Tuesday, January 19, 2010

'सुजाण पालकत्व'

दि. 03/01/2010


'विद्या प्रसारक मंडळ' विद्या मंदिर संस्थेच्या मदतीने इ. 8वी च्या विद्यार्थ्यांच्या पाल्यांना तणावमुक्त होण्यासाठी डॉ. मनोज भाटवडेकर या मानसतज्ञांचे मार्गदर्शन पालकांसाठी करण्यात आले. एकूण दोन सत्रात हे मार्गदर्शन होते.

पहिले सत्र सकाळी 9.00 ते 10.45
दुसरे सत्र सकाळी 11.15 ते 12.45 या दोन सत्रात इ. 8वी चे मराठी व इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांचे पालक सामान्यत: 90% उपस्थित होते.

डॉक्टरांनी पालकांशी संवाद साधून आपल्या कार्यक्रमास सुरुवात केली. सध्याची शिक्षण पद्धती, जीवघेणी स्पर्धा, तणाव, प्रचार माध्यमाचा वाढता प्रभाव पाल्याचा जीवनावर काय परिणाम करतो? त्यामुळे त्याच्या विकासावर होणारा परिणाम आपल्या भूतकाळाशी तुलना न करता वर्तमानकाळातील बदल स्वीकारुन जास्तीत जास्त सकारात्मक भूमिका वापरुन पाल्याशी संवाद साधावा.

शिक्षण पद्धतीत दोष आहेत व ते आपण बदलू शकत नाहीत हे डॉक्टरांनी गोष्टीरुपाने पटवून दिले. इ. 8वी तील विद्यार्थ्यांचे वय हे त्यांच्या शारीरिक व मानसिक वाढीचे वय आहे. शारीरिक बदल विद्यार्थ्यांना समजावून सांगणे आवश्यक आहे. शरीर रचनेतील बदल, लैंगिक शिक्षणाबद्द या वयातील विद्यार्थ्यांना निकोप दृष्टीकोन करुन देणे आवश्यक आहे.

शेवटी सारांश सर्वसामान्य पालक - पाल्य यशस्वी होण्यासाठी मनोभूमिका तयार करावी लागते . अधिक चांगले गुण अंगी बाणवावे लागतात. शेवटी माणसाचं मन हा विषय असा आहे की तो कोणालाही परका वाटत नाही. त्यामुळे मनाचा वेलू देखील गगनावरी जातो असच म्हटलं पाहिजे.

डॉ. मनोज भाटवडेकरांनी अत्यंत मार्मिकपणे, सहज सुंदर अंतर्मुख होण्यास लावणारे मार्गदर्शन केले.

इ. 8वी चे वर्गशिक्षक, शाळेचे मुख्याध्यापक, मराठी, इंग्रजी माध्यमाचे पर्यवेक्षक, इंग्रजी माध्यमाच्या उपमुख्याध्यापिका, मंडळाचे सदस्य श्री. गाडगीळ, डॉ. नाटेकर पति/पत्नी, प्रा. मेधाविनी कुलकर्णी या कार्यक्रमास उपस्थित होते.

No comments: