जेथे असते सगळ्यास उभारी
जेथून घेतो प्रत्येक भरारी
अशी ही माझी मुंबई
जेथून घेतो प्रत्येक भरारी
अशी ही माझी मुंबई
प्रांजली रविंद्र साठे
इयत्ता - 9वी/अ
मुंबई हा शब्द उच्चारला की प्रत्येकाच्या मनात जागतो
तो मराठी बाणा. मुंबईत राहणारा कोणीही असो पंजाबी, बंगाली, गुजराती पण त्या प्रत्येकालाच मुंबईत राहिल्याने समजते ती मराठी भाषा. मुंबईत अनेक धर्माचे, अनेक प्रांतातील लोक राहतात. मुंबईमध्ये विविधतेत एकता आहे.
मुंबई म्हणजे जिथे प्रत्येकालाच उडण्यासाठी पंख मिळतात. मुंबईत स्वातंत्र्यानंतर अनेक उद्योगधंदे प्रस्थापित झाले. स्वातंत्र्यानंतर मुंबईची आर्थिक प्रगती अतिशय झपाट्याने झाली. मुंबईला भारताची आर्थिक राजधानी म्हणतात. मुंबईत ऐतिहासिक वास्तू, नैसर्गिक ठिकाणे, प्रेक्षणीय स्थळे, ग्रंथालये, महाविद्यालये इत्यादी वास्तू आहेत. प्रिन्स ऑफ वेल्स सारखी ब्रिटीशकालीन संग्रहालयेही आहेत. गेट वे ऑफ इंडियासारखी महत्त्वाची वास्तूदेखील मुंबईत आहे. त्यामुळे मुंबई हा शब्द उच्चारला की आपल्या डोळ्यासमोरून तरळून जाते ते मुंबईचे असे विविधांगी व्यक्तिमत्त्व !
याच विविधांगी व्यक्तिमत्त्व असलेल्या मुंबईला 1973 मध्ये, 2005ध्ये तसेच 26/11 रोजी ग्रहण लागले. अनेक निष्पाप लोकांना काळाने कवटाळले. आंतकवाद्यांचा नायनाट करण्यासाठी अनेक पोलिस प्राणपणाने लढले. अशी बिकट परिस्थिती ओढवलेली असतानादेखील मुंबई आपल्या पायांवर उभी राहिली.
मुंबई विकासाच्या दृष्टीने वाटचाल करतच आहे. मात्र प्रत्येक मुंबईकराच्या मनात एक खंत राहील ती म्हणजे मुंबई जरी भारताची आर्थिक राजधानी असली तरीही या मुंबईत आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणजे धारावी आहे. मुंबईच्या आर्थिक विकासात आणि सामाजिक विकासातही अडथळा आणणारे धारावी, मुंबईची वाढती लोकसंख्या, अस्वच्छता, भ्रष्टाचार, ढासळणारा पर्यावरणाचा असमतोल हे मुख्य घटक आहेत. या घटकांवर मात करण्यासाठी सर्व जनतेचा सहभाग आणि पाठिंबा असणे आवश्यक आहे.
यावरुन गोष्ट आठवते ती शेतकरी आणि त्याच्या चार मुलांची. शेतकरी आपल्या प्रत्येक मुलाला एक काठी देतो आणि त्याचे तुकडे करायला सांगतो. पहिल्यांदा काठीचे तुकडे होतात. दुस-यांदा होतात. मात्र जेव्हा काठ्यांचे चार तुकडे होतात तेव्हा मात्र ती काठी अजुन तोडू शकत नाही. शेवटी म्हणतात ना एकी हेच बळ त्याचप्रमाणे जेव्हा सारे मुंबईकर एकत्र येतील तेव्हाच आपल्यापुढील बिकट समस्या आपण सोडवू शकू.
यामुळे आपण सर्व मुंबईकर एकत्र येऊया आणि विकसनशील मुंबईला विकसित करूया. शिक्षण पूर्ण झाल्यावर परदेशी न जाता मुंबईतच राहूया? अशी प्रतिज्ञा आपण केली पाहिजे.
मुंबईला शांघाय म्हणतात. कोणत्यातरी शहराची उपमा आपल्या मुंबईला दिलेली कोणालाच आवडणार नाही. यामुळे आपण मुंबईची स्वत:ची ओळख जगात निर्माण करूया. आपल्याला मिळालेल्या ऐतिहासिक वारशाचे जतन करुया. ‘कल करेसो आज, आज करेसो अब’ याप्रमाणे आतापासूनच या कामाची सुरुवात करूया!!!

No comments:
Post a Comment