Tuesday, February 2, 2010

शाळा

श्रीमती नीता नरेंद्र म्हात्रे

(सहा.शिक्षिका) मराठी माध्यमिक विभाग


दहिसर मुंबईचे उपनगर आहे छान

नगरात या होती आहेत मोठ्या मनाची

शिक्षणप्रेमी, सेवाभावी

गुणसंपन्न माणसे महान

गावात शाळा नाही एकच ध्यास, एकच बोचणी

मना त्यांच्या लागून राहिली

बालगोपालांची शिकण्याची सोय

दहिसरवासीय भूमी-पुत्रांनी आपली भूमी

विनाअट विनाशर्त देऊन केली

उपनगरातील हिरे, माणिक मोत्यांनी

घेतला वसा शाळा स्थापनेचा

आपले तन, मन, धन अर्पून घाम गाळून

पदरमोड करुन या त्यागमूर्तीनी उभी केली

छोटीशी कौलारु शाळा

हळुहळु सोयी सुविधा निर्माण करत

उभी केली मोठी शाळा
clip_image002
दहिसरवासी गरीब, श्रीमंत सर्वच मातापित्यांची

त्यांच्या मुलाबाळांची चिंता दूर केली

प्रयत्नाला त्यांच्या घवघवीत यश शाळेतील

मुलांनी सर्वच क्षेत्रात प्रगति करुन दिले नि

त्यागमूर्तीना शाळा बांधल्याचे समाधान लाभले

यशाची ही परंपरा पुढेही बालमित्रांनो या सरस्वतीच्या

मंदिरात तुम्ही अविरत चालू ठेवा

दहिसर विद्यामंदिर शाळेत विद्याजर्नाचे ज्ञानदानाचे
पवित्र कार्य पवित्र भावनेने अखंड चालू ठेवा

कितीही मोठे झालात तरी शाळेला विसरु नका

शाळेची आठवण सदैव ठेवा

आपल्या दहिसर उपनगरातील विद्यामंदिर

शाळेचे नाव जगात मोठे करा

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषुकदाचन!

धन्यवाद!

1 comment:

sachin said...

I love my school...!