Thursday, July 21, 2011

शिष्योत्तमांची मांदियाळी - 2

शिष्यवृत्ती परीक्षांमधील यशापाठोपाठ शाळेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात शाळेला सुवर्णाची खरीखुरी झळाळी मिळवून दिली ती शाळेच्या शालांत परीक्षेत मराठी आणि इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी, अनुक्रमे 93.2% आणि 100% निर्णय नोंदवून !

ह्या विद्यार्थ्यांचा एक हृद्य कौतुक सोहळा शाळेच्या नव्या सभागृहामध्ये रविवार दि. 3 जुलै 2011 रोजी साजरा झाला. समारंभाचे अध्यक्ष होते फ्युचर कॅपिटलच्या कॉर्पोरेट सेंटरचे प्रमुख आणि मुख्य वित्तीय अधिकारी, सुप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ मा. श्री. अशोक शिनकर.

लेझीमच्या तालावर विद्यार्थ्यांनी पाहुण्यांचे नवीन इमारतीत स्वागत केले.

पाहुण्यांचे आगमन

त्यानंतर पाहुण्यांनी मंडळाच्या सदस्यांसमवेत शाळेच्या नव्या इमारतीची पाहणी केली. 

नव्या इमारतीमध्ये फेरफटका नव्या इमारतीमध्ये फेरफटका

नव्या इमारतीच्या उभारणीमध्ये श्री. अशोक शिनकर ह्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. कॉर्पोरेट क्षेत्रातील आश्रयदात्यांना शाळेच्या नव्या इमारतीसाठी मदतीचे आवाहन करणे सोपे जावे म्हणून त्यांनी स्वखर्चाने शाळेला एक लघुपट तयार करून दिला तसेच अनेक महत्त्वाच्या व्यक्तींना निधीसाठी वैयक्तिक आवाहनही केलेले आहे.

सौ. व श्री. शिनकर ह्यांनी दीपप्रज्वलन करून सरस्वतीपूजन केले.

प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः सा मां पातु सरस्वति भगवति

व्यासपीठावर स्थानापन्न झालेले मान्यवर पुढील चित्रात दिसत आहेत. डावीकडून- इंग्रजी माध्यमाच्या उपमुख्याध्यापिका सौ. सावे मॅडम, मंडळाचे उपाध्यक्ष श्री. सुरेश ठाकूर, सौ. शिनकर, श्री. शिनकर, मंडळाचे अध्यक्ष श्री. ज. स. साळुंखे, मुख्याध्यापक श्री. बेंडाळे सर, शाळा समितीचे अध्यक्ष श्री. दिलीप म्हांबरे.

व्यासपीठावर स्थानापन्न झालेले मान्यवर

कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवनाने झाली.

या कुन्देदुतुषारहारधवला...

उपमुख्याध्यापिका सौ. थरवळमॅडम आणि मंडळाचे अध्यक्ष श्री. साळुंखेसर ह्यांनी अनुक्रमे सौ. व श्री. शिनकर ह्यांचे स्वागत केले.

सौ. शिनकर ह्यांचा सत्कार   श्री. शिनकर ह्यांचा सत्कार

८५ टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळवणा-या विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी सोहळा आयोजित करण्यात आला होता. श्री. शिनकर ह्यांच्या हस्ते प्रमाणपत्र, रोख रक्कम आणि गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

85% आणि अधिक गुण मिळवून शालांत परीक्षेत यशस्वी झालेल्या शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या तब्बल 111 होती.

गुणवंत विद्यार्थ्यांची यादी पुढीलप्रमाणे :

इंग्रजी माध्यमिक विभाग :

1

Pallavi Prakash Sapale

536

97.45

2

Shubham Sanjiv Kumthekar

529

96.18

3

Gauri Prasad Joshi

525

95.45

4

Akshay Baburao Gawas

522

94.91

5

Krutika Sandeep Sawant

522

94.91

6

Rahul Rajendra Gosavi

520

94.55

7

Prajakta Uday Kothawadekar

520

94.55

8

Amey Rajeev Joshi

519

94.36

9

Namita Chandrashekhar Powar

519

94.36

10

Prachi Sunil Hatkar

519

94.36

11

Saloni Mahendra Parab

516

93.82

12

Gaurav Shekhar Darekar

515

93.64

13

Shashank Shyamsunder Rane

514

93.45

14

Divya Nitin Kamat

513

93.27

15

Radhika Santosh Chitale

513

93.27

16

Kshitija Kishor Govekar

510

92.73

17

Narendra Sanjay Patil

508

92.36

18

Rohan Shivaji Hatekar

506

92.00

19

Sarvesh Rajesh Agrawal

506

92.00

20

Prasad Dilip Bagwe

506

92.00

21

Eshani Hemant Dalvi

504

91.64

22

Vaibhavi Arjun Korgaonkar

503

91.45

23

Sunidhi Gururaj Desai

499

90.73

24

Amrita Subramaniam Pillai

497

90.36

25

Uday Ramesh Dalvi

496

90.18

26

Vedika Shashikant Parab

496

90.18

27

Goutham Ushanath Shenoy

496

90.18

28

Rutwij Ravindra Ghaisas

495

90.00

29

Prachi Ajay Gawande

495

90.00

30

Amey Dinesh Malekar

495

90.00

31

Amruta Sadashiv Bagwe

493

89.64

32

Kanksha Vasant Marathe

491

89.27

33

Shubham Sanjay Kaundanyapure

490

89.09

34

Mitralee Nishikant Save

445

89.00

35

Shivani Prashant Vartak

489

88.91

36

Bhagyashree Arvind Ghag

487

88.55

37

Chinmay Ulhas Rahate

486

88.36

38

Kaustubh Prabhakar Bhosale

485

88.18

39

Manashree Jayprakash Shirgurkar

485

88.18

40

Pranali Shailesh Deshpande

485

88.18

41

Aditya Mukund Deo

485

88.18

42

Abhishek Lahu Pawar

485

88.18

43

Sampada Suhas Kudalkar

485

88.00

44

Esha Purushottam Bhat

483

87.82

45

Mukta Harishkumar Parab

483

87.82

46

Mansi Ashok Chavan

482

87.64

47

Alisha Anand Gothankar

481

87.45

48

Aishwarya Krishnakant Rane

478

86.91

49

Menita Sachin Mulye

475

86.36

50

Shivangi Shrikant Kulkarni

475

86.36

51

Sanat Sanjay Gawade

473

86.00

52

Mohit Dipesh Tanna

472

85.82

53

Urvee Shrikant Mankame

470

85.45

54

Akshaya Arvind Mhatre

470

85.45

55

Namaratha Gurunath Shenoy

470

85.45

56

Siddhesh Sandip Sawant

470

85.45

57

Janhavi Vinaykumar Morajkar

467

84.91

58

Neerja Shrikant Surve

466

84.73

59

Vaidehi Vijay Akshekar

465

84.55

 

Pallavi Prakash Sapale

Shubham Sanjiv Kumthekar

मराठी माध्यमिक विभाग :

1

आरती प्रकाश शिंगण

95.82

527

2

ॠषिकेश हर्षल गोखले

95.45

525

3

अमेय मंगेश डोंगरे

95.27

524

4

गणेश जयवंत कोठवळे

95.09

523

5

क्षितिज सहदेव मोंडे

95.09

523

6

निकीता अरूण कुलकर्णी

94.18

518

7

अमेय मधुकर मोहिते

94.00

517

8

संजना रोहिदास लस्ते

93.82

516

9

चिराग किशोर भोईर

93.64

515

10

सई जयंत पवार

93.45

514

11

मनाली मनोज पाटील

92.36

508

12

भाग्यश्री मिलिंद शंकपाळ

92.36

508

13

सुमित गोविंद तरळकर

91.82

505

14

अशोक गोविंद बोडके

91.45

503

15

विनायक किसन सावंत

91.09

501

16

ममता दिलीप साळवी

90.73

499

17

प्रांजली रविंद्र साठे

90.73

499

18

निधी दयानंद वैदय

90.55

498

19

स्नेहल गंगाधर जगताप

90.36

497

20

समिधा सखाराम वळंजू

90.36

497

21

अजय मनोहर जवंजाळ

90.18

496

22

श्रुती मुकुंद आठवले

89.45

492

23

प्राजक्ता अनिल पाटील

89.45

492

24

सिध्देश पद्‌माकर सावे

89.45

492

25

स्मृति चंद्रकांत सावंत

89.27

491

26

मयुरी महादेव कारते

89.27

491

27

अभिजित मनोज काळे

88.91

489

28

नितेश महेंद्र म्हात्रे

88.91

489

29

अभिषेक राजेश कदम

88.73

488

30

मुग्धा श्रीकांत चंद्रात्रेय

88.18

485

31

दर्शना श्रीमंत पवार

88.18

485

32

देवश्री मिलिंद रोपळेकर

88.00

484

33

वरूण मंगेश पाटील

87.64

482

34

वैभव कारभारी पावडे

87.45

481

35

राहूल हरिश्चंद्र रसाळ

87.27

480

36

दर्शना चंद्रकांत डोंगरकर

87.27

480

37

याज्ञिका संजय पाटील

87.27

480

38

पुनम संपत आणेकर

87.09

479

39

हर्षदा शशिकांत पांचाळ

87.09

479

40

धनश्री हरिभाऊ पाटील

86.91

478

41

जयेंद्र अजय म्हात्रे

86.91

478

42

जितेंद्र चांदोरकर

86.80

434/500

43

रूचिता सदानंद ढगे

86.73

477/550

44

अमेय भरत आठवले

86.73

477/550

45

तेजस मधुकर मोहिते

86.55

476

46

अनिकेत चंद्रकांत गराटे

86.55

476

47

भाग्येश नारायण पुनाळेकर

86.00

473

48

तन्मय दीपक आर्ते

85.82

472

49

रूपाली चरणसिंग चव्हाण

85.64

471

50

माधुरी विलास उकिर्डेे

85.64

471

51

साधना उत्तम इंचनाळे

85.40

427

52

तन्वी अशोक घुगे

85.00

425

आरती प्रकाश शिंगण ॠषिकेश हर्षल गोखले Gauri Prasad Joshiअमेय मंगेश डोंगरे 

कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन सौ. गुळवे मॅडम आणि सौ. शेणॉय मॅडम ह्यांनी केले.

सौ. गुळवेमॅडम आणि सौ. शेणॉय मॅडम

कार्यक्रमासाठी पालक, विद्यार्थी, विद्या प्रसारक मंडळाचे सदस्य आणि भूतपूर्व पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते.

पालक, विद्यार्थी

उपस्थित शिक्षकवर्ग

सत्कारमूर्ती

Parents, Students and Teachers

श्रोतृवृंद

श्रोतृवृंद

श्री. राहुल केळकर, श्री. योगेश सांगळे, श्री. सुदर्शन परब, श्री. प्रभाकर साठे, श्री. प्रभाकर ठाकूर आणि श्री. उल्हास देशपांडे खालील चित्रामध्ये दिसत आहेत.

श्रोतृवृंद

श्री. राजेंद्र गोसावी, डॉ. वसंत पाटणकर, श्री. बाळासाहेब तावडे, श्री. मधुकर सुर्वे आणि श्री. वसंत मानकामे आदि मान्यवर पुढील चित्रामध्ये दिसत आहेत :

श्रोतृवृंद

कार्यक्रमास गर्दी झाल्याने सभागृहाबाहेर उपस्थितांसाठी स्क्रीनची व्यवस्था करण्यात आलेली होती. पुढील चित्रामध्ये सौ. आणि श्री. आठवले, श्री. तायशेटे, श्री. पेंढारकर आणि श्री. ठाकरे दिसत आहेत.

श्रोतृवृंद

शिक्षकांतर्फे श्री. टंकसाळी सर आणि सौ. सावे मॅडम ह्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आपल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करताना सारेच शिक्षक भावविवश झाले होते.

श्री. टंकसाळी सर सौ. सावे मॅडम

पालकांच्या वतीने श्री. सापळे आणि श्री. शिंगण ह्यांनी आपले विचार मांडले. यशस्वी विद्यार्थ्यांचे त्यांनी तोंड भरून कौतुक केले आणि शाळेतील शिक्षकांना मन।पूर्वक धयवाद दिले.

श्री. सापळे श्री. शिंगण

कु. पल्लवी सापळे आणि कु. आरती शिंगण ह्या अनुक्रमे मराठी आणि इंग्रजी विभागांमध्ये प्रथम क्रमांकावर आलेल्या विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांच्या वतीने शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त केली आणि "विद्या विनयेत शोभते'' ह्या वचनाचा प्रत्यय दिला. 

कु. पल्लवी सापळे कु. आरती शिंगण

प्रमुख पाहुण्या सौ.शिनकर, मंडळाचे अध्यक्ष श्री. ज. स. साळुंखे, मंडळाचे उपाध्यक्ष श्री. सुरेश ठाकूर आणि शाळा समितीचे अध्यक्ष, श्री. दिलीप म्हांबरे आणि मुख्याध्यापक श्री. बेंडाळे सर ह्यांच्या हस्तेही पारितोषिके स्वीकारण्याचा मान विद्यार्थ्यांना मिळाला.

सौ.शिनकर ह्यांच्या हस्ते पारितोषिक स्वीकारण्याचा मान

 श्री. ज. स. साळुंखे ह्यांच्या हस्ते पारितोषिक स्वीकारण्याचा मान  

श्री. सुरेश ठाकूर ह्यांच्या हस्ते पारितोषिक स्वीकारण्याचा मान श्री. दिलीप म्हांबरे ह्यांच्या हस्ते पारितोषिक स्वीकारण्याचा मान

श्री. बेंडाळे सर ह्यांच्या हस्ते पारितोषिक स्वीकारण्याचा मान

श्री. म्हांबरे सरांनी आपल्या भाषणात शिक्षकांच्या प्रयत्नांबद्दल त्यांना श्री. दिलीप म्हांबरे धन्यवाद दिले आणि विद्यार्थ्यांनी केवळ मेडिकल किंवा इंजिनिअरिंगलाच न जाता आयएएस आणि आयएफएस अशा करिअर्सचे आह्वानही स्वीकारावे असा सल्ला दिला.

समारंभाचे अध्यक्ष श्री. अशोक शिनकर ह्यांनी गोष्टी सांगत सांगत विद्यार्थ्यांचे उद्बोधन केले आणि जीवनात यशस्वी

श्री. अशोक शिनकर

होण्याचे तीन महत्त्वाचे मंत्र त्यांना सांगितले.

ह्या प्रसंगी मंडळाच्या अध्यक्षांनी केलेले आवाहन पुढे देत आहोत :
"सादर नमस्ते,
विद्या मंदिरच्या ज.स.साळुंखे  गुणी विद्यार्थ्यांचं आपण सर्वांनी केलेलं कौतुक ही आमच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अतिशय भाग्याची गोष्ट आहे.
अनेक शुभ घटनांची मालिका सध्या आपण अनुभवीत आहोत. पूर्वमाध्यमिक आणि माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये  शाळेतील विद्यार्थ्यांनी विक्रमी यश मिळवले आहे. शालान्त परीक्षेच्या निर्णयाने ह्या यशोमंदिरावर कळस चढलेला आहे.
शाळेच्या नवीन इमारतीच्या बांधकामाचा पहिला टप्पा आता पूर्ण होत असून ह्या वर्षी आणखी 12 नवीन वर्ग विद्यार्थ्यांना उपलब्ध झाले आहेत.  दहिसरच्या भूमिपुत्रांच्या त्यागातून आणि गावकऱ्यांच्या श्रमातून साकारलेली ही संस्था आणखी जास्त विद्यार्थ्यांच्या अधिक चांगल्या शिक्षणाची सोय करण्‌यास सज्ज झालेली आहे.
शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक, संस्थेचे हितचिंतक आणि श्री. यशवंत देवस्थळी, श्री. शंकरराव बोरकर, श्री. अशोक शिंत्रे, श्री. सुरेश ठाकूर असे दानशूर आश्रयदाते तसेच ऍक्सिस बॅंकेसारख्या सामाजिक बांधीलकी जपणाऱ्या संस्थांच्या पाठबळावर मंडळाने सुमारे 12.5 कोटी रुपयांचा हा प्रकल्प हाती घेतलेला आहे.
संस्थेच्या सर्व आजी-माजी विद्यार्थ्यांनी, त्यांच्या पालकांनी आणि हितचिंतकांनी ह्या कामासाठी सढळ हस्ते मदत करावी असे आवाहन ह्या निमित्ताने आम्ही करीत आहोत. आपल्या देणग्यांवर आयकर अधिनियमाच्या कलम 80 जी कलमांतर्गत करसवलतही मिळू शकेल. आपल्या देणग्यांचे धनादेश आपण विद्या मंदिर, दहिसर (पूर्व) येथे मंडळाच्या कार्यालयात सादर करू शकता अथवा शाळेच्या शिक्षकांकडे सुपूर्द करू शकता.
ह्या कामी आवाहनपत्रिका किंवा पुस्तिका हव्या असल्यास किंवा इतर माहिती हवी असल्यास आपण शाळेच्या अभ्यासिकेशी आठवड्याचे सातही दिवस, सकाळी 7 ते सायं 7 वाजेपर्यंत 6520 5520 ह्या क्रमांकावर संपर्क साधू शकता.
ज.स.साळुंखे 
अध्यक्ष, विद्या प्रसारक मंडळ, दहिसर''

कार्यक्रमाच्या शेवटीश्री. बेंडाळे सर मुख्याध्यापक श्री. अविनाश बेंडाळे ह्यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि आभारप्रदर्शन केले. चांगल्या निर्णयाबद्दल त्यांनी आपल्या सहकारी शिक्षक-शिक्षकेतरांना धन्यवाद दिले आणि पुढीलवर्षी ह्यापेक्षाही चांगला निर्णय असेल अशी ग्वाहीही आपल्या भाषणात दिली.

कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा एक अनौपचारिक मेळावाच नंतर जणू सुरू झाला. कोणाचाच पाय निघत नव्हता. अखेरीस पंडितकाकांच्या वड्याचा आस्वाद घेत सर्वांनी शाळेचा निरोप घेतला.

No comments: