विद्या मंदिर मराठी प्राथमिक विभाग
नमस्कार🙏🏻
सोमवार दिनांक ०५ जानेवारी २०२६ रोजी इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांना दहिसर पोलीस स्टेशनला शैक्षणिक भेटीसाठी नेले होते. या भेटीमुळे विद्यार्थ्यांना पोलीस/ अधिकारी होण्यासाठी घ्यावे लागणारे, प्रशिक्षण, स्पर्धा परीक्षा यांची माहिती दिली.तसेच त्यांची कामे जवळून पाहण्याची संधी मिळाली. पोलीस उपनिरीक्षक वागस मॅडम यांनी विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशनमधील विविध विभागांची माहिती दिली. त्यांनी तक्रार कशी नोंदवली जाते, लोकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस कसे काम करतात हे समजावून सांगितले. विद्यार्थ्यांनी पोलीस वाहन, गणवेश आणि इतर साधने पाहिली.
विद्यार्थ्यांनी उत्सुकतेने प्रश्न विचारले आणि पोलीस दिदींनी त्यांना प्रेमाने उत्तरे दिली. ही भेट विद्यार्थ्यांसाठी खूपच उपयुक्त आणि आनंददायी ठरली. या भेटीमुळे विद्यार्थ्यांच्या मनात पोलिसांविषयी आदरभाव निर्माण झाला. स्वतः तयार केलेली कागदी फुले पोलिसांना भेट म्हणून देऊन त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

No comments:
Post a Comment