Monday, August 8, 2011

सुजाण पालकत्व

विद्यार्थ्यांचा पाया पक्का करणे हे प्रत्येक शा़ळेचे कर्तव्य असते.पालक नोंदणी करताना बालोद्यान शिक्षिका मात्र असे करताना केव़ळ अभ्यासक्रमाच्या माध्यमातूनच नव्हे तर विविध उपक्रमांच्या माध्यमांतून दहिसर विद्यामंदिरने अनेक वर्ष हे कर्तव्य अतिशय उत्तम तऱ्हेने पार पाडलेले आहे. सुजाण पालकत्व हा उपक्रम हा या अनेक उपक्रमांपैकी एक. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत पालक हे आदर्श असतात आणि त्याला तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या दिशादर्शनाची जोड लाभली तर पालक सुजाण व खऱ्या डावीकडून - मुख्याध्यापिका सौ. अमिता पंडित, श्री. अ. रा. पेंढारकर, डॉ. मनोज भाटवडेकर, डॉ. जयश्री देशपांडे, डॉ. वसुंधरा नाटेकरअर्थाने विद्यार्थ्यांचे आदर्श ठरू शकतात आणि हाच उद्देश ठेवून सुजाण पालकत्व उपक्रम यावर्षीही मंडळातर्फे राबवण्यात आला. हा कार्यक्रम कै. विजय ठाकूर स्मृतिनिधीद्वारा प्रायोजित करण्यात आला होता.

रविवार दिनांक 24/07/2011 रोजी नवीन इमारतीच्या सभागृहात Jr.kg/शिशुवर्गात प्रवेश घेतलेल्या आणि Sr.kg./बालवर्गात नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी सुजाण पालकत्व हा उपक्रम आयोजित केला होता. मुलांच्याउपस्थित पालकवर्ग शारीरिक व मानसिक विकास योग्य तऱ्हेने करता यावा यासाठी बालरोगतज्ज्ञ डॉ. सौ. जयश्री देशपांडे आणि मानसोपचारतज्ज्ञ डॉ. श्री. मनोज भाटवडेकर यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान सुजाण पालकत्व या उपक्रमांतर्गत आयोजित केले होते.या उपक्रमाचे हे नववे वर्ष होते.

उपक्रमाची सुरुवातप्रा. सौ. मेधाविनी कुलकर्णी भाषण करताना प्रकल्प समन्वयक सौ. मेधाविनी कुलकर्णी यांच्या प्रास्ताविकाने झाली.  विद्या प्रसारक मंडळाचे सदस्य श्री. पेंढारकर यांनी डॉ. श्री. मनोज भाटवडेकर व डॉ. सौ. जयश्री देशपांडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि मंडळाच्यावतीने आपले मनोगत व्यक्त केले. चांगुलपणावर विश्वास ठेवून आपली मुले चांगली घडवूया. यासाठी सुजाण पालकत्वासारख्या उपक्रमांचा पालकांनी योग्य तो लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. प्रकल्प समन्वयक डॉ.  श्री.  मकरंद नाटेकर यांनी डॉ. श्री. रवींद्र देशपांडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व पाहुण्यांचा थोडक्यातडॉ.  श्री.  मकरंद नाटेकर आणि डॉ. श्री. रवींद्र देशपांडे परिचय करुन दिला. त्यानंतर प्रकल्प समन्वयक डॉ. सौ. वसुंधरा नाटेकर यांनी उपक्रमाची सूत्रे आपल्या हातात घेतली व प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात कार्यक्रमास सुरुवात झाली.

मुले टप्प्याने वाढत असतात. मुलांच्या वाढीतील पहिला टप्पा

"मी" ची सुरुवात इथे होते. मुलांचे भावविश्व रुंदावते.

स्वावलंबनाची बीजं पेरली जातात. शारीरिक वाढ आहार ,व्यायाम ,पुरेशी झोप या गोष्टींची आवश्यकता असते.

वाढ व विकास ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. लहान वयात आपले मूल या विश्वात एकमेव चांगले आहे असा विश्वास दृढ करावा. आपल्या मुलाचे वेगळेपण शोधा. जगाची ओळख पंचेंद्रियांतून होत असते. त्यामुळे पंचेंद्रियांना सतत काहीतरी खाद्य द्यावे जेणे करुन मुलांचा बौध्दिक विकास चांगल्या प्रकारे होईल.

मुलांनी वेळच्यावेळी जेवले पाहिजे. सकाळचे खाणे सकस व जास्त प्रमाणात असावे. रात्रीचे जेवण कमी व झोपेच्या अगोदर दोन तास असावे. भूक व झोप ह्या नैसर्गिक गोष्टी आहेत. बाहेरील टॉनिक देण्यापेक्षा सकस आहार द्यावा. जेवताना मुलांना आमिष दाखवू नये. सकाळी नाश्त्यासाठी इडली- चटणी, भाज्यांचे सूप, पोहे, उपमा, फळ यांसारखे पदार्थ असावेत. बाहेरील खाद्यपदार्थ शक्यतो देऊ नयेत. मुलांना भूक लागत नाही याचे महत्त्वाचे कारण मुलांना जबरदस्तीने खायला देणे. मुलांनी थोड्या थोड्या वेळाने आनंदाने खाल्लं पाहिजे. घरातील इतर मंडळींनी गप्पा मारत सर्व अन्नपदार्थ खाल्ले तर मुलंही त्यांचे अनुकरण करतात.

खेळणे हा व्यायामाचा चांगला नैसर्गिक प्रकार आहे. कमीत कमी अर्धा तास मैदानी खेळ खेळले पाहिजेत. पंधरा ते वीस मिनिटे धावलं पाहिजे. सूर्यनमस्कार वयाच्या आठव्या वर्षापासून शिकले पाहीजे.

शारीरिक वाढ व बौध्दिक वाढ झोपेशी संबंधित आहे. जास्त झोप किंवा कमी झोप या दोघांचेही साइड इफेक्टस होतात. टी.व्ही. मुलांच्या झोपेवर नकळत परिणाम करत असतो. या वयात दृश्य परिणाम अतिशय प्रभावी ठरतात म्हणून झोपायच्या आधी टी.व्ही. बघू नये. झोपताना घरातले वातावरण शांत व प्रसन्न अउपस्थित पालकवर्ग सावे. मंद संगीत लावलेले असावे.  झोपताना मुलांना  सुरक्षित वाटलं पाहिजे.

मुलांना स्वच्छतेच्या सवयी लावल्या पाहिजेत. दररोज आंघोळ केली पाहिजे. सकाळी उठल्यावर व झोपताना दात घासले पाहिजेत. नखे आठवड्यातून एकदा कापली पाहिजेत.

नखे खाणे, अंगठा चोखणे, शर्ट तोंडात घालणे ह्या लहान मुलांच्या वर्तन सवयी आहेत. पालकांनी लहान मुलांच्या कोणत्याही वर्तनाचा बाऊ करु नये. तिकडे दुर्लक्ष करावे. वर्तनमाध्यमातून मुलं पालकांचे लक्ष वेधून घेतात.

मुले आपल्याशी त्यांच्या शब्दात बोलत असतात. मुलांच्या शब्दांच्या मागे त्यांची काय भावना आहे हे समजून घेणे म्हणजे सुसंवाद होय. सुसंवादाची सुरवात ऐकण्यातून होते. आपल मत व्यक्त करण आवश्यक आहे. भीती, राग, आनंद, दु;ख ह्या भावनिक गरजा आहेत. त्यांची नीट हाताळणी व्हायला हवी.

वातावरणात शिस्त असेल तर मुलं शिस्तीत वागतात. शिस्तीमध्ये काय करावे व काय करू नये याचे संकेत ठरवावे.

मुलांना शिक्षा करताना शिक्षा का करतोय ते सांगावे. मुलांना खोट्या घातक धमक्या देऊ नयेत. खोटी आश्वासने देऊ नयेत.

लहान मुलांना वाचनाची आवड लावण्यासाठी प्रथम पालकांनी पुस्तक वाचली पाहिजेत. पुस्तक चि त्ररूप असावीत. चांगल्या पुस्तकांचा संच घरी असावा. मुलांना पुस्तक प्रदर्शनाला घेऊन जावे.

सर्दी , पडसे इत्यादी आजार वारंवार होत डॉ. वसुंधरा नाटेकर आणि डॉ. जयश्री देशपांडे असतील तर आजूबाजूचा परिसर स्वच्छ आहे की  नाही ते पहावे. तसेच मुलाची रोगप्रतिकारशक्ती तपासून पहावी. मुलांच्या वाईट सवयी दूर कराव्यात.

लठ्ठपणा कमी करण्यासाठी मुलांना फास्टफुड, बेकरीचे पदार्थ, तळलेले पदार्थ देऊ नयेत. व्यायामाच्या अभावामुळे लठ्ठपणा वाढतो. 

मुलांना लसीकरणाची अत्यंत आवश्यकता असते.

नैसर्गिक माध्यम ( दगड, माती, पानं, फुलं ) मुलांनी खेळणी म्हणून हाताळावीत. मुलांची सृजनशीलता वाढीस लागेल अशी खेळणी मुलांना द्यावीत. उदा - ठोकळे रचना. खेळणी फार महाग असू नयेत. ख्रेळणी मुलांना सहज हाताळती येतील अशी असावीत. मुलांना मोठा कागद व रंग चित्रकलेसाठी द्यावेत. मुलांना त्यांच्या डॉ. मनोज भाटवडेकर आणि डॉ. वसुंधरा नाटेकर आवडीप्रमाणे चित्र काढू द्यावे.

आपण नोकरी करतो म्ह णून मुलांना पाळणाघरात रहावे लागते याची खंत बाळगू नये व त्याची भरपाई म्हणून मुलांना महागड्या वस्तू देऊ नयेत. मुलांबरोबर जो वेळ पालक व्यतीत करतील तो चांगल्या प्रकारे करावा.

वर्तणूक समस्या - अतिचंचलपणा, एकग्रतेचा अभाव इत्यादी गोष्टींसाठी डॉक्टरी इलाज आवश्यक आहे.

वडीलधाऱ्या माणसांमध्ये सुसंवाद असेल तर त्याचा चांगला परिणाम मुलांवर होतो. तसेच आजुबाजूच्या परिसरातूनही मुलांवर चांगले संस्कार होत असतात. ज्याप्र माणे पालकांचे मेळावे होतात त्याप्रमाणे आजी आजो्नबांचे मेळावे आयोजित करावेत.

सर्व पालकांना जाताजाता दोन्ही डॉक्टरांनी एक संदेश दिला की पालकत्व हे स्वेच्छेने स्वीकारले  आहे तर ते आनंदाने पार पाडा.

बालोद्यान शिक्षिका सौ. सुप्रिया मोरे यांनी सर्वांचे आभार मानले व उपक्रमाचा समारोप करण्यात आला.

एकूण या उपक्रमाचे फलित पाहिल्यास पालकांना स्वत:स व पाल्यास समजून घेण्यास मदत करणारा हा उपक्रम ठरला. पालकांनी ह्या उपक्रमावर अतिशय अनुकूल प्रतिक्रिया दिल्या. विद्यामंदिर परिवारामुळे आपल्याला अतिशय उत्तम मार्गदर्शन मिळू शकले याबद्दल पालक़ांनी आनंद आणि आभार व्यक्त केले. पालक़ांसोबतच मान्यवर मार्गदर्शक डॉ. श्री. मनोज भाटवडेकर व डॉ. सौ. जयश्री देशपांडे यांनीदेखील या उपक्रमाचे कौतुक केले. कारण अभ्यास आणि स्पर्धेच्या चक्रात मुलांचे बालपण हरवले जात असताना त्यासाठी पालकांना सुजाण करणारा हा उपक्रम विरळाच. अशा उपक्रमांना स्थान देणाऱ्या विद्या प्रसारक मंडळाचे त्यांनी आभार मानले. अशा उपक्रमांचे आयोजन करण्याचे बळ यामुळे मिळेल हे नक्की.

शिक्षक प्रतिनिधी

कु.संगिता तांबे.

No comments: