Wednesday, August 12, 2009

Precautions can keep swine flu at bay

 image

 1. Wash your hands frequently

Use the antibacterial soaps to cleanse your hands. Wash them often, at least 15 seconds and rinse with running water.

2. Get enough sleep

Try to get 8 hours of good sleep every night to keep your immune system in top flu-fighting shape.

3. Drink sufficient water
Drink 8 to10 glasses of water each day to flush toxins from your system and maintain good moisture and mucous production in your sinuses.

4. Boost your immune system
Keeping your body strong, nourished, and ready to fight infection is important in flu prevention. So stick with whole grains, colorful vegetables, and vitamin-rich fruits.

5. Keep informed
The government is taking necessary steps to prevent the pandemic and periodically release guidelines to keep the pandemic away. Please make sure to keep up to date on the information and act in a calm manner.

6. Avoid alcohol
Apart from being a mood depressant, alcohol is an immune suppressant that can actually decrease your resistance to viral infections like swine flu. So stay away from alcoholic drinks so that your immune system may be strong.

7. Be physically active
Moderate exercise can support the immune system by increasing circulation and oxygenating the body. For example brisk walking for 30-40 minutes 3-4 times a week will significantly perk up your immunity.

8. Keep away from sick people
Flu virus spreads when particles dispersed into the air through a cough or sneeze reach someone else’s nose. So if you have to be around someone who is sick, try to stay a few feet away from them and especially, avoid physical contact.

9. Know when to get help
Consult your doctor if you have a cough and fever and follow their instructions, including taking medicine as prescribed.

10. Avoid crowded areas

                             "Precaution is better than Cure"
The school will remain closed from 12th August to 19th August as precautionary measure. Other schools in the vicinity have also decided to suspend the classes for a week.
(Photo : H1N1 Virus : Wikipedia)

Friday, August 7, 2009

सुजाण पालकत्व. - बालरोग तज्ञ - डॉ. सौ. अंजली भाटवडेकर.

आमच्या बालोद्यान विभागात नवीन प्रवेश घेऊन आलेल्या छोट्या विद्यार्थ्यांच्या पालकांशी जवळून परिचय व्हावा म्हणून एक स्वागत समारंभ रविवार दिनांक 19/07/2009 रोजी आयोजित केला होता. या समारंभाचे औचित्य साधून पालकांना त्यांच्या मुलांचा शारीरिक, मानसिक विकास योग्य तऱ्हेने करता यावा यासाठी बालरोग तज्ञ डॉ. सौ. अंजली भाटवडेकर यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान सुजाण पालकत्व या उपक्रमांतर्गत आयोजित केले होते. या उपक्रमाचे हे सातवे वर्ष होते. या कार्यक्रमासाठी पालकांचा उत्तम प्रतिसाद होता.

 

सकाळी 9.30 वाजता पाहुण्यांच्या स्वागताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सौ. सुषमा प्रधान यांनी आपल्या मान्यवरांची ओळख करुन दिली. संयुक्त कार्यवाह श्री. जयंत गाडगीळ यांनी पुष्पगुच्छ देऊन पाहुण्यांचे स्वागत केले व कार्यक्रमाची प्रस्तावना केली. प्रकल्प समन्वय आरोग्य समितीच्या डॉ. सौ. वसुंधरा  नाटेकर यांनी पाहुण्यांचा थोडक्यात पण मुद्देसूद परिचय करून दिला. डॉ. सौ. अंजली भाटवडेकर या अनेक वर्ष बालरोग तज्ञ म्हणून काम करीत आहेत. विविध संस्थांमध्ये आणि शाळांमध्ये जाऊन पालकांना मार्गदर्शन करतात विलेपार्ले येथे वर्षातून 4 वेळा या प्रकारच्या कार्यशाळा घेतात. त्यानंतर पाहुण्यांना पालकांना मार्गदर्शन करण्याची विनंती केली.


IMG_0087__Large_ सकाळी 9.45 वाजता डॉ. सौ. भाटवडेकर यांनी व्याख्यानास सुरुवात केली. 

‘‘या वयातील मुलांचे प्रश्न वेगवेगळे असतात. प्रत्येक आईला वाटते आपले मूल जेवत नाही. बारीक दिसते. अभ्यास करत नाही.प्रत्येक मुलाची शारीरिक, मानसिक जडणघडण वेगळी असते. सख्खी भावंडे असली तरी त्याच्या वाढीत, स्वभावात फरक असतो. त्यांना शारीरिक, मानसिक वाढीचे खूप टप्पे पार करायचे असतात. आपण प्रथम आहाराविषयी जाणून घेऊ. ’’

‘‘मूल बारीक दिसते म्हणून त्यांची दुसऱ्या मुलांबरोबर तुलना करू नका.  ते निरोगी व सर्वसामान्य आहे ना ते पहा.  तो वारंवार आजारी पडत नाही, त्याच्या हालचाली योग्य आहेत, त्याचा विकास योग्य होतो आहे का ते पहा. या मुलांच्या प्रत्येक टप्प्यात त्याच्या वजनाची वाढ कमी जास्त होते. कधी त्याचे वजन वर्षाला अर्धा ते एक किलोपर्यंत वाढते तर कधी ते स्थिर रहाते. पण त्याचे वजन फार कमी होत नाही ना इकडे लक्ष द्यावे. त्यांना टॉनिक आवश्यक नसते. ( जर ते वारंवार आजारी पडत नसेल तर ) सर्दी खोकला हे मोठे आजार नाहीत. वारंवार ताप येणे, तो न उतरणे, पोट बिघडणे हे आजार असतील तर काळजी घ्या. या मुलांचा आहार समतोल असावा.  एका कार्यशाळेत आहाराविषयी अभ्यास केला असता असे सिध्द झाले की महाराष्ट्रातील आहार हा समतोल व योग्य पध्दतीचा आहार आहे.  त्यांच्या वाढीसाठी प्रोटीन्स लागतात. ती अंड्यामधून मुबलक प्रमाणात मिळतात म्हणून ज्या मुलांना अंडे आवडते त्यांना ते द्या. पण अंडे उकडून द्या. त्याच बरोबर चणे, शेंगदाणे, डाळी, कडधान्य व ड्रायफ्रुट यांतून प्रोटीन्स मिळतात.ज्वारी, बाजरी, तांदूळ यांतून कार्बोहायड्रेड मिळते. तेल, तूप यांतून स्निग्ध पदार्थ मिळतात. या सर्व पदार्थांचा आहारात समावेश करावा. जीवनसत्त्व अ हे केशरी रंगाच्या भाज्या, गाजर,  भोपळा, पपई, आंबा यातून मिळते.  ते डोळ्यांसाठी फार चांगले असते.जीवनसत्व ब हे भाज्या, फळे, अंडे यातून मिळते. जीवनसत्त्व क हे आंबट पदार्थ, लिंब, आवळा, संत्रे यातून मिळते. दातांसाठी व योग्य वाढीसाठी हे फार उपयुक्त आहे.

मुलांच्या पोटात चोथा म्हणजे फायबर हे गेले पाहीजे. त्यांना भाज्या, फळे खाण्याची सवय लावणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही त्यांना देणारा पदार्थ कल्पकतेने बनवा. पावभाजी, कटलेट, थालीपीठ, आंबोळी यांसारखे पदार्थ, कोशिंबीर, फ्रुटज्युस, मिल्कशेक हे देऊ शकता. या वयातील मुलांना फार दूध देऊ नये.  मूल सहा महिन्यांचे झाल्यानंतर दूध नाही प्यायले तरी चालते. त्याला पहिले सहा महिनेच दुधाची गरज असते. मुलांना जे आवडते ते खाऊ दे. त्यांनी पोळीच खावी किंवा भातच खावा असा हट्ट करू नये. मुलांना त्यांचे पोट भरले की कळते. त्यांना आग्रह करून - फिरून भरवू नये. कुटुंबातील सर्वांनी शक्य असेल तेव्हा एकत्र बसून जेवावे. टी.व्ही.समोर बसून जेवायची सवय लावू नका. तसेच पालकांनीही टी.व्ही.चे कार्यक्रम बघत जेवू नये.

जंक फूड, मॅगी, वेफर्स, फरसाण हे पदार्थ वारंवार देऊ नये. या सर्व पदार्थांपासून कोणतेही आवश्यक घटक शरीरासाठी मिळत नाहीत. या उलट हे पदार्थ वारंवार खाण्यात आल्यास त्याचे दुष्परिणाम आढळतात. ( मॅगी खाल्यामुळे युरिनचा प्राब्लेम होऊ शकतो. मुले अस्थिर, चिडचिडी होतात.) या ऐवजी आपण मुलांना चिक्की, फळे, चणे, कुरमुरे, शेंगदाणे हे पदार्थ देऊ शकतो. या मुलांना गूळ जरुर द्यावा. गूळामध्ये कॅल्शिअमचे प्रमाण भरपूर असते. बेकरीचे पदार्थ उदा. बिस्किट, टोस्ट, खारी हे खूप कमी प्रमाणात द्यावे. कारण या सर्व पदार्थांत फक्त मैदाच असतो.

मुलांना रोज दोन वेळा दात घासण्याची सवय लावणे आवश्यक आहे. काही गोड पदार्थ खाल्यावर त्यांना चूळ भरण्याची सवय लावावी. चॉकलेट खूप कमी प्रमाणात द्यावे. कोल्ड्रिंक्स मुलांना देऊ नयेत. त्यापेक्षा घरी बनवलेले सरबत, पन्हे हे पदार्थ द्यावेत.

मुलांना दहा तास झोपेची गरज असते.  त्यांना रात्री दहा वाजता तरी झोपण्याची सवय लावावी. झोप पूर्ण झाली नाही तर मूल चिडचिडे होते, त्यांन भूक लागत नाही.  मुलांनी झोपण्यापूर्वी टी.व्ही. वरील काहीना भयावह गोष्टी बघितल्या तर ती घाबरतात म्हणून मुला़ना झोपण्यापूर्वी दोन तास तरी टी.व्ही. पाहू देऊ नये. टी.व्ही. मुलांनी एक तास पाहावा. मुले टी.व्ही. बघताना आपण ही शक्यतो त्यांच्याबरोबर बसून टी.व्ही. वरील कार्यक्रम पहावा.  आपण काय पाहतो त्यावर चर्चा करा.  त्याला समजावून सांगा.

मुलांना राग येतो पण तो कसा व्यक्त करावा ते कळत नाही. राग नेहमी योग्य व्यक्तिपुढे, योग्य वेळीच व्यक्त करावा हे त्याला समजावून सांगा. मुलांनी केलेली एखादी गोष्ट आईला आवडली नाही तर तिने ते मला आवडले नाही असे सागांवे. मी बाबांना सांगेन असे अजिबात सांगू नये.

मुलांचा बुद्ध्यांक (I.Q. ) जेवढा महत्त्वाचा तेवढाच भावनांक (E.Q.) महत्त्वाचा आहे. त्याला भावना ओळखायला शिकवा. त्याला एखाद्या गोष्टीचा आनंद झाला तर त्याला तुम्ही तसे सांगा उदा- आज तुला नवीन खेळणे आणले म्हणून तुला खूप आनंद झाला आहे. त्याला एखाद्या गोष्टीचे वाईट वाटते, उदा - तुला बाबा रागावले किंवा तुझे आवडते खेळणे तुटले म्हणून तुला खूप वाईट वाटले ना? असे सांगा म्हणजे त्याला भावना व्यक्त करणे समजेल. त्याला चांगल्या सवयी लावा. व्यायामाची सवय लावअ. यासाठी त्याच्याबरोबर तुम्ही त्या गोष्टी करा. सूर्यनमस्कार हा कमी वेळातील सर्वांगीण व्यायाम आहे. त्याचा आत्मविश्वास वाढवा.

मूल आठ ते नऊ वर्षाचे होईपर्यंत त्याच्यातील चांगले गुणधर्म ओळखा. मुलातील एखादे चांगले कौशल्य कसे विकसित होते ते पहावे. त्यासाठी त्याला जरूर मदत करावी.’’

त्यानंतर पालकांनी विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी उत्तरे दिली.
बालोद्यान शिक्षिका कु. संगीता तांबे यांनी सर्वांचे आभार मानले. त्यानंतर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

Thursday, August 6, 2009

पाठीचा कणा ताठ कसा ठेवावा?

           व्यक्तीची उचित घडण व्हावी, ज्ञानवृद्‌धी बरोबरच त्यांच्यात तेजस्विता, धाडसीवृत्ती वाढावी, तसेच जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची सवय जडावी, नवकल्पना नवे विचार व्यक्त करता याव्यात, निकोप स्पर्धांना सामोरे जाण्याची ईर्ष्या अंगी बाणावी यासाठी कणा ताठ ठेवण्याचे दहा मार्ग अत्यंत मार्गदर्शक आहेत. सक्षम, सदृढ, संपन्न व प्रसन्न जडण -घडणीसाठी सदर अभ्यास मोलाचा आहे.
           जीवनात निश्चित ध्येय वास्तवात आणण्यासाठी दुर्दम्य इच्छाशक्ती व स्वत:वरचा ठाम विश्वास, करारीपणा, निर्भिडपणा, स्पष्टवक्तेपणा, आवश्यक तेथे लवचिकता इत्यादी गुणांवर प्रकाशझोत टाकणारे मार्गदर्शन मोलाचे वाटले. सदर पुस्तकाचा आशय लक्षात घेतल्यानंतर ‘ कोलंबसाचे गर्वगीत’ या कवितेची प्रकर्षाने आठवण झाली.
आपले उद्दिष्ट स्पष्ट नसले की, विचारांचा आश्रय घेतला जातो. निराधार विचार थैमान घालू लागतात आणि म्हणूनच जी कृती करायची आहे. त्याबाबतीत योग्य दृष्टिकोन असणे आवश्यक आहे. लोकमान्य टिळक मंडाले तुरुंगात असताना त्यांना शारीरिक, मानसिक क्लेश भोगावे लागले. इंग्रज सरकारच्या दमन - चक्रापुढे ते थकले नाहीत. ते परिश्रमपूर्वक पाली, हिब्रू , फ्रेंच, जर्मन भाषा शिकले. जर्मन भाषेतील बेबरचा ग्रंथ त्यांनी वाचला. दर तासाला 5 पाने याप्रमाणे त्यांनी तो ग्रंथ पूर्ण केला. बंदिवासात असताना स्वत:च्या स्वाभिमानी वृत्तीमुळे ते आपला वेळ सत्कर्मात घालवू शकले.
           आपल्याबद्दल लोक काय विचार करतात, याचा विचार करायचा नाही. अहंकाराच्या अंबारीत बसलेल्या विद्वान सम्राटाला आकर्षित करण्याचे व अंबारीतून उतरवण्याचे सामर्थ्य आपल्या सखोल विचारपूर्वक कामात असणे आवश्यक आहे. त्यामुळे स्वत:चा आत्मसन्मान वाढतो.
           हे  स्पर्धेचे युग आहे . ज्ञानाच्या कक्षा वाढल्या आहेत. तंत्रज्ञानामुळे जग जवळ आले आहे. आणि त्यामुळे स्वत:च्या प्रगतीसाठी करारी व सखोल विचारपूर्वक निर्णय घेण्याची क्षमता असणे आवश्यक आहे. एकंदरीत ताठ कण्यामुळे स्वत:च्या प्रगतीची दिशा ठरविता येते. कर्तव्यपूर्ती करता येते, आत्मविश्वास वाढतो. सकारात्मक भूमिका निर्माण होते. आपण निर्भयपणे जगू शकतो.
“Get Better or get Battered”
      “पाठीचा कणा ताठ कसा ठेवावा?” ङीम. सुझान मार्शक यांच्या पुस्तकावर आधारित आपला लेख वाचून मनाला आनंद झाला. व त्याविषयी श्रीम. म्हात्रे बाई आपली मते नोंदवू इच्छितात.
1. येणा-या आव्हानावर आरुढ व्हावे लागते, पळवाटा काढून चालणार नाही.
2. व्यक्ती तितक्या प्रकृती त्यामुळे विचार करण्याची क्षमता नक्कीच प्रत्येकाची वेगळी. त्या ब-या - वाईट विचारसरणीला सामोरे जावे लागते. खचून चालत नाही. तरीही मनाला थोडेफार दु:ख होते, हा परिणाम होतोच, हा माझा नकारात्मक दृष्टिकोन नाही. मानवी मन म्हणजे दगड नाही तर ते संवदेनशील असते.
3. सखोल विचारपूर्वक काम मनाला उभारी देते हे काम करत असताना टीका, निराशा, द्वेष याचा काहीही परिणाम होत नाही.
4. माणसाने सकारात्मक दृष्टिकोन ठेवूनच जीवनाला सामोरे जावे लागते.
5. कवी कुसुमाग्रजांच्या कवित्तेतला तरुण नायक म्हणतो.
मोडून पडला संसार तरी, मोडला नाही कणा.
पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा.

मराठी माध्यमिक विभाग.
प्रकल्प प्रमुख
राजाध्यक्ष मॅडम