सुजाण पालकत्व - इयत्ता १ ली व 2री
आपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास चांगल्या प्रकारे व्हावा, अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. हा विकास करताना नेमका कोणत्या मार्गाचा वापर करावा, पाल्याच्या समस्या कशाप्रकारे सोडवाव्यात यासाठी आजच्या आधुनिक काळात सुजाण पालकत्व ही निकडीची गरज होत चाललेली आहे.

आपले मूल जर एक आदर्श विद्यार्थी म्हणून घडावा असेज्या पालकांना वाटते, त्या पालकांचे वर्तनही त्यानुसार असावे, असे आवर्जून सांगण्यात आले.मुलांना जर आपल्याला एखाद्या वाईट गोष्टीपासून परावृत्त करायचे असेल त्यांना विरोध न करता त्याचे सर्व दुरुपयोग विद्यार्थ्यांना समजावून सांगणे. गुलांचे वर्तन कुठे खटकत असेल तर पालकांनी त्याचे परीक्षण करून योग्य तो बदल करणे. विदयार्थ्यांच्या वाढीच्या दृष्टीने सकस आहाराचे महत्त्व सांगण्यात झाले. विदयार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी त्यांना फक्त अभ्यासात न अडकवता चित्रकला, नृत्य, अभिनय अशा क्षेत्रातही सहभाग घेण्यास प्रोत्साहन दयावे नोकरदार पालकांनी निदान एक तास तरी पाल्याशी संवाद साधण्यासाठी वेळ दयावा, जेणेकरून मूल मोबाइलपासून दूर ठेवता येईल. घरातील आजी आजोबांचा सहवास अधिकाधिक आपल्या पाल्याला मिळेल, अशादृष्टीने पालकांनी प्रयत्न करावेत, असे
आवाहनही करण्यात आले.कार्यक्रमाच्या शेवटी काही पालकांनी विदयार्थ्यांशी संबंधित समस्यात्मक
प्रश्न विचारले. त्यांच्या शंकेचे निरसन करण्यात आले. या कार्यक्रमाला
पालकांचा उत्सफूर्त प्रतिसाद लाभला. अशाप्रकारचा उपक्रम शाळेने पालकांसाठी राबवला,
यासाठी काही पालकांनी शाळेचे आभार मानले.