Monday, February 2, 2009

वास्तुप्रवेश

रविवार दिनांक 1 फेब्रुवारी 2009 हा आपल्या शाळेच्या इतिहासातला एक हृद्य दिवस म्हणून स्मरणात राहणार आहे. शाळेच्या नव्या इमारतीच्या तळमजल्यावरील सभागृहात श्री गणेश आणि श्री सरस्वति ह्या विद्येच्या देवतांचे विधिवत्‌‌ पूजन करून प्रवेश करण्यात आला.

IMG_6439_copya

मंडळाचे आद्य अध्यक्ष कै. श्री. अप्पासाहेब ठाकरे ह्यांचे चिरंजीव आणि सध्या मंडळाचे खजिनदार असलेले श्री. प्रफुल्ल ठाकरे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. क्षमा ठाकरे ह्यांच्या शुभहस्ते ही पूजा करण्यात आली. सोबतच्या चित्रामध्ये मंडळाचे संकुल प्रमुख श्री. सदाशिव परांजपे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. शैला परांजपे शुभप्रवेशप्रसंगी ठाकरेदंपतीचे स्वागत करताना दिसत आहेत.

P1570055_copya

हा सोहळा पाहण्यासाठी श्री. सुरेश ठाकूर ह्यांचे पार्ले टिळक विद्यालयातील शिक्षक आणि आपल्या शाळेचे देणगीदार श्री. साने सर आवर्जून उपस्थित होते.

दरवर्षी गाजणारा बालोद्यानातील विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या आवडीचा बाहुला-बाहुलीच्या लग्नाचा सोहळा नंतर ह्या सभागृहात उत्साहाने साजरा झाला. कार्यक्रमासाठी नवी वास्तू उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षक-शिक्षकेतरांच्या उत्साहाला उधाण आले होते.

IMG_6463_copya

ह्या प्रसंगी श्री. विक्रम ठाकरेश्री. कौस्तुभ ठाकरे ह्या ठाकरे घराण्याच्या पुढच्या पिढीतील शाळेच्या माजी विद्यार्थ्यांतर्फे रु.1,00,001/- रुपयांची देणगी घोषित करण्यात आली.

शाळेचे आणखी एक आदर्श माजी विद्यार्थी श्री. विजय यशवंत म्हसकर ह्यांच्यातर्फे रु.50,000/- रुपयांची तर बालोद्यान शाळा समितीच्या अध्यक्षा सौ. मेधाविनी कुलकर्णी ह्यांच्यातर्फे रु.25,000/- ची देणगी देण्यात आली.

श्री. विकास पाटणेकर, श्री. राहुल केळकर, श्री. निशिकांत हंबीर आणि श्री. गांधी ह्यांनीही देणग्या दिल्या. जय व जाई ह्या बाहुला-बाहुलीच्या लग्नानिमित्त अशा रीतीने घसघशीत अहेर मिळाला.

इयत्ता 10 वी चा निरोप समारंभ, बालोद्यानाचे शिबिर आणि इ.4 थी चे निवासी शिबिर हे कार्यक्रमही लवकरच ह्या सभागृहात आयोजित होणार आहेत.

छाया – श्री. निशिकांत हंबीर

1 comment:

प्रभाकर फडणीस P.K. Phadnis said...

नमस्कार,
मी विलेपार्ले येथील एक ज्येष्ठ नागरिक आहे. आपण website आणि blog या दोन्ही माध्यमांचा उत्तम उपयोग करत आहात हे पाहून फार बरे वाटले. मधूनमधून मी आपला ब्लॉग पाहत असतो. विद्यार्थी, माजी विद्यार्थी, पालक व हितचिंतक, देणगीदार यांचेपर्यंत पोचण्यासाठी नव्या युगाची ही माध्यमे उत्तम प्रकारे वापरून काळाबरोबर आहात याबद्दल आपले अभिनंदन.
मराठीमध्ये तरी इतर कोणत्याही शाळेचा ब्लॉग मला आढळलेला नाही. तसे असेल तर पहिला नंबर पटकावल्याबद्दलही अभिनंदन.
प्र. के. फडणीस