Saturday, February 2, 2008

चिंतन

संस्था ही कोणतीही असो सरकारी, सहकारी, खाजगी वा धर्मार्थ.
संस्थेत ठराविक तास काम करणे
हा झाला कायदा
मी पगार घेतो म्हणून काम करतो
हा झाला व्यवहार
पण कामात स्वत:ला झोकून देणे
ही झाली नैतिकता
संस्थेच्या अस्तित्वाची, सुरक्षिततेची, प्रतिष्ठेची योग्य काळजी घेण्याचे कार्य मला पार पाडावयाचे आहे
ही झाली आपुलकी
संस्थेची प्रगती आहे तोवरच माझे अस्तित्व कायम आहे. माझी प्रतिष्ठा आहे म्हणून संस्थेला हानीकारक ठरेल, अशी कृती मी कधीही करणार नाही. परंतु सामाजिक ऋण फेडण्याच्या भावनेने स्वत:ला कामात वाहून घेईन, ही प्रत्येकाची भावना असली पाहिजे.
यातच संस्थेचा विकास व स्वत:चा उद्धार आहे.

(संकलन : सौ. संध्या समुद्र)

2 comments:

Unknown said...

thanks it is very usefull.

Unknown said...

Thanks for this tips