Wednesday, August 2, 2017

माझा भारत काल - आज - आणि उद्या !

Nupur Eknath Shinde - X B- by Nupur Eknath Shinde - X/B


हे राष्ट्र देवतांचे

हे राष्ट्र प्रेषितांचे

आचंद्रसूर्य नांदो

स्वातंत्र्य भारताचे

Dnyaneshwar2हे गाणे ऐकताच आपल्याला आठवतात ते आपले वीर स्वातंत्र्य सैनिक, ज्यांनी आपल्या घराची, आपल्या संसाराची, आणि आपल्या आयुष्याची पर्वा न करता आपले संपूर्ण जीवन देशाला अर्पण केले आणि मग आठवतात ते आपले संतमहात्मे, ज्यांची जीवनकहाणी ऐकल्यावर खरंच प्रश्न पडतो, ‘यांच्या रूपात तो देवच येऊन गेला का?‘

अशा या थोर माणसांनी पवित्र झालेली आहे आपली भारतभूमी . पण हे सगळे येण्याआधी कसा होता आपला भारत? ’सोन्याची चिमणी’ म्हणून ओळखल्या जाणाया या भारताला त्याची किंमत आधी कळलीच नाही. मनाला नेहमी प्रश्न पडतो की का म्हणून त्या मुघलांना आपण आपल्यावर नाही-नाही ते अत्याचार करू दिले? जर त्यावेळी शिवाजी Shivaji_British_Museumमहाराजांसारखे थोर दैवत या भूमीच्या बचावासाठी नसते तर खरंच आपण सुटलो असतो का त्यातून कधी? दीडशे वर्षे ब्रिटीशांचा जुलूम आपण का म्हणून सहन केला? पण मग अचानक लक्षात येते की नाही, तेव्हाचा तो भारत वेगळा होता.

आणि आता? हा आजचा भारत आहे, जिथे लोक दिवस-रात्रीचा विचार न करता आपल्या देशाचे नाव व्हावे, आपला झेंडा देशोदेशी फडकावा म्हणून घाम गाळून एकजुटीने मेहनत करतात. मग ते आपले खेळाडू असोत, वैज्ञानिक असोत की आपल्या देशाचे पंतप्रधान असोत. भारताने, नक्कीच, सर्वतोपरी प्रगती केली आहे. जगातला सगळयात वजनदार उपग्रह हा भारताने जून 2017 मधे अवकाशात पाठवला.

download

एवढेच नाही, तर पाकिस्तानवर केलेला 'Surgical Strike’ हा पुरावा आहे की, भारत आता सहन करणायांतला देश राहिलेला नाही. अर्थातच या सगळयात सिंहाचा वाटा आहे तो आपल्या वैज्ञानिकांचा, ज्यांच्या नवनवीन शोधांमुळे भारताचे अस्त्र-शस्त्र सामर्थ्य मजबूत झाले आहे.

आपले माजी माननीय राष्ट्रपती व थोर वैज्ञानिक, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, हे आता आपल्यात नाहीत, पण त्यांचे जे स्वप्न होते की ’भारत 2020 पर्यंत स्वयंपूर्ण आणि संपन्न देश झालेला असेल’, ते आपल्याला नेहमीच आपल्या कर्तव्यांची आणि जबाबदा-यांची जाणीव करून देत राहील.

Bharat Ratna Dr. A. P. J. Abdul Kalam addressing the 14th Convocation ceremony at IIT Guwahati on  25-05-2012 . Pix By Vikramjit Kakati

भले आपला देश या सगळयांत अव्वल होईल न होईल, कदाचित थोडा अधिक वेळही लागेल या गोष्टीला. पण तो नेहमीच ’माझा’ भारत राहील, आणि नेहमीच ’महान’ राहील.

।। जय हिंद।।


1 comment:

निलेश निमकर said...

खूप छान आहे लेख !!