Thursday, May 20, 2010

सूर्य पेरणारा माणूस

प्रवीण दवणे
आकाशाला गवसणी घालण्याची झेप असलेल्या आणि आकाशाची उंची व व्यापकता असलेल्या सतीश हावरे यांचे जीवन/लेखणीबद्ध करण्याचे काम केले ते प्रा. प्रवीण दवणे!

सतीश हावरे हे प्रंचड आत्मविश्वास, ऊर्जा आणि सकारात्मक दृष्टीकोन असलेली व्यक्ती. बांधकाम खात्यात क्रांतिकारक बदल! अल्पगटापासून (श्रमिकांपासून) ते धनिकांपर्यंत इमारती बांधल्या. मराठी तरुणांना सतत व्यवसायाभिमुख होण्याचे मार्गदर्शन.

मराठी माणूस आणि मराठी माती यांबद्दल सतीशजींना पराकोटीचा अभिमान होता. मराठी माणूस जर अधिक ध्येयवादी होईल, अधिक प्रयत्नवादी होईल तर जग सहज पादाक्रांत करेल अशी त्यांची खात्री होती. स्वत:ला कामात झोकून द्या. मायाममतेच्या नात्यांचा आदर करा, पण त्यांचा कोश करु नका. पंख उघडून आकाशात भरारी घ्या. क्षेत्र कुठलंही असो, सर्वोत्तम व्हायचं हा ध्यास. उद्दिष्ट अन् कर्म शुद्ध असेल तर विजय तुमचाच! अशी ही सतीश हावरे या तरुण व्यवसायिकाच्या विजयगाथेचा हा प्रवास.

प्रत्येक पालक शिक्षक आणि जिंकू इच्छिणा-या प्रत्येक कोवळ्या मनासाठी! प्रत्येकानेच वाचावे असे हे पुस्तक!

पल्लवी राजाध्यक्ष
पर्यवेक्षक, मराठी माध्यमNo comments: