दैनिक मुंबई सकाळ तर्फे घेण्यात आलेल्या ग्रेट आर्टिस्ट स्पर्धेत अ गटात दहिसरच्या विद्या प्रसारक मंडळ, विद्या मंदिर इंग्रजी माध्यमिक विभाग सहावी अ मधील कुमारी मिता प्रशांत देव हिला प्रथम क्रमांकाचे रु.21,000/- चे रोख पारितोषिक मिळाले आहे. इ. 4थी ते 7वी तील विद्यार्थ्यांचा या गटात समावेश होता.
विद्यार्थी आणि शिक्षक तसेच अन्य वाचकांसाठी वेगवेगळ्या गटात ही स्पर्धा घेण्यात आली होती. विद्या प्रसारक मंडळातर्फे मिताचे हार्दिक अभिनंदन.
मितासारखे अनेक गुणी चित्रकार विद्यार्थी आणि त्यांचे पालक तिच्या ह्या यशापासून स्फूर्ती घेतील आणि आपल्या कलासाधनेसाठी जोमाने प्रयत्नशील राहतील असा आम्हाला विश्वास आहे.
No comments:
Post a Comment