Monday, January 26, 2009

आठवणी डिसेम्बरच्या : मराठी प्राथमिक विभाग

                                                       संकलन - सौ. सायली नाईक

माहे डिसेम्बर  - 2008
शुकवार दि. 5 डिसेबर रोजी  इ.1ली व इ.2री साठी शब्दसंपत्ती व इ.3री व 4थी साठी टाकाऊतून टिकाऊ वस्तू तयार करणे, या शालेय स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामध्ये यशस्वी झालेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे आहेत : image

इ.1ली            प्रथम    कु. शर्वरी संजीव गाड्‌गीळ        (क)
                      द्वितीय   कु. ओम  रमेश आचरेकर          (क)
                      तृतीय    कु. रिध्दी रजत पाटील             (अ)

इ.2री             प्रथम    कु. रुचिरा राजेंद्र हळ्वलकर      (क)
                      द्वितीय   कु. दिप्ती शिरीष भालेराव           (ब)
                      तृतीय    कु.मृण्मयी संजय गावडे           (क)

इ.3री              प्रथम    कु. सिद्‌धाय मंगेश चाचड        (अ)
                       द्वितीय   कु. दिव्या दत्ताराम चिकणे        (क)
                                                             तृतीय    कु. श्वेता संजय मजुकर            (ब)

इ.4 थी            प्रथम   कु. किमया विजय आयरे         (क)
                       द्वितीय   कु. ज्योत्स्ना सु. भुवड             (क)
                       तृतीय   कु. भावेश ल. आगलावे              (क)


शनिवार दिनांक 6 डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याविषयी, लहाणपणाविषयी गोष्टी, माहिती सांगितली. विद्यार्थ्यांनाही छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या.

बुधवार दि. 17 डिसेंबर रोजी रविकिरण मंडळातर्फे आयोजित बालनाट्य स्पर्धेत आपल्या शाळेने अरुणोदय हे बालनाट्य सादर केले. त्यात आपल्या शाळेला उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले व खालील विद्यार्थ्यांना उत्कृष्ट अभिनय व कलाकाराचे बक्षिस मिळाले.

कु. प्राजक्ता दुर्गेश जंगम         -     उत्कृष्ट अभिनय   (4थी image/ब )
कु. रोमा शशिकांत वेदपाठक   -     उत्कृष्ट कलाकार  (4थी /ब) image

या नाटकाचे दिग्दर्शन सौ. अश्विनी केसकर यांनी केले होते.

सोमवार दि. 15 डिसेंबर रोजी इ.3री, 4थी साठी सामान्यज्ञान        स्पर्धा घेण्यात आली. त्यावेळी यशस्वी झालेले      विद्यार्थी खालीलप्रमाणे :

                    इ. 3री     प्रथम      जयराज विनायक फाटक     (अ)
                                   द्वितीय     निनाद सतीश थत्ते               (ब)
                                   तृतीय      एकता राजेंद्र ठोंबरे              (अ) 

              इ. 4थी   प्रथम      प्राजक्ता दुर्गेश जंगम            (ब)
                            द्वितीय    रोमा शशिकांत वेदपाठक      (ब)
                            तृतीय     ज्योतिका अजय खामकर   (क)

     शुक्रवार दि. 19 डिसेंबर रोजी संत गाडगेबाबा पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
     "बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले' या उक्तीप्रमाणे वागणारे संत गाडगेबाबा. यांनी स्वत: रस्ते झाडून, गाव स्वच्छ्‌ता मोहीम राबवून आपल्या वागण्यातून, आचरणातून लोकांना स्वच्छतेचे धडे दिले . "जेथे स्वच्छता तेथे आरोग्य'  म्हणून सर्वांनी शालेय परिसर, वर्ग, घर, घराजवळील परिसर स्वच्छ ठेवावा. या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या मनावर वरील संदेश ठसविण्याचा प्रयत्न करण्यात आला.image

     गाडगेबाबांविषयी शिक्षकांनी माहिती सांगितली. बालोद्यानजवळील परिसर 2 री च्या विद्यार्थांकडून स्वच्छ करून घेण्यात आला. (20 डिसेंबरची पुण्यतिथी 19 डिसेंबरला साजरी करण्यात आली.)

     शनिवार दि. 20 डिसेंबर रोजी कै. उषा रमाकांत म्हात्रे व्याख्यान माला-पुष्प 2रे या कार्यक्रमांतर्गत 'आनंददायी शिक्षण' कसे असावे याविषयीची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. मार्गदर्शन करण्यासाठी पोतदार हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. दिक्षित मॅडम उपस्थित होत्या.  त्यांनी आनंददायी शिक्षण कसे द्यावे, याविषयी हसतखेळत, मनोरंजनातून उत्तम असे मार्गदर्शन केले. मुठींचा खेळ , स्मरणशक्ती या खेळातून आनंद कसा देता येतो, हे प्रात्यक्षिकातून दाखवले, टाळ्यांचे फायदे सांगितले. टाळ्या वाजवल्याने रक्ताभिसरण क्रिया घडते. शिक्षकांनी सतत प्रयोगशील व प्रयत्नशील असावे असेही त्या म्हणाल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. विनिता सावंत यांनी केले.           


सोमवार दि. 22 व 29 डिसेंबर रोजी विद्यार्थ्यांच्या कल्पना शक्तीला वाव मिळावा, त्यांना नवनिमिर्तीचा आनंद मिळावा या हेतूने इ.1ली व इ. 3री च्या विद्यार्थ्यांकडून पानाफुलांच्या विविध कलाकृती करून घेण्यात आल्या. त्या एकत्रित मांडून छोटेखानी प्रदर्शन भरवण्यात आले.


रविवार दि.21 डिसेंबर रोजी सुविद्यालय बोरिवली येथे शंकरमठम संस्था आयोजित इ.1ली-2री साठी महालक्ष्म्यष्टकस्तव: व 3री, 4थी साठी लिंगाष्टकस्तोत्रम पाठांतर स्पर्धेत 15 विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यापैकी खालील विद्यार्थी यशस्वी झाले :

                  कु.     मृण्मयी संजय गावडे       प्रथम      2री क
                  कु.      अमेय दिलीप मोरये       पाचवा     2री ब
                  कु.      निनाद सतीश थत्ते        द्वितीय     3री ब

  गुरुवार दि. 25 डिसेंबर रोजी नाताळ्ची रजा असल्यामुळे नाताळ सणाविषयीची माहिती 24 डिसेंबरला   विद्यार्थांना सांगण्यात आली. आपल्या ख्रिस्ती मित्रांना आठवणीने नाताळ्च्या शुभेच्छा द्या. याने आपले मित्रत्वाचे   नाते जवळ  येईल . यातूनच  खऱ्या अर्थाने सर्वधर्मसमभाव वाढीस लागेल.


शनिवार दि. 27 डिसेंबर रोजी शिक्षक-पालक सभा घेण्यात आली. त्यावेळी खालील मुद्यांवर चर्चा  करण्यात आली.

1)    मासिक शुल्क
2)    शैक्षणिक सहल
3)    तृतीय घटक चाचणी
4)    हळदीकुंकू समारंभ
5)    अभ्यासात मागे असणाऱ्या विद्यार्थांविषयी
6)    पारितोषिक वितरण समारंभ
7)    इमारत फंड


31 डिसेंबर रोजी शाळा सुटल्यानंतर 4 ते 5 या वेळेत विद्यासमितीची सभा घेण्यात आली. त्यावेळी पुढील मुद्यांवर चर्चा करण्यात आली.

1)    मासिक शुल्क
2)    इमारत निधी
3)    तृतीय घटक चाचणी ,वेळापत्रक, अभ्यासक्रम
4)    शैक्षणिक सहल- 16 जानेवारी
5)    पारितोषिक वितरण समारंभ-17 जानेवारी
6)    प्रजासत्ताकदिनाची तयारी
7)    मकरसंक्रांत 14 जानेवारी


माहे डिसेंबर महिन्याचा नियोजित अभ्यासक्रम शिकवून पूर्ण केलेला आहे.

No comments: