Tuesday, July 26, 2011

कौतुक

दि.03/07/2011  रोजी झालेल्या . 10 वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांच्या कौतुक सोहळ्याच्या  निमित्ताने

- प. चं. राजाध्यक्ष

व्यासपीठावरील मान्यवर, समस्त शिक्षकगण, पालक वर्ग व विद्यार्थी मित्रांनो, विद्या प्रसारक मंडळ संकुलातील मराठी व इंग्रजी माध्यमातील 10 वी च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले आहे, अशा गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करण्याची वि.प्र.मं ची परंपराच आहे. आपलं आजचे यश हे गौरवास्पदच आहे. मराठी माध्यमातील तळागाळातील मुलांना आम्ही मार्गदर्शन करतो त्यांनी आमच्या प्रयत्नांचे चीज केले. आम्ही विविध प्रकारचे उपक्रम राबवितो. आमचे शिक्षकही यात सक्रिय सहभाप. चं. राजाध्यक्षगी झालेले असतात, आपली शाळा फक्त पुस्तकी ज्ञानच देत नाही, तर सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करते. आपले सामान्यांची असामान्य शाळा. आजच्या या यशात विद्यार्थी, पालक, शिक्षक व मंडळ या सर्वांचा बहुमोल वाटा आहे. शाळेतील विद्यार्थीही अत्यंत गुणी , नम्र, विनयशील, कष्टाळू होते. शाळेत पहिली आलेली शिंगण ही अतिशय कष्टाळू, नम्र होतकरु विद्यार्थिनी होती. प्रांजली साठे हीची वक्तृत्वशैली तर सर्वांनाच विदित आहे. या 10 वी अ वर्गाचे वैशिष्टय म्हणजे हा वर्ग अतिशय शांत, विनम्र, ज्ञान घेण्यास सदोदित आतुर असाच होता.

विद्या प्रसारक मंडळाचे वर्षभर राबवलेले शैक्षणिक उपक्रम, सराव परीक्षा, स्पेशल क्लासेस इ. उपक्रमांमुळेच शाळेचा निकाल चांगला लागला.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांच्या यशाचे श्रेय सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालक व विद्या प्रसारक मंडळाला जाते. मंडळाची कौतुकाची थाप नेहमीच आमच्या पाठीशी असते. म्हणूनच तर आम्हाला हुरुप येतो.

‘No great work can be done without sacrifice’ या वाक्याप्रमाणे मंडळाचे नेहमीच शिक्षकांना प्रोत्साहन मार्गदर्शन असते. तेव्हा या यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन करुन त्यांना भावी जीवनासाठी शुभेच्छा देवून मी माझे मनोगत संपविते. जयहिंद!

No comments: