Wednesday, July 20, 2011

।।श्री स्वामी समर्थ ।।

गुरु हा एक अर्थपूर्ण शब्द भारतीय संस्कृतीत गुरुभक्ती म्हणजे एक अंत्यत मधुर असे काव्य आहे. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या तेराव्या अध्यायात या गुरुभक्तीचा अपार महिमा गायिला आहे. गुरु आपणांस ज्ञानाच्या गाभा-यात घेऊन जातो. ज्ञानाशी तन्मय झालेला गुरु शिष्याची समाधी लावतो. नम्रता हा ज्ञानाचा खरा आरंभ आहे. गुरुजवळ शिष्य रिकामे मन घेऊन येतो व जाताना ज्ञानाचा सागर घेऊन जातो.

गुरु म्हणजे एकप्रकारे आपले ध्येय, ज्ञानाची तहान. गुरुभक्ती म्हणजेच ध्येयभक्ती. ध्येय सदैव वाढत असते. ध्येयरूपी गुरु अनेक आहेत. त्यांची कितीही सेवा केली तरी ती अपुरीच असते. गुरु म्हणजे मूर्त ज्ञानपिपासा, तळमळ असते. खरा गुरु आपल्या पुढे जाणा-या शिष्याचे कौतुक करतो. शिष्याचा विजय हा गुरुचा विजय. गुरु आपले सर्व ज्ञान शिष्याला विजय हा गुरुचा विजय. गुरु आपले सर्व शिष्याला देतो. श्रीरामकृष्ण परमहंस विवेकानंदाना म्हणाले, ‘ मी सारे तुला देऊन टाकतो. माझी सारी साधना आज तुझ्या हृदयात ओततो. गुरुला ज्ञानाचा वृक्ष वाढत जावा, असे वाटत असते. शिष्याला स्वत:च जीवनातील सारे अर्पण करतो. गुरुला आंधळी भक्ती आवडत नाही. निर्भयपणे नम्रपणे उपासना करणे, यातच गुरुभक्ती आहे. श्रीदत्तगुरुंपुढे नतमस्तक होऊ न आपले जीवनकार्य करीत रहावे, हेच आपले कर्तव्य आहे.

गुरुपौर्णिमेला ‘ व्यास पौर्णिमा’ असे म्हणतातimage. गुरुजवळ बसून शिष्य नम्रता, जिज्ञासा, सेवा शिकतो. गुरुंचे पूजन ध्येयपूर्तीसाठी असते. भारतीय संस्कृतीने गुरुमध्ये कळसरूप अशा सद्‌गुरुला नेहमी पूजिले आहे. गुरु विश्वाच्या अनंततेचे तसेच सृष्टीच्या ज्ञानाचे दर्शन करतो. सद्‌गुरु जीवनाची कला शिकवून मानवाला ईश्वराभिमुख बनवतो. अध्यात्म विद्येचे दर्शन करणारा, जीवनाला सुंदर, निर्दोष व पवित्र बनवून, आपला हात पकडून प्रभूचरणाजवळ आपल्याला घेऊन जाणारा हा सद्‌गुरु आहे. सद्‌गुरु हाच भक्त व परमेश्वर यांच्यामध्ये मध्यस्थाचे काम करतो.

पी. सी. राजाध्यक्ष

उपमुख्याध्यापिका, 

मराठी माध्यमिक विभाग.

No comments: