Monday, March 29, 2010

निरोप समारंभ 2009 -10

शनिवार दि.6 फेब्रुवारी 2010 रोजी . 10 वी मराठी/ इंग्रजी माध्यमांचा निरोप समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमांचे अध्यक्षपद वि.प्र.मं चे श्री. जगदीश साळुंखे यांनी स्वीकारले. . 10 वीच्या एकूण आठ तुकड्या असून साधारणपणे 500 विद्यार्थी उपस्थित होते. ही तुकड्यांमधील प्रत्येकी एका प्रतिनिधीने आपले मनोगत व्यक्त केले. या सर्व कार्यक्रमाचे सूत्र संचालन .10 वी च्या विद्यार्थीनी कु. पुरुष्णी मांजरेकर कु. विदुला पाटील यांनी केले मराठी माध्यमिक विभागाच्या सौ. निलीमा खडतकर यांनी मार्गदर्शनपर भाषण केले तसेच अध्यक्ष साळुंखे सर मुख्याध्यापक श्री. वाघ सर यांनी विद्यार्थ्यांना आशीर्वाद देऊन मार्गदर्शनपर भाषण केले. सौ. जोगी मॅडम यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.

याच दिवशी . 5 वी ते 9 वी च्या विद्यार्थ्यांचा तिळगुळ समारंभ संपन्न झाला.

No comments: