विद्या मंदिर
मराठी प्राथमिक विभाग.
नमस्कार🙏🏻
शनिवार दिनांक २१/०६/२०२५ रोजी 'आंतरराष्ट्रीय योग दिवस' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जागतिक योग दिन साजरा करण्याचे हे ११ वे वर्ष.'हिमालयीन समर्पण ध्यान योग' या संस्थेतर्फे आलेल्या माननीय श्रीमती संजीवनी निलवर्ण तसेच त्यांचे सहाय्यक यांनी इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांची योगासनाची विविध प्रात्यक्षिके घेतली. विशेषतः ध्यानधारणेचे महत्त्व बालकथेतून सांगितले. तसेच विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष ध्यानधारणेचा अनुभव घेतला.शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योगाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व सांगितले. शरीर, मन, आत्मा यांना जोडण्याचे कार्य योग करते. इयत्ता पहिली व दुसरीच्या चिमुकल्यांनीही आपल्या शिक्षकांसह योगासनाची विविध प्रात्यक्षिके केली.
त्याची काही क्षणचित्रे. 🙏🏻
No comments:
Post a Comment