विद्या प्रसारक मंडळाचे विद्या मंदिर
मराठी प्राथमिक विभाग दहिसर पूर्व
शैक्षणिक वर्ष २०२५-२६
दि.१६/०६/२०२५ रोजी नवीन शैक्षणिक वर्षात सर्व विद्यार्थ्यांचे मोठ्या जल्लोषात टाळ्यांच्या गजरात सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने शालेय प्रांगण बहरले.
शाळा समिती अध्यक्षा श्रीमती मेधाविनी कुलकर्णी मॅडम, मुख्याध्यापिका श्रीमती राजेश्री वेदपाठक मॅडम, शाळा समिती सदस्या श्रीमती गोसावी मॅडम, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्ग व उपस्थित सर्व विद्यार्थी यांच्या सहभागाने अत्यंत उत्साहात आनंदाने आजचा कार्यक्रम बहरला.
विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षानिमित्त भेटवस्तू व पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले.
अशा प्रकारे उत्साहवर्धक वातावरणात नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली.
त्याची क्षणचित्रे. 🙏🏻
No comments:
Post a Comment