Tuesday, October 19, 2010

शाब्बास ! आगे बढो !

आमच्या दोन माजी विद्यार्थिनी आणि इयत्ता 9 वी मध्ये शिकत असलेला एक आजी विद्यार्थी ह्यांच्या सुयशाने आम्ही हरखून गेलो आहोत.

तीन शिलेदार 

कु. आकांक्षा राणे - (शालान्त परीक्षा 2005)

आकांक्षा मुंबई विद्यापीठाचा बीएससी 2010 परीक्षेत गणितात 91% गुण मिळवून सर्वप्रथम आली आहे. आता गणितातच संशोधन करून डॉक्टरेट मिळवण्याची तिची महत्त्वाकांक्षा आहे.कु. आकांक्षा राणे

 

एसएससीपासूनच कोणत्याही कोचिंग क्लासला न जाणारी आकांक्षा, सुप्रसिद्ध गणितज्ज्ञ आणि "इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स' चे भूतपूर्व संचालक डॉ. व्ही. व्ही. राणे ह्यांची कन्या आहे.

कु. मृदुला कुलकर्णी - (शालान्त परीक्षा 2003) मृदुलाने "वेदान्त शास्त्रा'मध्ये मुंबई विद्यापीठाच्या एम.ए. 2010 परीक्षेत सुवर्णपदक मिळवलेले आहे. कु. मृदुला कुलकर्णी

मृदुलाचा शास्त्रीय संगीताचाही अभ्यास असून संस्कृत श्लोक गाण्याची तिला आवड आहे. इतकेच नाही तर लावण्या आणि फिल्मी गाण्यांचे संस्कृतमध्ये रूपांतर करून गाण्याचा तिचा अनोखा छंद आहे.

कु. ओंकार मसूरकर, 9वी ब (इंग्रजी माध्यम)

ओंकारने राष्ट्रीय स्तरावरील 2010 ची एनटीस शिष्यवृत्ती पटकु. ओंकार मसूरकरकावली आहे. त्याच्या ह्या यशाचे टप्पे पुढीलप्रमाणे आहेत :

टप्पा 1 - एसटीएस (राज्यस्तरीय). राज्यातून निवडलेल्या 500 विद्यार्थ्यांपैकी एक. गुण 164/200 थिअरी

टप्पा 2 - एनटीएस (राष्ट्रीय स्तर). अखिल भारतातून निवडलेल्या 4000 विद्यार्थ्यांपैकी एक. गुण 165/200 थिअरी

टप्पा 3 - एनटीएस (राष्ट्रीय स्तर). अखिल भारतातून निवडलेल्या 1000 विद्यार्थ्यांपैकी एक. गुण 19/25 मुलाखत.

भारतात 25 वा क्रमांक

No comments: