Monday, November 24, 2008

सैनिकहो तुमच्यासाठी!

28 जुलै 2008 रोजी काश्मीरमधील राजौरी येथे वीरगति प्राप्त झालेल्या हुतात्मा कै. अजित गावकर ह्यांच्या सुपुत्रास म्हणजे चि. ओंकार गावकर ह्यास विद्या मंदिर दहिसरच्या विद्यार्थ्यांनी आपल्या खाऊच्या पैशातून साठवलेल्या रु.51,000/- च्या रकमेचा धनादेश देण्यात आला. दिनांक 15.11.2008 रोजी झालेल्या ह्या हृदयस्पर्शी कार्यक्रमाला लोकसत्ता दैनिकाचे नामवंत पत्रकार श्री. रवींद्र पांचाळ उपस्थित होते. ह्या कार्यक्रमाचा सविस्तर वृत्तांत वाचण्यासाठी दिनांक 19.11.2008 चा लोकसत्ता पहावा.


Tuesday, November 11, 2008

शैक्षणिक तंत्रज्ञान

शैक्षणिक गुणवत्ता हे ध्येय आहे, तंत्रज्ञान हे ध्येय नव्हे, असे भान ठेवून काळाबरोबर राहण्यासाठी आवश्यक तितकाच तंत्रज्ञानाचा अंगीकार करावा. गुणवत्तेचे प्रश्न अमूकच तंत्रज्ञान वापरून सुटतील असे नाही. साधनसामग्रीचा वापर गुणवत्तावर्धनासाठी कसा करावा ह्याचा विचार प्रामुख्याने करायचा आहे.

Photobucket


अध्ययनक्षेत्रात तंत्रज्ञानाची, विशेषतः इंटरनेटची मर्यादा स्पष्ट करणारे सादरीकरण येथे उपलब्ध आहे ते अवश्य पहावे. पूर्णतः इंटरनेटवर अवलंबून राहण्याऐवजी इंटरनेटच्या जोडीने संगणकाचा वापर सादरीकरणे तयार करण्यासाठी वापरणे हा सुवर्णमध्ये ठरू शकतो. शिक्षकाचे श्रम आणि विद्यार्थ्यांचा वेळ वाचणार असेल तर असे तंत्रज्ञान अवश्य वापरावे. इंटरनेटवर विनामूल्य वापरासाठी अध्ययनसाहित्य, चित्रे, आकृत्या, ऍनिमेशन्स, व्हिडिओज्‌ वगैरे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. (उदाहरणार्थ सोबत दिलेली प्रतिमा विकीमीडियावरील आहे) आपल्याला हवे ते शोधण्याचे कष्ट घेतले तर शिक्षकांना आकर्षक सादरीकरणे तयार करता येतील.