Thursday, December 11, 2008

स्वातंत्र्य

हीरक महोत्सवी वर्षे (स्वातंत्र्याची 60 वर्षे)
हीरक महोत्सवी वर्षांचे स्वागत आपण सर्वचजण आनंदाने करीत आहोत. तरीसुद्धा स्वातंत्र्याच्या 60 वर्षांत मनाला
अत्यंत व्यथित करणाऱ्या घटनांचा थोडक्यात घेतलेला आढावा

स्वातंत्र्य मिळून
भारताला 60 वर्षे झाली
विविध क्षेत्रात नेत्रदीपक
प्रगतीने भारताने केली
साधन संपत्तीचे केंद्रीकरण झाले
मूठभर लोक गब्बर झाले
सामान्य जनतेवर अन्याय होऊ लागले
हक्कासाठी आपल्या याचना करू लागले
शेतकरी हवालदिल झाले
आत्महत्या करू लागले
कुपोषणाने मुलाबाळांना घेरले
पुढारी जनतेच्या पैशावर
विदेश भ्रमण करू लागले
मस्तीत राहू लागले
सत्तारूढ विरोधी पक्ष
आपापसात भांडू लागले
संधीचा फायदा घेऊन
देशद्रोही बॉम्बस्फोट घडवू लागले
दहशतवादाची टांगती तलवाल घेऊन
चाकरमानी बाहेर पडू लागले
राष्ट्रीय सण नेते बुलेटप्रूफ गाडीतून करू लागले
स्वातंत्र्याचे वारे आज असे वाहू लागले
नि मनात धस्स झाले!
जनता आत बावरलेली आहे
प्रश्न त्यांच्यापुढे एकच आहे
मी स्वतंत्र आहे की आपल्याच माणसांचा गुलाम?
शोकांतिका ही स्वातंत्र्याची आहे.

- श्रीमती नीता न. म्हात्रे
(मराठी माध्यमिक विभाग)

No comments: