Tuesday, October 19, 2010

नमस्कार...आचार्य... विरुद्ध गुड मॉर्निंग टीचर...


काही दिवसांपूर्वी शाळेतील आजी विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्गात जाऊन भेटण्याचा योग आला ...तेव्हा वर्गात प्रवेश करताच सर्व विद्यार्थी वन... टु... गुड मॉर्निंग टीssssचर. असा घोष करीत कसेतरी उभे राहिले. हे दृश्य अतिशय विचित्र वाटलं ... मराठी माध्यमाच्या वर्गात शिक्षकांचे स्वागत इंग्रजीमधून व्हावे हा विरोधाभास वाटला...मृदुला कुलकर्णी
भाषेचा मुद्दा सोडला तरी आपली संस्कृती लक्षात घेता शिक्षकांनी वर्गात येताच विद्यार्थ्यांनी केवळ उठून उभे राहून हात जोडून नमस्कार करणे बरे दिसते. त्या साठी उगाच काही वेळ घालवून बालिश पणाने वन ... टु... असे म्हणत स्वागत करणे काही बरे वाटत नाही. एवढेही जमत नसल्यास केवळ उठून उभे राहणे पुरेसे आहे...
नमस्कार करण्यामागचा किंवा उठून उभे राहण्या मागचा उद्देश शिक्षकांना सन्मान देणे एवढाच असतो... त्याकरता विद्यार्थ्यांनी केवळ उठून नमस्कार करणे एवढी क्रिया पुरे आहे असे मला वाटते ...
आपली शाळा संस्कृतीचे जतन करणारी एक अग्रगण्य संस्था आहे ...  तेव्हा कृपया वरील मुद्द्याचा विचार केला जावा अशी विनंती ...
धन्यवाद ...
मृदुला कुलकर्णी ...

3 comments:

Abhishek Redekar said...

you are right but in future students are going to use English statmnts only so keep the both style...
means as per the langauge lect....

Nishant said...

Mrudula i respect ur point of view but i have some different openion coz i feel that Marathi medium students should speak in English as and when required greeting in Marathi is not going to fetch anything but speaking in English will make them competant to face the world outside....if i would have been in ur place then i would have taken it in positive sense... Sticking to Marathi is not going to help any student but Learning n speaking English will deffinately make them competant. i dont want any of Marathi medium students to falter when they speak in public so i think Aplya Marathicha maan rakhna is important but not by only speaking it.... coz it does not help..
(Note: my comments r not intended to hurt anyone its just that m putting forward my point in practical way)

Samarth Consultancy said...

हो मृदुला तुझे म्हणणे बरोबर आहे ---------- अवधूत जोशी