Wednesday, July 29, 2009

मराठी प्राथमिक विभाग

शालेय अहवाल -जून 2009
· 4 जून ते 13 जून - शिक्षण विभागातर्फे प्रशिक्षणवर्ग
· 3 शिक्षकांना इ. 1 ली च्या आनंददायी प्रशिक्षणाकरिता पाठविण्यात आले
· सौ. माधवी परुळकर यांनी तालुकास्तरीय प्रशिक्षणात स्त्रोतव्यक्ती म्हणून काम केले.
· शनिवार दि. 13 जून शाळेचा पहिला दिवस- ‘पुस्तकदिन’ म्हणून साजरा केला. सर्व शिक्षा अभियानांतर्गत मोफत दिली जाणारी पाठयपुस्तकाचे वितरण
· दि. 18 जून शाळेचा वर्धापनदिन. मान. सौ.वर्तक बाई यांनी सर्व विद्यार्थ्यांना शाळेची आतापर्यंतची यशस्वी वाटचाल याविषयी सांगितले. सर्व विद्यार्थ्यांना गोड खाऊ वाटण्यात आला.
· दि. 22 जून - उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिन. या विषयावर अधिक माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
· इ.3री च्या इंग्रजी विशेष केंब्रिज वर्गासाठी अध्यापन करणा-या शिक्षकांची एक विशेष सभा घेण्यात आली.
· दि. 27 जून -1 ली ते 4 थी च्या सर्व व वर्गाच्या शिक्षक-पालक सभा
· दि. 29 जून इ.2 री ते 4 थी च्या सर्व विद्यार्थ्यांची पायाभूत चाचणी
· दि. 30 जून - विद्यासमितीची सभा
· सन 2008-09 या शैक्षणिक वर्षातील टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या गणित प्रवेश परीक्षेसाठी इ.4थी चे एकूण 109 विद्यार्थी बसले होते. शाळेचा निकाल 100 % लागला असून विद्यार्थ्यांनी पुढीलप्रमाणे उल्लेखनीय असे यश मिळवले आहे.
गुणवत्ताप्राप्त विद्यार्थी - 35
1) प्रथम श्रेणीप्राप्त विद्यार्थी - 63
2) द्वितीय श्रेणीप्राप्त विद्यार्थी - 06
3) तृतीय श्रेणीप्राप्त विद्यार्थी - 05
शाळेतून सर्वप्रथम येण्याचा मान पुढील विद्यार्थ्यांनी मिळवला.
1) कु. ओम्‌कार कृष्णा पालांडे 95 /100 गुण
2) कु. ज्योत्स्ना सुरेश भुवड 95/100 गुण
या महिन्याचा अभ्यासक्रम छात्र दैनंदिनीप्रमाणे पूर्ण करण्यात आला आहे.

No comments: