Thursday, July 16, 2009

आजि सोनियाचा दिनु

आजि सोनियाचा दिनु

वर्षे अमृताचा घनु

शालान्त परीक्षेclip_image002तील यशस्वी विद्यार्थ्यांचं कौतुक

मा. श्री. अशोक शिंत्रे, मुख्य अभियंता, बृहन्मुंबई महानगरपालिका, यांच्या हस्ते करण्यात आले. कौतुक सोहळ्याच्या ह्या चित्रामध्ये उजवीकडून मुख्याध्यापक श्री. वाघ सर, मा. श्री. अशोक शिंत्रे, मंडळाचे अध्यक्ष श्री. ज. स. साळुंखे, उपाध्यक्ष श्री. सुरेश ठाकूर दिसत आहेत.

व्यासपीठावर स्थानापन्न आहेत, उजवीकडून-उपमुख्याध्याclip_image004पिका सौ. सावे मॅडम, मुख्याध्यापक श्री. वाघ सर, मा. श्री. अशोक शिंत्रे, मंडळाचे अध्यक्ष श्री. ज. स. साळुंखे, उपाध्यक्ष श्री. सुरेश ठाकूर

शालान्त परीक्षेचा निर्णय जाहीर झाला की विद्या मंदिरात आनंदोत्सव सुरू होतो. तो विद्यार्थ्यांच्या शिक्षकांच्या, आणि पालकांच्या श्रमसाफल्याचा दिवस असतो. रोषणाई, फटाके आणि मिठाई अशी दिवाळी साजरी होते. इंग्लिश माध्यमाचा 100% आणि त्यामागोमाग थोडा कमी असा मराठी माध्यमाचा निकाल लागलेला असतो. हे वर्षही त्याला अपवाद नव्हते. 80% च्यावर गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचं शाळेतर्फे कौतुक केलं जातं. शिक्षकांच्या आणि पालकांच्या साक्षीनं विद्यार्थी ह्या हृद्य सोहळ्यात सहभागी होतात.

clip_image006इमारत बांधकामाचे सोबत जोडलेले छायाचित्र दि. 12/07/2009 रोजी घेतलेल आहे. आपण पहाल की नैऋत्येकडील भागात विटांचे बांधकाम गच्चीपर्यंत पूर्ण झालेले आहे. उत्तरेकडे म्हणजेच हॉलच्या वर चौथा स्लॅब टाकण्‌याची तयारी जवळ जवळ पूर्ण झाली असून स्लॅब दि. 14/15 जुलै रोजी स्लॅबचे काम पूर्ण व्हावे.Please see the link for more photos of "Kautuk Sohala 09" : -
http://picasaweb.google.co.in/lh/sredir?uname=vmandir&target=ALBUM&id=5363105228683179041&authkey=Gv1sRgCIz9iumR9JaCZA&feat=email

No comments: