Tuesday, October 11, 2022

सुजाण पालकत्व

   सुजाण पालकत्व - इयत्ता १ ली व 2री


आपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास चांगल्या प्रकारे व्हावा, अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. हा विकास करताना नेमका कोणत्या मार्गाचा वापर करावा, पाल्याच्या समस्या कशाप्रकारे सोडवाव्यात यासाठी आजच्या आधुनिक काळात सुजाण पालकत्व ही निकडीची गरज होत चाललेली आहे.

हाच दृष्टिकोन समोर ठेवून विद्या प्रसारक मंडळातर्फे, विद्यामंदिर मराठी प्राथमिक विभागाने शनिवार दिनांक १७/०९/२०२२ रोजी इयत्ता पहिली व दुसरीच्या पालकांसाठी 'सुजाण पालकत्व' या विषयांतर्गत मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित केले होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मराठी प्राथमिक विभागाच्या शाला समिती अध्यक्षा श्रीमती मेधाविनी कुलकर्णी मॅडम यांनी कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शिका डॉ. श्रद्धा कुलकर्णी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती उमा नाईक मॅडम यांनीही त्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शालेय सहशिक्षिका श्रीमती उज्वला शिंदे यांनी केले. मुंबई विद्यापीठातून बी.ए. एम्. एस्. पदवी प्राप्तकरून बालआरोग्य, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्रातील , प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करून अविरत स्वतःची 
प्रॅक्टिस करत करत समाजसेवेचे ध्येय बाळगून इतरांना मार्गदर्शन करणाऱ्या माजी पालक डॉ श्रद्धा कुलकर्णी मॅडम यांनी पालकांना छान मार्गदर्शन केले. आपला पाल्य भविष्यात एक जबाबदार व्यक्तीव नागरिक व्हावा यासाठी असलेले पालकांचे प्रयत्न म्हणजेच सुजाण पालकत्व, ही संकल्पना सोदाहरण पालकांना समजावून सांगण्यात आली.

आपले मूल जर एक आदर्श विद्यार्थी म्हणून घडावा असेज्या पालकांना वाटते, त्या पालकांचे वर्तनही त्यानुसार असावे, असे आवर्जून सांगण्यात आले.मुलांना जर आपल्याला एखाद्या वाईट गोष्टीपासून परावृत्त करायचे असेल त्यांना विरोध न करता त्याचे सर्व दुरुपयोग विद्यार्थ्यांना समजावून सांगणे. गुलांचे वर्तन कुठे खटकत असेल तर पालकांनी त्याचे परीक्षण करून योग्य तो बदल करणे. विदयार्थ्यांच्या वाढीच्या दृष्टीने सकस आहाराचे महत्त्व सांगण्यात झाले. विदयार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी त्यांना फक्त अभ्यासात न अडकवता चित्रकला, नृत्य, अभिनय अशा क्षेत्रातही सहभाग घेण्यास प्रोत्साहन दयावे नोकरदार पालकांनी निदान एक तास तरी पाल्याशी संवाद साधण्यासाठी वेळ दयावा, जेणेकरून मूल मोबाइलपासून दूर ठेवता येईल. घरातील आजी आजोबांचा सहवास अधिकाधिक आपल्या पाल्याला मिळेल, अशादृष्टीने पालकांनी प्रयत्न करावेत, असे

आवाहनही करण्यात आले.

कार्यक्रमाच्या शेवटी काही पालकांनी विदयार्थ्यांशी संबंधित समस्यात्मक प्रश्न विचारले. त्यांच्या शंकेचे निरसन करण्यात आले. या कार्यक्रमाला पालकांचा उत्सफूर्त प्रतिसाद लाभला. अशाप्रकारचा उपक्रम शाळेने पालकांसाठी राबवला, यासाठी काही पालकांनी शाळेचे आभार मानले.

शैक्षणिक सहल


शैक्षणिक सहल - नेहरू तारांगण, वरळी( इ.३रीव४थी)

  वि. प्र मंडळाच्या विद्यामंदिर, मराठी प्राथमिक विभागातर्फे बुधवार दि.१४/०९/२०२२ रोजी इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांची  शैक्षणिक सहल नेहरू तारांगण, वरळी येथे आयोजित करण्यात आली होती. १३० विद्यार्थी व मुख्याध्यापिका श्रीमती उमा नाईक मॅडम, प्राथमिक विभागाच्या सर्व शिक्षिका व शिपाई यासर्वांचा या शैक्षणिक सहलीत समावेश होता.

      नियोजनानुसार बुधवारी सकाळी ८.30 वाजता, तीन बसेस मुंबईच्या दिशेने  मार्गस्थ झाल्या.मुंबईतली वाहतूक, कामासाठी निघालेल्या लोकांची लगबग, रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या इमारती, वस्त्या, विविध मॉल, दुकाने, मेट्रोची कामे किंवा चालत्या मेट्रो ट्रेन, रेल्वे, वांद्रे ते वरळी सी लिंक, अरबी समुद्रातील उसळणाऱ्या, पावसाळी वातावरणामुळे ऊन पावसाचा खेळ या साऱ्या गोष्टी अनुभवत नेहरू तारांगण  येथे पोहोचलो. नेहरू सेंटरची गोल इमारत आणि पुढे गेल्यावर तारांगणाचा गोल घुमट यांनी विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेतले.

         नेहरू सेंटरमधील आदिमानवापासूनचा इतिहास, भारतीय संस्कृती याबदलच्या प्रतिकृती पाहिल्यानंतर दुपारी जेवण केले. त्यानंतर प्रत्यक्ष नेहरू तारांगण येथे गेलो सूर्याभोवती फिरणारे ग्रह, त्यांच्या भोवती फिरणारे उपग्रह, मंगळाच्या पृष्ठभागावरील दृश्य, चांद्रदेखावा , वेगवेगळ्या ग्रहांवर तुमचे वजन किती असेले हे दाखवणारे वजनकाटे यांच्यामुळे मुलांची जिज्ञासा अधिक जागृत झाली. नेहरू तारांगणात तुम्ही काय पहाल? कसे पहावे? याबद्दल तेथील एका अधिकाऱ्यांनी सहज सोप्या भाषेत व अतिशय आत्मीयतेने माहिती दिली.

पृष्ठभागावरील दृश्य, चांद्रदेखावा, वेगवेगळ्या ग्रहांवर तुमचे वजन किती असेले हे दाखवणारे वजनकाटे यांच्यामुळे मुलांची जिज्ञासा अधिक जागृत झाली. नेहरू तारांगणात तुम्ही काय पहाल ? कसे पहावे ? याबद्दल तेथील एका अधिकाऱ्यांनी सहज सोप्या भाषेत व अतिशय आत्मीयतेने माहिती दिली.




नेहरू तारांगणात भर दुपारी रात्रीचे आकाशदर्शन घडवण्यात आले. सर्व ग्रहांची स्थाने, उल्का वर्षाव, धुमकेतू, नक्षत्र याबददल विदयार्थ्यांना सहज सोप्या भाषेत समजावले. विदयार्थ्यांना या निमित्ताने आकाश निरीक्षणाची संधी मिळाली.यानंतर सायंकाळी ४.30 वाजता शाळेच्या प्रांगणात परत आलो. ही शैक्षणिक सहल विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय राहील यात तीळमात्र शंका नाही. या सहलीचे आयोजन करणाऱ्या मा. मुख्याध्यापिका उमा नाईक मॅडम व सदैव प्रोत्साहित करणारे कार्यकारी मंडळ यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले.

मातृदिन

 

मराठी प्राथमिक विभागाच्या अध्यक्षा श्रीमती मेधाविनी कुलकर्णी मॅडम यांच्या मार्गदर्शनाने अत्यंत विलोभनीय असा 'मातृदिन' दि.२६ ऑगस्ट रोजी साजरा करण्यात आला.


श्रावणाची अमावास्या म्हणजे 'पिठोरी अमावास्या'. हा दिवस फार पूर्वीपासून 'मातृदिन' म्हणून साजरा केला जातो. इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांच्या मातांना शाळेत बोलाविण्यात आले.


विद्यार्थ्यांनी आपापल्या आईचे औक्षण केले. 
तसेच आपल्या शिक्षकांचेही औक्षण केले.


मातांनीही
आपल्या पाल्याचे औक्षण करून त्यांना शुभाशीर्वाद दिले. अतिशय भावपूर्ण झालेल्या या कार्यक्रमाची काही क्षणचित्रे...




Wednesday, August 28, 2019

आंतरशालेय समूह गीत गायन स्पर्धा

बृ. म.न.पा. शिक्षण विभाग खाजगी अनुदानित शाळा आर/एन वॉर्ड आयोजित आंतरशालेय समूह गीत गायन स्पर्धा दि.२७/०८/२०१९ रोजी वि. प्र. मं. चे विद्या मंदिर सभागृहात पार पडली. स्पर्धेत आर/एन वॉर्ड मधील ९ शाळांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेस विभाग निरीक्षक श्री. बाळकृष्ण संखे सर (P/N, P/S, R/N,R/S, R/C) यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

विद्या मंदिर मराठी प्राथमिक विभागातील इयत्ता चौथीतील विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन! 

Thursday, August 8, 2019

प्राण्यांशी मैत्री


वि. प्र. चे विद्या मंदिर मराठी प्राथमिक विभाग
दि.६/०८/१९ रोजी सकाळ आयोजित नागपंचमीच्या निमित्ताने 'साप वाचवा-निसर्ग वाचावा प्राण्यांशी मैत्री' हा कार्यक्रम विद्यामंदिर सभागृहात आयोजित करण्यात आला. कार्यक्रमास प्रख्यात सर्प मित्र प्राध्यापक श्री. सुनिल कदम यांचे मार्गदर्शन लाभले.

     श्री.सुनिल कदम यांनी प्राण्यांचे रक्षण व पर्यावरणाचे रक्षण कसे करावे?याविषयी महत्त्वाच्या बाबी सांगितल्या. विद्यार्थ्यांना सजीवांची निर्मिती ते मानवाची उत्क्रांती कशी झाली?हे अगदी सोप्या भाषेत सांगितले. अजस्त्र महाकाय प्राण्यांचा अंत कसा झाला? ते सांगितले.बेडूक, खेकडा, गोगलगाय यांसारखे उभयचर प्राणी तसेच सरपटणारे प्राणी,पक्षी प्रत्यक्षात दाखवून त्यांची माहिती सांगितली. निसर्गातील प्रत्येक प्राणी, पक्षी,कीटक निसर्गाचा समतोल राखण्यासाठी उपयोगी असतात. हे आमच्या बाळगोपाळांना पटवून दिले.


     श्री.सुनिल कदम सरांचे उपयुक्त मार्गदर्शन शिक्षक व विद्यार्थ्यांना लाभले.

लोकमान्य टिळक स्मृती आंतर शालेय स्पर्धा

प्रथम क्रमांक -तेजस्विनी दिलीप खताळ

द्वितीय क्रमांक - आदित्य राजाराम घाटगे
सुविद्या प्रसारक संघ बोरिवली तर्फे आयोजित लोकमान्य टिळक स्मृती आंतर शालेय स्पर्धा दि.30/07/19
सूर्य नमस्कार स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी :-
  सूर्यनमस्कार स्पर्धेत 3 मिनिटांत 33 सूर्यनमस्कार घालून प्रथम क्रमांक पटकावला.


.

Monday, August 5, 2019

आषाढी एकादशी

वि. प्र. मं. चे विद्या मंदिर मराठी प्राथमिक विभाग, दहिसर पूर्व  आषाढी एकादशी दि.१२/०७/२०२९ विद्यार्थ्यांना सणांचे महत्त्व कळावे याकरिता शाळेत विविध सण साजरे केले जातात. आषाढी एकादशीला विद्यार्थी  वारक-यांच्या विठ्ठल नामघोषाणे अवघे विद्यामंदिर दुमदुमले.

प्रवेशोत्सव

वि.प्र. मं. चे विद्या मंदिर मराठी प्राथमिक विभाग ,दहिसर (पूर्व ) प्रवेशोत्सव १५ जून  २०१९  /२०
   नवीन शैक्षणिक वर्षाचे शिक्षक व विद्यार्थ्यांकडून उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत!!!!
       करण्या नवागतांचे स्वागत .....
      आला लिटिल सिंघम .......

Friday, April 26, 2019

मोकाट रान

रक्षा सुमेश म्हात्रे 
३/अ
मोकाट सुटायला असते रान 
रानात  सळसळत  राहिल पान 

वृक्षाचा समानार्थी  शब्द झाड 
आपले उपयोगी वृक्ष म्हणजे  माड 

रानात  होती रंगीबेरंगी फुले 
रक्षा वेलीवर झुले 

झाडाची असते थंडगार सावली 
त्या थंडगार सावलीत मला आठवते माझी माऊली 

मोकाट सुटून मजा आली 
संध्याकाळी वेळ झाली 






Tuesday, March 26, 2019

राणी

किमया सुहास माईल - दुसरी/ब

एक होती राणी
ती वापरते मोत्याची फणी.
ती पिते थंड गार पाणी
तिने घातली केसात वेणी.
ती होती मोठी शहाणी.
केसात पडला तिच्या मणी.


Monday, March 25, 2019



हर्षदा पंकज पाटील- चौथी / ब













माझी  शाळा

माझी शाळा मला आवडते ,
मी शाळेवर छान कविता लिहिते.
माझी  शाळा छान छान ,
मला वाटतो तिचा  अभिमान .
माझ्या शाळेत घेऊन जातात खेळायला ,
कधी कधी घेऊन जातात टी व्ही बघायला .
आजपासून देणार नाही शाळेत त्रास ,
म्हणून करेल खूप अभ्यास .
गगनचुंबी माझी शाळा ,
शाळेत आहे अभ्यासाचा मेळा .



आई
माझी आई मला आवडते,
ती माझा अभ्यास घेते.
आई माझी छान छान,
मी ठेवते तीचा मान.
सुंदर आहे माझी आई,
तिला असते स्वयंपाकाची घाई.
आई माझी मस्त ,
ती शिकवते मला शिस्त.
गोष्ट सांगत असते आई,
त्या गोष्टीतून माझ्यावर संस्कार होई.
पडली जर मी आजारी,
जास्त काळजी आई करी.
अशी माझी आई,
सर्वप्रथम तीच माझी गुरु होई.







  

Wednesday, March 20, 2019

FRIENDSHIP



Friendship is like a ship, which will never sink.
Friendship is like a straight line, that will not bend.

Friendship is a budding rose, with sweetness rising from each fold
Friendship is a bond, which can never be scattered.

In every friendship trust is most important,
But friendship like ours is so rare to find these days.

A friendship that knows your strengths and weaknesses,
your ugly side and still chooses to remain by your side.

In my life, I won't judge when friendship will be disappointed or rejected,
Because our friendship is a true friendship.

                                                                                    --Rujul S. Mande - VII A

PATRIOTISM

Patriotism, what is patriotism ?
Is it to cry praises of the country ?
Or is it to die for the Motherland ?
Does it mean passively following our leaders,
like a herd of sheep ? Or does it mean
rising up, pushing everyone, everything down deep

No, patriotism means to be
committed to the country where
we grew, to fight against corrupt
leaders, if they tryto limit
our freedoms, our futures,our passion,
to serve our country the best we could do.

To be a patriot does not
mean you have to be a soldier,
It does not mean you have
to be a Prime Minster. It
means you have to be devoted,
to strive hard and to be committed,
to make your country the
best, the number 1 !
To work hard, to make your
country the best for everyone.


      Nachiket Ghalsasi -VIII / A



SCIENCE DAY





The whole world,
God has created.
On 28th Feb,
The great SCIENCE DAY is celebrated!

In groups the organisms are classified,
In which some live on land, some in water and some can glide.
Mammals like us have many features,
By God, we are the best ever made creatures.

Science is divided into various courses,
For our development it is one of the main sources.
Because of it our country has moved forward by step one
In science related things our country has always won

Science is fantastic and really neat
It has forces and waves, energy and heat
It shows us how substances interact
And when we push things, they push us back.

We study the universe from big to small
There are galaxies or carbon atoms in a ball
So let’s celebrate Science Day
And give science a Hip! Hip! Hooray

                                                                                Tarun Mallya - VIII A