या प्रसारक मंडळ - ग्रंथालय व अभ्यासिका वैशिष्ट्यपूर्ण माहिती

 

वैविध्यपूर्ण - वैशिष्ट्यपूर्ण माहितीची दुनिया वि.प्र.मं.चे ग्रंथालय

शाळेच्या पहिल्या मजल्यावर असलेले वि.प्र.मं.चे ग्रंथालय म्हणजे ज्ञानाचे भांडारच.

 ग्रंथालयाची वेळ : - सकाळी ७.०० ते  संध्याकाळी  ७.००१)  ग्रंथालय सभासद :-

·       विद्यार्थी                                                

·       शिक्षक

·       शिक्षकेतर कर्मचारी

·       व्यवस्थापकीय सदस्य

·       माजी विद्यार्थी

·       सर्वसाधारण सभासद 

·       पालक

२)  पुस्तक देवाण  घेवाण :- एकाच वेळी  २ पुस्तके  ( एक महिन्याकरिता )  १ मासिक  ( १५ दिवसांसाठी)

३) पुस्तकांची भाषा :-

·       मराठी  साहित्य

·       इंग्रजी साहित्य

·       हिंदी साहित्य

·       संस्कृत साहित्य

४)  साहित्य प्रकार :-   

बालसाहित्य, कथा, कादंबरी , चरित्र , विज्ञान, प्रवासवर्णननाट्यछटा, तत्वज्ञानमानसशास्त्र, कला, संगणक, विश्वकोश, सामान्य विज्ञान, समाजशास्त्र,  विनोदी,  ललित  साहित्य समीक्षा,  इतर शैक्षणिक पुस्तके, प्रकल्प पुस्तके इत्यादी.

 ५) सभासद वर्गणी :-

 * प्रतिवर्षी  सभासदत्व  रक्कम *                                                 

 

रुपये

अनामत 

पालक :-

६००

-

माजी विद्यार्थी  :-

६००

२००

इतर सभासद :-

७००

२००

 ६) पालकांसाठी सवलत योजना  :-

वार्षिक सभासदत्व ( पालक - माजी विदयार्थी  )  ( १ वर्ष ) : ६०० /-

त्रैवार्षिक सभासदत्व (३  वर्षे)   : १५०० /-

सर्वसामान्य सभासदांकरीता ( १वर्ष)  : ७०० /-

त्रैवार्षिक सभासदत्व (३  वर्षे) : १९००/-      

 (माजी विद्यार्थी / सामान्य सभासदांसाठी  अनामत रक्कम  २०० /-  घेतली जाईल.)


                 

७) अतिरिक्त उपक्रम :-

·       वाचन प्रेरणा दिन

·       पुस्तक प्रदर्शन

·       साहित्य सभा

·       स्टेशनरी वितरण

·       दिवाळी अंक योजना

·       अभ्यासिका

·       मागील वर्षीच्या प्रश्न पत्रिका  संच सरावासाठी देणे

·       वर्ग ग्रंथालय

·       भ्रमणध्वनी द्वारे पुस्तक परिचय


 ८) आकडेवारी :-

·       सभासद संख्या  :- ३१४

·       पुस्तक संख्या :- १६,७२२

·       मासिके :- २३

·       वर्तमान पत्रे -  मराठी २,  इंग्रजी १

ग्रंथालयात विद्यार्थ्यासाठी  आसन व्यवस्था :-  २५ टेबल्स , ६० खुर्च्या

९) अभ्यासिका (Study Room)  वेळ  :-  सकाळी ७.००  ते  रात्री  १०.००

अभ्यासिका सभासद  संख्या :-         

पूर्ण दिवस :- ३२,  अर्धा दिवस :- २०

अभ्यासिका आसन व्यवस्था :-         २० टेबल्स , ४० खुर्च्या

१०) ग्रंथालय समिती सदस्य :- अध्यक्षा :- सौ. राजश्री गोसावी

सदस्य :- श्री. अनिल  पेंढारकर,  श्री. मिलिंद पोवळे , सौ. स्मिता विश्वासराव

ग्रंथालय सेवक वर्ग :-   श्रीमती. ललिता पाटील, सौ. पुष्पा पवार, सौ. श्वेता कुलकर्णी, सौ. श्रध्दा  ओंबळेश्री. कल्पेश  सोमणे

संपर्क क्रमांक -             8104012564

*******************

Tuesday, October 11, 2022

सुजाण पालकत्व

   सुजाण पालकत्व - इयत्ता १ ली व 2री


आपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास चांगल्या प्रकारे व्हावा, अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. हा विकास करताना नेमका कोणत्या मार्गाचा वापर करावा, पाल्याच्या समस्या कशाप्रकारे सोडवाव्यात यासाठी आजच्या आधुनिक काळात सुजाण पालकत्व ही निकडीची गरज होत चाललेली आहे.

हाच दृष्टिकोन समोर ठेवून विद्या प्रसारक मंडळातर्फे, विद्यामंदिर मराठी प्राथमिक विभागाने शनिवार दिनांक १७/०९/२०२२ रोजी इयत्ता पहिली व दुसरीच्या पालकांसाठी 'सुजाण पालकत्व' या विषयांतर्गत मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित केले होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मराठी प्राथमिक विभागाच्या शाला समिती अध्यक्षा श्रीमती मेधाविनी कुलकर्णी मॅडम यांनी कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शिका डॉ. श्रद्धा कुलकर्णी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती उमा नाईक मॅडम यांनीही त्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शालेय सहशिक्षिका श्रीमती उज्वला शिंदे यांनी केले. मुंबई विद्यापीठातून बी.ए. एम्. एस्. पदवी प्राप्तकरून बालआरोग्य, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्रातील , प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करून अविरत स्वतःची 
प्रॅक्टिस करत करत समाजसेवेचे ध्येय बाळगून इतरांना मार्गदर्शन करणाऱ्या माजी पालक डॉ श्रद्धा कुलकर्णी मॅडम यांनी पालकांना छान मार्गदर्शन केले. आपला पाल्य भविष्यात एक जबाबदार व्यक्तीव नागरिक व्हावा यासाठी असलेले पालकांचे प्रयत्न म्हणजेच सुजाण पालकत्व, ही संकल्पना सोदाहरण पालकांना समजावून सांगण्यात आली.

आपले मूल जर एक दर्श विद्यार्थी म्हणून घडावा असेज्या पालकांना वाटते, त्या पालकांचे वर्तनही त्यानुसार असावे, असे आवर्जून सांगण्यात आले.मुलांना जर आपल्याला एखाद्या वाईट गोष्टीपासून परावृत्त करायचे असेल त्यांना विरोध न करता त्याचे सर्व दुरुपयोग विद्यार्थ्यांना समजावून सांगणे. गुलांचे वर्तन कुठे खटकत असेल तर पालकांनी त्याचे परीक्षण करून योग्य तो बदल करणे. विदयार्थ्यांच्या वाढीच्या दृष्टीने सकस हाराचे महत्त्व सांगण्यात झाले. विदयार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी त्यांना फक्त अभ्यासात न अडकवता चित्रकला, नृत्य, अभिनय अशा क्षेत्रातही सहभाग घेण्यास प्रोत्साहन दयावे नोकरदार पालकांनी निदान एक तास तरी पाल्याशी संवाद साधण्यासाठी वेळ दयावा, जेणेकरून मूल मोबाइलपासून दूर ठेवता येईल. घरातील आजी आजोबांचा सहवास अधिकाधिक आपल्या पाल्याला मिळेल, अशादृष्टीने पालकांनी प्रयत्न करावेत, असे

वाहनही करण्यात आले.

कार्यक्रमाच्या शेवटी काही पालकांनी विदयार्थ्यांशी संबंधित समस्यात्मक प्रश्न विचारले. त्यांच्या शंकेचे निरसन करण्यात ले. या कार्यक्रमाला पालकांचा उत्सफूर्त प्रतिसाद लाभला. अशाप्रकारचा उपक्रम शाळेने पालकांसाठी राबवला, यासाठी काही पालकांनी शाळेचे आभार मानले.

शैक्षणिक सहल


शैक्षणिक सहल - नेहरू तारांगण, वरळी( .३रीव४थी)

  वि. प्र मंडळाच्या विद्यामंदिर, मराठी प्राथमिक विभागातर्फे बुधवार दि.१४/०९/२०२२ रोजी इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांची  शैक्षणिक सहल नेहरू तारांगण, वरळी येथे आयोजित करण्यात आली होती. १३० विद्यार्थी व मुख्याध्यापिका श्रीमती उमा नाईक मॅडम, प्राथमिक विभागाच्या सर्व शिक्षिका व शिपाई यासर्वांचा या शैक्षणिक सहलीत समावेश होता.

      नियोजनानुसार बुधवारी सकाळी ८.30 वाजता, तीन बसेस मुंबईच्या दिशेने  मार्गस्थ झाल्या.मुंबईतली वाहतूक, कामासाठी निघालेल्या लोकांची लगबग, रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या इमारती, वस्त्या, विविध मॉल, दुकाने, मेट्रोची कामे किंवा चालत्या मेट्रो ट्रेन, रेल्वे, वांद्रे ते वरळी सी लिंक, अरबी समुद्रातील उसळणाऱ्या, पावसाळी वातावरणामुळे ऊन पावसाचा खेळ या साऱ्या गोष्टी अनुभवत नेहरू तारांगण  येथे पोहोचलो. नेहरू सेंटरची गोल इमारत आणि पुढे गेल्यावर तारांगणाचा गोल घुमट यांनी विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेतले.

         नेहरू सेंटरमधील आदिमानवापासूनचा इतिहास, भारतीय संस्कृती याबदलच्या प्रतिकृती पाहिल्यानंतर दुपारी जेवण केले. त्यानंतर प्रत्यक्ष नेहरू तारांगण येथे गेलो सूर्याभोवती फिरणारे ग्रह, त्यांच्या भोवती फिरणारे उपग्रह, मंगळाच्या पृष्ठभागावरील दृश्य, चांद्रदेखावा , वेगवेगळ्या ग्रहांवर तुमचे वजन किती असेले हे दाखवणारे वजनकाटे यांच्यामुळे मुलांची जिज्ञासा अधिक जागृत झाली. नेहरू तारांगणात तुम्ही काय पहाल? कसे पहावे? याबद्दल तेथील एका अधिकाऱ्यांनी सहज सोप्या भाषेत व अतिशय आत्मीयतेने माहिती दिली.

पृष्ठभागावरील दृश्य, चांद्रदेखावा, वेगवेगळ्या ग्रहांवर तुमचे वजन किती असेले हे दाखवणारे वजनकाटे यांच्यामुळे मुलांची जिज्ञासा अधिक जागृत झाली. नेहरू तारांगणात तुम्ही काय पहाल ? कसे पहावे ? याबद्दल तेथील एका अधिकाऱ्यांनी सहज सोप्या भाषेत व अतिशय आत्मीयतेने माहिती दिली.
नेहरू तारांगणात भर दुपारी रात्रीचे आकाशदर्शन घडवण्यात आले. सर्व ग्रहांची स्थाने, उल्का वर्षाव, धुमकेतू, नक्षत्र याबददल विदयार्थ्यांना सहज सोप्या भाषेत समजावले. विदयार्थ्यांना या निमित्ताने आकाश निरीक्षणाची संधी मिळाली.यानंतर सायंकाळी ४.30 वाजता शाळेच्या प्रांगणात परत आलो. ही शैक्षणिक सहल विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय राहील यात तीळमात्र शंका नाही. या सहलीचे आयोजन करणाऱ्या मा. मुख्याध्यापिका उमा नाईक मॅडम व सदैव प्रोत्साहित करणारे कार्यकारी मंडळ यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले.

मातृदिन

 

मराठी प्राथमिक विभागाच्या अध्यक्षा श्रीमती मेधाविनी कुलकर्णी मॅडम यांच्या मार्गदर्शनाने अत्यंत विलोभनीय असा 'मातृदिन' दि.२६ ऑगस्ट रोजी साजरा करण्यात आला.


श्रावणाची अमावास्या म्हणजे 'पिठोरी अमावास्या'. हा दिवस फार पूर्वीपासून 'मातृदिन' म्हणून साजरा केला जातो. इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांच्या मातांना शाळेत बोलाविण्यात आले.


विद्यार्थ्यांनी आपापल्या आईचे औक्षण केले. 
तसेच आपल्या शिक्षकांचेही औक्षण केले.


मातांनीही
आपल्या पाल्याचे औक्षण करून त्यांना शुभाशीर्वाद दिले. अतिशय भावपूर्ण झालेल्या या कार्यक्रमाची काही क्षणचित्रे...
Wednesday, August 28, 2019

आंतरशालेय समूह गीत गायन स्पर्धा

बृ. म.न.पा. शिक्षण विभाग खाजगी अनुदानित शाळा आर/एन वॉर्ड आयोजित आंतरशालेय समूह गीत गायन स्पर्धा दि.२७/०८/२०१९ रोजी वि. प्र. मं. चे विद्या मंदिर सभागृहात पार पडली. स्पर्धेत आर/एन वॉर्ड मधील ९ शाळांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेस विभाग निरीक्षक श्री. बाळकृष्ण संखे सर (P/N, P/S, R/N,R/S, R/C) यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

विद्या मंदिर मराठी प्राथमिक विभागातील इयत्ता चौथीतील विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन! 

Thursday, August 8, 2019

प्राण्यांशी मैत्री


वि. प्र. चे विद्या मंदिर मराठी प्राथमिक विभाग
दि./०८/१९ रोजी सकाळ आयोजित नागपंचमीच्या निमित्ताने 'साप वाचवा-निसर्ग वाचावा प्राण्यांशी मैत्री' हा कार्यक्रम विद्यामंदिर सभागृहात आयोजित करण्यात आला. कार्यक्रमास प्रख्यात सर्प मित्र प्राध्यापक श्री. सुनिल कदम यांचे मार्गदर्शन लाभले.

     श्री.सुनिल कदम यांनी प्राण्यांचे रक्षण व पर्यावरणाचे रक्षण कसे करावे?याविषयी महत्त्वाच्या बाबी सांगितल्या. विद्यार्थ्यांना सजीवांची निर्मिती ते मानवाची उत्क्रांती कशी झाली?हे अगदी सोप्या भाषेत सांगितले. अजस्त्र महाकाय प्राण्यांचा अंत कसा झाला? ते सांगितले.बेडूक, खेकडा, गोगलगाय यांसारखे उभयचर प्राणी तसेच सरपटणारे प्राणी,पक्षी प्रत्यक्षात दाखवून त्यांची माहिती सांगितली. निसर्गातील प्रत्येक प्राणी, पक्षी,कीटक निसर्गाचा समतोल राखण्यासाठी उपयोगी असतात. हे आमच्या बाळगोपाळांना पटवून दिले.


     श्री.सुनिल कदम सरांचे उपयुक्त मार्गदर्शन शिक्षक व विद्यार्थ्यांना लाभले.