Monday, February 1, 2010

जाऊ कसा -कसा मी शाळेला


जाऊ कसा -कसा मी शाळेला
नेहमीच आई तुझी घाई ऽऽऽ सांगतीस शाळेला जायाला ऽऽऽ
जाऊ कसा-कसा मी शाळेला गं, मी नाही जाणार शाळेला.
मी नाही जाणार शाळेला गं, मी नाही जाणार शाळेला।।धृ।।
पहिली होती क्रमिक पुस्तके.
आता आली क्षमताधिष्ठित
लागतीय बुद्धी अजमावयाला गं, जाऊ कसा-कसा मी शाळेला
पहिले होते निबंध, गृहपाठ,
आता आले प्रकल्प प्रोजेक्ट,
लागत्यात वहया वागवायला गं, जाऊ कसा मी शाळेला
पहिले होते मैदानी खेळ
आता आले संगणक खेळ
खेळतात मुलं घरात गं जाऊ कसा-कसा मी शाळेला
पहिली मुलं गुरु प्रिय
आता झाली संगणक प्रिय,
नाही राहिली शिस्त मुलांना गं, गाऊ कसा - कसा मी शाळेला
पहिली संस्कृती आई-बाबांची,
आता झाली ममी-डॅडीची,
लागल्यात ममी- डॅडी बोलायला गं, जाऊ कसा-कसा शाळेला
पहिली शेती उत्तम शेती
आता झाली दुय्यम शेती
लागेल मजुरी करायला रं , जा बाळा आता तू शाळेला
मी जातो आई शाळेला गं. मी जातो आई शाळेला.
श्री. संदीप रा. घार्गे
(विद्या मंदिर दहिसर सहाय्यक शिक्षक मराठी मा. विभाग)

No comments: