Thursday, October 18, 2007

संगणक आणि मराठी माध्यम

मराठी माध्यमातील शिक्षकांमध्ये संगणक वापरण्याची, ई-मेल खाते तयार करण्याविषयी किंवा संपर्कासाठी अथवा ज्ञानसाधनासाठी इंटरनेट वापरण्याविषयी अनास्था दिसून येते. त्याची अनेक कारणे आहेत; पण त्याविषयी नंतर कधीतरी. जे लोक सध्या इंटरनेट वापरत आहेत, माहिती तंत्रज्ञानाचा परिणामकारक वापर करीत आहेत तेही कसे अज्ञानात चाचपडत आहेत ह्याविषयीचे एक लहानसे स्फुट येथे वाचनात आले.

अर्थात मराठी शिक्षकांच्या आणि मराठी माणसांच्या ह्या अनास्थेमुळे मराठी शास्त्रज्ञ निराश झाले आहेत असे मात्र दिसत नाही. मराठी विज्ञान परिषद पत्रिका आजही ते नेटाने चालवीत आहेत. विज्ञान विषयाची आकर्षक मांडणी मराठीतूनही करता येते ह्यावर आज विश्वास ठेवायला जे मराठी भाषक तयार नाहीत त्यांनी ही पत्रिका अवश्य नजरेखालून घालावी. वर्षाला रु.130/- इतक्या अत्यल्प वर्गणीमध्ये ही पत्रिका उपलब्ध आहे. (पण वर्गणी भरण्याचे कष्ट घ्यावे लागतात). परिषदेचा पत्ता आणि विज्ञान लोकप्रिय करण्याबद्दल परिषदेला मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्काराच्या अनुषंगाने माहिती येथे उपलब्ध आहे.

(Font problem? Download 'Mangal' here or here and find installing instructions below:)

Installing Fonts:

Windows 2000/XP:
1. Download font (or .zip file containing font) to a temporary location (e.g., the desktop).
2. Open the 'Fonts' folder (Windows 2000: Start > Control Panel > Fonts; Windows XP: Start > Control Panel > Appearances and Themes > Fonts).
3. Drag font file (not the .zip file) into Fonts folder. Applications need to be restarted in order to recognize the font.

1 comment:

arif khan said...

Nice Information! I personally really appreciate your article. This is a great website. I will make sure that I stop back again!.