शैक्षणिक सहल - नेहरू तारांगण, वरळी( इ.३रीव४थी)
वि. प्र मंडळाच्या विद्यामंदिर,
मराठी प्राथमिक विभागातर्फे बुधवार दि.१४/०९/२०२२ रोजी इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल नेहरू तारांगण, वरळी येथे आयोजित करण्यात
आली होती. १३० विद्यार्थी व मुख्याध्यापिका श्रीमती उमा नाईक मॅडम, प्राथमिक विभागाच्या
सर्व शिक्षिका व शिपाई यासर्वांचा या शैक्षणिक सहलीत समावेश होता.
नियोजनानुसार बुधवारी सकाळी ८.30 वाजता, तीन
बसेस मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झाल्या.मुंबईतली
वाहतूक, कामासाठी निघालेल्या लोकांची लगबग, रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या इमारती, वस्त्या,
विविध मॉल, दुकाने, मेट्रोची कामे किंवा चालत्या मेट्रो ट्रेन, रेल्वे, वांद्रे ते
वरळी सी लिंक, अरबी समुद्रातील उसळणाऱ्या, पावसाळी वातावरणामुळे ऊन पावसाचा खेळ या
साऱ्या गोष्टी अनुभवत नेहरू तारांगण येथे पोहोचलो.
नेहरू सेंटरची गोल इमारत आणि पुढे गेल्यावर तारांगणाचा गोल घुमट यांनी विद्यार्थ्यांचे
लक्ष वेधून घेतले.
नेहरू सेंटरमधील आदिमानवापासूनचा इतिहास,
भारतीय संस्कृती याबदलच्या प्रतिकृती पाहिल्यानंतर दुपारी जेवण केले. त्यानंतर प्रत्यक्ष
नेहरू तारांगण येथे गेलो सूर्याभोवती फिरणारे ग्रह, त्यांच्या भोवती फिरणारे उपग्रह,
मंगळाच्या पृष्ठभागावरील दृश्य, चांद्रदेखावा , वेगवेगळ्या ग्रहांवर तुमचे वजन किती
असेले हे दाखवणारे वजनकाटे यांच्यामुळे मुलांची जिज्ञासा अधिक जागृत झाली. नेहरू तारांगणात
तुम्ही काय पहाल? कसे पहावे? याबद्दल तेथील एका अधिकाऱ्यांनी सहज सोप्या भाषेत व अतिशय
आत्मीयतेने माहिती दिली.
पृष्ठभागावरील दृश्य, चांद्रदेखावा, वेगवेगळ्या ग्रहांवर तुमचे वजन किती असेले हे दाखवणारे वजनकाटे यांच्यामुळे मुलांची जिज्ञासा अधिक जागृत झाली. नेहरू तारांगणात तुम्ही काय पहाल ? कसे पहावे ? याबद्दल तेथील एका अधिकाऱ्यांनी सहज सोप्या भाषेत व अतिशय आत्मीयतेने माहिती दिली.
नेहरू
तारांगणात भर दुपारी रात्रीचे आकाशदर्शन घडवण्यात आले. सर्व ग्रहांची स्थाने,
उल्का वर्षाव, धुमकेतू, नक्षत्र याबददल विदयार्थ्यांना सहज सोप्या भाषेत समजावले.
विदयार्थ्यांना या निमित्ताने आकाश निरीक्षणाची संधी मिळाली.यानंतर सायंकाळी ४.30
वाजता शाळेच्या प्रांगणात परत आलो. ही शैक्षणिक सहल विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय
राहील यात तीळमात्र शंका नाही. या सहलीचे आयोजन करणाऱ्या मा. मुख्याध्यापिका उमा
नाईक मॅडम व सदैव प्रोत्साहित करणारे कार्यकारी मंडळ यांचे मार्गदर्शन मोलाचे
ठरले.
No comments:
Post a Comment