Sunday, September 28, 2025

आंतर शालेय चित्रकला स्पर्धा

अभिनंदन! अभिनंदन!!

    नमस्कार 🙏🏻

  विद्या मंदिर मराठी प्राथमिक विभाग.

             आज दिनांक २३/०९/२०२५ रोजी आपल्या शाळेत बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग खाजगी अनुदानित प्राथमिक शाळा R/N विभाग, आंतर शालेय चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

  या स्पर्धेत आपल्या शाळेतील पुढील विद्यार्थी यशस्वी झाले आहेत.



इयत्ता १ली- कु.निदा धम्मरक्षित रणदिवे-प्रथम क्रमांक

 इयत्ता ३री- कु.प्राप्ती राजू कांबळे -द्वितीय क्रमांक

 इयत्ता ४थी-कु.अद्विता अशोक बाणे-प्रथम क्रमांक

 सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन!


Friday, August 1, 2025

Good toch - Bad touch

 नमस्कार 🙏🏻

विद्या मंदिर मराठी प्राथमिक विभाग 

आजच्या काळात विद्यार्थ्यांना स्व-संरक्षण करता येणे आवश्यक आहे. त्यांना चांगला व वाईट स्पर्श ओळखता येणे महत्त्वाचे आहे. मुलांना स्पर्श ओळखता आल्यास अडचणीच्या काळात ते आरडा ओरडा करून, पळून जाऊन स्वतःच संरक्षण करू शकतात. चांगला स्पर्श वाईट स्पर्श कसा ओळखावा, तसेच काही अडचण आल्यास नेमकं काय करावं? याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी आज दिनांक ३१|०७|२०२५ रोजी पोलीस दीदींना आमंत्रित केले होते.दीदींनी विद्यार्थ्यांना छान मार्गदर्शन केले.बालमनातील शंकांचे निरसनही केले. उद्बोधन करणाऱ्या कार्यक्रमाची क्षणचित्रे 



.

Sunday, June 22, 2025

आंतरराष्ट्रीय योग दिन

 विद्या मंदिर 

मराठी प्राथमिक विभाग. 

नमस्कार🙏🏻

शनिवार दिनांक २१/०६/२०२५  रोजी  'आंतरराष्ट्रीय योग दिवस' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जागतिक योग दिन साजरा करण्याचे हे ११ वे वर्ष.'हिमालयीन समर्पण ध्यान योग' या संस्थेतर्फे आलेल्या माननीय श्रीमती संजीवनी निलवर्ण तसेच त्यांचे सहाय्यक यांनी इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांची योगासनाची विविध प्रात्यक्षिके घेतली. विशेषतः ध्यानधारणेचे महत्त्व बालकथेतून सांगितले. तसेच विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष ध्यानधारणेचा अनुभव घेतला.शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योगाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व सांगितले. शरीर, मन, आत्मा यांना जोडण्याचे कार्य योग करते. इयत्ता पहिली व दुसरीच्या चिमुकल्यांनीही आपल्या शिक्षकांसह योगासनाची विविध प्रात्यक्षिके केली.

त्याची काही क्षणचित्रे. 🙏🏻





प्रवेशोत्सव

 विद्या प्रसारक मंडळाचे विद्या मंदिर

 मराठी प्राथमिक विभाग दहिसर पूर्व

शैक्षणिक वर्ष २०२५-२६

          दि.१६/०६/२०२५ रोजी नवीन शैक्षणिक वर्षात सर्व विद्यार्थ्यांचे मोठ्या जल्लोषात टाळ्यांच्या गजरात सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने शालेय प्रांगण बहरले.

          शाळा समिती अध्यक्षा श्रीमती मेधाविनी कुलकर्णी मॅडम, मुख्याध्यापिका श्रीमती राजेश्री वेदपाठक मॅडम, शाळा समिती सदस्या श्रीमती गोसावी मॅडम, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्ग व उपस्थित सर्व विद्यार्थी यांच्या  सहभागाने अत्यंत उत्साहात आनंदाने आजचा कार्यक्रम बहरला.

विद्यार्थ्यांना नवीन  शैक्षणिक वर्षानिमित्त भेटवस्तू व पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले.

        अशा प्रकारे उत्साहवर्धक वातावरणात नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली.

त्याची क्षणचित्रे. 🙏🏻