Showing posts with label Achievements. Show all posts
Showing posts with label Achievements. Show all posts

Thursday, January 16, 2014

"विज्ञान प्रकल्पाची राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड"

दिनांक - ९/०१/२०१४

मराठी माध्यमिक विभागाच्या "विज्ञान प्रकल्पाची राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड"

         शिक्षण निरीक्षक, बृह्न्मुंबई पश्चिम विभाग, जोगेश्वरी यांच्या द्वारा बालविकास विद्यालय, जोगेश्वरी (पूर्व) येथे आयोजित जिल्हास्तरीय विज्ञान  प्रदर्शनात  ’विद्या मंदिर - दहिसर’ या शाळेने ’सौरऊर्जेचा’ वापर करुन  वातानुकूलन हा प्रकल्प सादर केला होता.
          या प्रकल्पाला प्रथम क्रमांक प्राप्त झाला असून या प्रकल्पाची राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. 

Friday, November 2, 2012


प्रसिध्द साहित्यिक भीमसेन देठे यांच्या हस्ते दोन पुस्तकांचे प्रकाशन
स्थळ : - विद्या मंदिर, दहिसर 


अश्रू आणि हास्य यांचा सुरेख संगम म्हणजे जीवनायन. तर जीवनाचे अनेक भावकंगोरे उलगडणारा चारोळी संग्रह म्हणजे ‘रंगछटा’ आहे. स्त्रीकडे आणि स्त्रीत्वाकडे बघण्याचा वेगळा दृष्टीकोन यात आहे आणि विशेष म्हणजे प्रकाशिका उषा रसाळ यांनी एका नवोदित उत्तम कवयित्रीच्या काव्य संग्रहांना मराठी साहित्य क्षेत्रात प्रवेश देऊन स्त्रीत्वाचा गौरव केला असे गौरवोद्‌गार भीमसेन देठे यांनी मनिषा बहिर-घेवडे लिखित ‘जीवनायन’ व ‘रंगछटा’ या दोन काव्यपुस्तकांचे प्रकाशन करताना काढले.

 समारंभाच्या अध्यक्षस्थानी विद्या प्रसारक मंडळाचे सदस्य श्री. अनिल पेंढारकर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ साहित्यिक भीमसेन देठे, शिवाजी रसाळ आणि वैजयंतीमाला मदने उपस्थित होते.

शिवाजी रसाळ यांनी काव्यपुस्तकांचे सुंदर समर्पक आणि अत्यंत मोजक्या शब्दांत विश्लेषण केले. जीवनायन हे केवळ कवयित्रीचे जीवन गाणे नसून समस्त नारी जगताचे गाणे आहे. स्वतंत्र शैली, वाचकाला अंतर्मुख करायला लावणा-या कविता तर दुस-या अंगाने जाब विचारणा-या कविता आहेत.

वसईच्या बहिणाबाई वैजयंतीमाला मदने यांनी स्त्री जीवनाचे, स्त्रीयांवर होणारे अत्याचार आणि स्त्रीचं जगणं यावर सुंदर भाष्य करुन श्रोत्यांच्या काळजाला हात घातला. साडी-चोळीने मनिषाचा सत्कार करुन तिला प्रेरणा व प्रोत्साहन दिले.

माध्यमिक मुख्याध्यापक संघटना (प.विभाग) चे अध्यक्ष संजय पाटील यांनी सुध्दा कवितांवर सुंदर भाष्य केले.

कवयित्री  पल्लवी बनसोडे, कवी सुनिल ओव्हाळ, स्वानंदचे संपादक शशिकांत पिंपळे, तसेच विद्या मंदिर शाळेचे मुख्याध्यापक अविनाश बेंडाळे, प्रा. सुनिल घेवडे आदि मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन सिध्दार्थ गजभिये यांनी केले सुनंदा जोगी आणि शाळेचे विद्यार्थी यांनी  विशेष परिश्रम घेतले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. 





Monday, January 9, 2012

हार्दिक अभिनंदन!

बृह्नमुंबई महानगर पालिका (खाजगी शाळा) शिक्षण विभागातर्फे घेण्यात आलेल्या ‘मनाचे श्लोक’ पाठांतर स्पर्धेत दहिसर ते मालाड विभागातून आपल्या शाळेच्या इ. 2 री च्या विद्यार्थ्यांच्या गटाने प्रथम क्रमांक मिळवला आहे.

Manaache Shlok

स्पर्धा दिनांक - 5/1/2012

स्पर्धा स्थळ - बृ.मुं.म.न.पा बजाज शाळा, कांदिवली (प.)

सहभागी विद्यार्थी

1. कु. मृणालिनी मुकुंद कुलकर्णी - 2 /ब

2. कु. साहिल संजय केणी - 2 /अ

3. कु. ऋतुजा नागेश तरंगे - 2 /बMrs Nainita Tawde

4. कु. यश महेश सावंत - 2 /ब

5. कु. कोटिज्या जनमेजय नेमाडे - 2 /अ

तसे च शिक्षकांसाठी झालेल्या पाठांतर स्पर्धेत श्रीम. नैनिता शैलेश तावडे यांनीही प्रथम क्रमांक मिळवला आहे.

Congratulations!

The awards the students of a school bag in the Interschool Competitions are indicative of the quality of edPradnya Polajiucation in that particular school.

Education Department of BMC, R - ward have conducted a series of competitions till date. We are happy that some of our English Primary students have made us proud. 

Ms. Pradnya  V. Polaji - Std IV - RakheVaishnavi Barvee-Making Competition - First Prize

 

 

Ms. Vaishnavi V. Barve - Std IV Fancy Dress Competition - Second Prize

 

 

Simran Desai Ms. Simran Desai - Std I – Story telling

Consolation Prize

 

 

 

 

Hearty Congratulations to the winners.

- Posted by Nandita Churi

Wednesday, December 14, 2011

ध्रुव संदेश सावंत याचे राष्ट्रीय पातळीवरील स्पृहणीय यश!

कॅम्लीन चित्रकला स्पर्धा 2011-12

भारतातून द्वितीय क्रमांक - कुमार ध्रुव संदेश सावंत

 

अभिनंदन!!!Dhruv Sandesh Sawant

कॅमलीन तर्फे झालेल्या चित्रकला स्पर्धेत आपल्या शाळेत मराठी प्राथमिक विभागात शिकणा-या कु. ध्रुव संदेश सावंत, इ . 2री/ ब, याला पहिल्या फेरीत विरार ते सांताक्रुझ या विभागातून द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. तर पुढच्या फेरीत पूर्ण भारतातून द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे. हार्दिक अभिनंदन!!!

त्याला मार्गदर्शन करणा-या शिक्षिका श्रीमती स्वाती इंदुलकर यांचेही अभिनंदन!

Wednesday, November 30, 2011

अभिनंदन

बृहन्मुंबई महानगर पालिका आर/एन वॉर्ड खाजगी अनुदानित/ विनाअनुदानिततृष्णिका हेमंत शिंदे शाळा आयोजित दि. 25/11/2011 रोजी झालेल्या आंतरशालेय कथाकथन स्पर्धेत इयत्ता पहिलीतून आपल्या शाळेतील मराठी प्राथमिक विभागातील कु. तृष्णिका  हेमंत शिंदे ही प्रथम क्रमांकाची मानकशर्वरी संजीव गाडगीळरी ठरली आहे. तसेच दि. 17/11/2011 रोजी झालेल्या आंतरशालेय ऐतहासिक वेशभूषा स्पर्धेत  इयत्ता  चौथीतून कु. शर्वरी संजीव गाडगीळ ही    तिस-या क्रमांकाची मानकरी ठरली आहे.

ह्या गुणी विद्यार्थिनींचे मनःपूर्वक अभिनंदन.

Tuesday, October 19, 2010

शाब्बास ! आगे बढो !

आमच्या दोन माजी विद्यार्थिनी आणि इयत्ता 9 वी मध्ये शिकत असलेला एक आजी विद्यार्थी ह्यांच्या सुयशाने आम्ही हरखून गेलो आहोत.

तीन शिलेदार 

कु. आकांक्षा राणे - (शालान्त परीक्षा 2005)

आकांक्षा मुंबई विद्यापीठाचा बीएससी 2010 परीक्षेत गणितात 91% गुण मिळवून सर्वप्रथम आली आहे. आता गणितातच संशोधन करून डॉक्टरेट मिळवण्याची तिची महत्त्वाकांक्षा आहे.कु. आकांक्षा राणे

 

एसएससीपासूनच कोणत्याही कोचिंग क्लासला न जाणारी आकांक्षा, सुप्रसिद्ध गणितज्ज्ञ आणि "इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स' चे भूतपूर्व संचालक डॉ. व्ही. व्ही. राणे ह्यांची कन्या आहे.

कु. मृदुला कुलकर्णी - (शालान्त परीक्षा 2003) मृदुलाने "वेदान्त शास्त्रा'मध्ये मुंबई विद्यापीठाच्या एम.ए. 2010 परीक्षेत सुवर्णपदक मिळवलेले आहे. कु. मृदुला कुलकर्णी

मृदुलाचा शास्त्रीय संगीताचाही अभ्यास असून संस्कृत श्लोक गाण्याची तिला आवड आहे. इतकेच नाही तर लावण्या आणि फिल्मी गाण्यांचे संस्कृतमध्ये रूपांतर करून गाण्याचा तिचा अनोखा छंद आहे.

कु. ओंकार मसूरकर, 9वी ब (इंग्रजी माध्यम)

ओंकारने राष्ट्रीय स्तरावरील 2010 ची एनटीस शिष्यवृत्ती पटकु. ओंकार मसूरकरकावली आहे. त्याच्या ह्या यशाचे टप्पे पुढीलप्रमाणे आहेत :

टप्पा 1 - एसटीएस (राज्यस्तरीय). राज्यातून निवडलेल्या 500 विद्यार्थ्यांपैकी एक. गुण 164/200 थिअरी

टप्पा 2 - एनटीएस (राष्ट्रीय स्तर). अखिल भारतातून निवडलेल्या 4000 विद्यार्थ्यांपैकी एक. गुण 165/200 थिअरी

टप्पा 3 - एनटीएस (राष्ट्रीय स्तर). अखिल भारतातून निवडलेल्या 1000 विद्यार्थ्यांपैकी एक. गुण 19/25 मुलाखत.

भारतात 25 वा क्रमांक

Wednesday, September 8, 2010

Monday, May 17, 2010

NMM Scholarship Exam Achievements 2009-10

Out of 8 students who appeared for NMM Scholarship Exams 2009-10 following 5 students of 8th Std of Vidya Mandir passed successfully. These students were guided by our teacher Shri. S. B. Pawar. We congratulate Shri Pawar and the following successful students (From top to left, Ms. Khushboo S. Kedar, Ms. Bhavana B.Gosavi , Ms. Jagruti V. Sonar, Mst. Kunal D. Kalambate, Mst. Nishant S. Thakare)





Saturday, May 8, 2010

YOGINI S. POLAJI (IX / A)
PERFORMANCE OF YEAR 2009-2010



1) VISAWA CHARITABLE TRUST’S:- NANDAN PANEMANGALORE DRAWING COMPETITION secured 2nd prize in the group F in the 23rd. On the spot drawing competition conferred 26th January 2010.
2) SHAILENDRA EDUCATION SOCIETY:- Shailendra Education Society, Dahisar, Mumbai organized Drawing competition after Late D.M. Samant secured – 3rd prize Group 2nd. conferred on 12 September 2009.
3) MAHARASHTRA RAJYA BALCHITRAKALA COMPETITION organized drawing competition. The Drawing was declared as ‘कला नैपुण्य’ in the group–4th conferred on 14th November 2009.
4) MUHALLA COMMITTEE MOVEMENT RUST AND MUMBAI POLICE organized Poster Making Competition Secured – 1st prize in group – 3rd. The Poster was selected for “ State Level”.
5) BOMBAY ARTS & SPORTS organised Drawing & Painting Competition secured 2nd prize. The drawing selected for Maharashtra Exhibition.
6) THE MUMBAI SURURBAN DISTRICT ATHELETIC ASSOCIATION organized Track and Field Events secured – 1st place in 4 X 100 mts Relay G/ U14.
7) DAHISAR TRACK MASTER CLUB AND DAHISAR SPORTS ASSOCIATION organized Dahisar Minithon (Marathon) 2009 secured – 3rd place in U/G 14 conferred on 6th December 2009.
8) CIART- CENTRE FOR INDIAN ART RESOURCE AND RESERCH, NEW DELHI organized – Drawing competition secured – The Drawing was declared as the “Best Drawing from all the groups” and “Best performance in Art”
Certificate was rewarded and conferred on 26th January, 2010.


Wednesday, April 14, 2010

All India Open Mathematics Scholarship Examination

Results of the All India Open Mathematics Scholarship Examination conducted by IPM (Institute of Promotion of Mathematics ) on 7th Feb 2010.

Total number of students : 61 (STD V to X)

Following 6 students have been selected for National Level Final Examination which will be conducted on Sunday 11th April 2010.

(From Left Side, Kunal Joshi - VI, Soham Gurjar - VII, Saurav Surve - VIII, Omkar Masurkar - VIII, Subhash Nadkarni - VIII, Samruddhi Pednekar - VIII)



Monday, April 12, 2010

National Talent Search Exam Result 2010

Following four students of 8th Std. have been selected for National Talent Search Exam (NTSE). They passed NTS Examination (Maharashtra State) with following ranks:


1. Mst. Jog Chaitanaya Jayant : - 16th Rank


2. Mst. Salvi Adwait Bhalchandra:- 17th Rank


3. Mst. Masurkar Omkar Shyam: - 20th Rank


4. Ms. Kamat Jitali Girish: - 22nd Rank


Thursday, May 28, 2009

केंब्रिज विद्यापीठाच्या परीक्षेत उत्तम यश

वि.प्र.मं. चे विद्या मंदिर, प्राथमिक विभागातर्फे 2004-05 पासून डॉ. मीनल परांजपे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक मराठीतील विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी विषयासाठी इयत्ता 3री पासून केंब्रिज विद्यापीठाचे वर्ग सुरू करण्यात आले. पहिला वर्ग 132 विद्यार्थ्यांनी सुरू झाला. ह्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी आपले पालक प्रशिक्षित करण्यात आले व एकूण 12 पालक ह्या प्रथम वर्गासाठी स्वेच्छेने तयार झाले. त्याच विद्यार्थ्यांतील एकूण 53 विद्यार्थी सतत पाच वर्षांचे प्रशिक्षण घेऊन केंब्रिज विद्यापीठाच्या 2008-09 च्या परीक्षेस बसले. यापैकी 4 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले आणि इतर विद्यार्थीही उत्तम यश संपादून यशस्वी झाले. निर्णयपत्रक खाली तपशिलाने दिले आहे. ह्या सर्व उपक्रमासाठी आपल्या पालकांनी, विशेषतः सौ. पूजा जोशी ह्यांनी खूपच मेहनत घेतली. प्राथमिक मराठी विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. सु. सु. वर्तक ह्यांनी ह्या उपक्रमाचे संचालन केले.

clip_image001

येत्या वर्षी पुढील तुकडी या परीक्षेस बसणार आहे. मराठी माध्यमाच्या मुलांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता असलेले इंग्लिश भाषेचे प्रमाणपत्र मिळावे म्हणून डॉ. मीनल परांजपे ह्यांनी सुरू केलेल्या ह्या उपक्रमाबाबत त्यांना अनेकानेक धन्यवाद !

Sr.No.

Student's Name

Exam

Total (Out of 15)

1

Mast. Atul Dudhalkar

Starters

15

2

Ms. Sayali Patil

Starters

15

3

Mast Omkar Barde

Flyers

15

4

Mast Aditya R. Sawant

Flyers

15

5

Mast. Harshal Patil

Starters

14

6

Mast. Prathamesh Patil

Starters

14

7

Mast. Nishant Thakre

Starters

14

8

Ms. Vimal Telang

Starters

14

9

Mast. Rahul Datir

Movers

14

10

Ms. Darshana Jadhav

Movers

14

11

Mast Chitanya Jog

Flyers

14

12

Mast Advait Salvi

Flyers

14

13

Ms Snehal Avhad

Flyers

14

14

Ms Aditi Dikshit

Flyers

14

15

Ms Tanvi Aptikar

Movers

13

16

Ms. Tanvi Sawant

Movers

13

17

Mast Devesh Kadam

Flyers

13

18

Mast Siddharth Pandit

Flyers

13

19

Mast Aditya Sawant

Flyers

13

20

Mast Saurabh Utagi

Flyers

13

21

Mast Abhijeet Vishwasrao

Flyers

13

22

Ms Nirija Auti

Flyers

13

23

Ms Shruti Kadam

Flyers

13

24

Ms.Mayuri Mestry

Starters

12

25

Mast. Mahesh Kudalkar

Movers

12

26

Ms Gauri More

Movers

12

27

Ms Divyata Shetye

Movers

12

28

Mast Siddhesh Kakade

Flyers

12

29

Mast Vardhan Kale

Flyers

12

30

Mast Ninad Parab

Flyers

12

31

Mast Jay Parsekar

Flyers

12

32

Mast Atul Sawant

Flyers

12

33

Ms Shivani Joshi

Flyers

12

34

Ms Pooja Kangane

Flyers

12

35

Ms Tanvi Mayekar

Flyers

12

36

Ms Chitali Pathare

Flyers

12

37

Ms Minal Tulsankar

Flyers

12

38

Mast Sumukh Patil

Movers

11

39

Mast Abhishek Ghumare

Flyers

11

40

Mast Sudhanshu Save

Flyers

11

41

Ms Ankita Kharat

Flyers

11

42

Ms Sampada Panhale

Flyers

11

43

Ms Samrudhi Panhale

Flyers

11

44

Ms Pallavi Raorane

Flyers

11

45

Mast.Omkar Mulye

Movers

10

46

Mast Sumedh Salve

Movers

10

47

Mast Shunak Dalvi

Flyers

10

48

Mast Chinmay Hegade

Flyers

10

49

Mast Ankur Hadkar

Flyers

10

50

Ms Sanksruti Mantri

Flyers

10

51

Mast Atharva Achrekar

Flyers

9

52

Mast Saurabh Yele

Flyers

9

53

Mast Gaurav Bhagat

Flyers

7

Saturday, December 20, 2008

ग्रेट आर्टिस्ट : मिता प्रशांत देव

mita दैनिक मुंबई सकाळ तर्फे  घेण्यात आलेल्या ग्रेट आर्टिस्ट स्पर्धेत अ गटात दहिसरच्या विद्या प्रसारक मंडळ, विद्या मंदिर इंग्रजी माध्यमिक विभाग सहावी अ मधील कुमारी मिता प्रशांत देव हिला प्रथम क्रमांकाचे रु.21,000/- चे रोख पारितोषिक मिळाले आहे. इ. 4थी ते 7वी तील विद्यार्थ्यांचा या गटात समावेश होता.

- mita

विद्यार्थी आणि शिक्षक तसेच अन्य वाचकांसाठी वेगवेगळ्या गटात ही स्पर्धा घेण्यात आली होती. विद्या प्रसारक मंडळातर्फे मिताचे हार्दिक अभिनंदन.

मितासारखे अनेक गुणी चित्रकार विद्यार्थी आणि त्यांचे पालक तिच्या  ह्या यशापासून स्फूर्ती घेतील आणि आपल्या कलासाधनेसाठी  जोमाने प्रयत्नशील राहतील असा आम्हाला विश्वास आहे. 

Sunday, September 28, 2008

एक सेवाव्रती वाटचाल

माणूस म्हणून जगण्यातील तत्त्व, स्वत्व आणि सत्त्व जागे करते ते शिक्षण. ही प्रक्रिया सतत चालू असते. शिक्षणाने समाजाचाही उद्धार होतो पण आत्मोद्धार साध्य करण्याचे ते एक साधन आहे. शिक्षण क्षेत्रात असे साधक असतात. अशाच एका सेवाव्रती साधिकेची ही वाटचाल.

सौ. आसावरी अशोक सुर्वे हया दहिसरच्या विद्यामंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत. त्यांनी शिक्षण क्षेत्रात शिक्षिका म्हणून पदार्पण केले ते 13 जून 1969 रोजी. नेरळ विद्या मंदिर ही त्यांची ज्ञानभूमी. याच शाळेत त्यांनी साकाराकडून सदाकाराकडे नेणारी वाटचाल सुरू केली. नेरळ विद्या मंदिर या शाळेला "आदर्शशाळा' म्हणून जिल्हयाचे पारितोषिक मिळाले त्या आनंदक्षणाच्या ह्या साक्षीदार.

पुढे विवाहानंतर 1974 पासून विद्या मंदिरात शिक्षकी साधना सुरू झाली. संगीत आणि भाषा विषयांचे अध्यापन करून विद्यार्थी जगतात एक आदर्श घटक म्हणून स्थित झाल्या, 2004 पासून मुख्याध्यापिकेच्या चैतन्यदायी वळणावर वाटचाल करताना त्यांना अनेक पुरस्कार मिळाले.

1) भारतीय समाज विकास अकादमीचा राष्ट्रीय गुणवत्ता पुरस्कार 2007 नवी दिल्ली येथे प्राप्त झाला. तेथील गुणीजन परिषदेत त्यांनी "2020 सालची महासत्त्ता म्हणजे भारत' या विषयावर भाषण केले.

2) अखिल महाराष्ट्र पत्रकार संघ व पत्रकार लेखक मुंबई येथे डॉ. विजया वाड यांच्या शुभहस्ते राष्ट्रीय एकात्मता फेलोशिप ग्रहण केली.

3) वीर जीजामाता विश्वस्त संस्था मुंबई यांच्यावतीने त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला. या संस्थेच्या विद्‌यार्थ्यांना गेली पाच वर्षे त्या मराठी प्रथम भाषेचे मार्गदर्शन करतात.

4) अखिल महाराष्ट्र पत्रकार संघ व अध्यापक मंडळ सोलापूर यांच्या कडून महात्मा फुले व सावित्रीबाई फुले पुरस्कार 2008 साली प्राप्त झाला.

5) अभ्यास मालिका दहावी यशस्वी भव साठी त्या विद्‌यार्थ्यांसाठी सतत 4 वर्ष प्रथम भाषा मराठीचे लेखन करीत आहेत.

6) शिक्षकांपाशी अद्ययावत ज्ञान हवं म्हणून त्यांनी 2007 मध्ये शिक्षण व्यवस्थापन पदविका घेतली. यात त्यांना 75% टक्के गुण प्राप्त झाले. या अभ्यासाक्रमांत त्यांनी लिहिलेल्या शोध निबंधांची शीर्षके आहेत -

1) विदानात्मक आणि उपचारात्मक अध्यापन

2) शालेय प्रार्थना एक अभ्यास

प्रकल्प - पूर्वसूचनेविना केलेले पाठ परिसण एक अभ्यास.

7) या साऱ्या वाटचालीवरील प्रसन्न टप्पा म्हणजे महाराष्ट्र शासनाने दिलेला 2007-2008 चा आदर्श शिक्षक पुरस्कार होय.

clip_image002

संस्थेच्या कारकीर्दीतील हा मंगलमय स्वानंद ! विद्‌यार्थ्यांच्या समस्या लीलया दूर करणाऱ्या या मुख्याध्यापिका आहेत. उदाहरणार्थ, गेली अनेक वर्षे मीरा-भाईंदरकडून येणाऱ्या मुलांना अडीअडचणीला सामोरे जाऊन शाळेत यावे लागते. त्यांची दयनीय अवस्था बाईंच्या डोळयात पाणी आणते. त्या मुलांसाठी मागाठाणे आगाराकडे धाव घेऊन त्यांनी खास बससेवा सुरू केली. खरोखरच संवेदनांना साद घालणारे हे व्यक्तिमत्त्व आहे. सौ. सुर्वेबाईंच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!