Thursday, July 21, 2011

शिष्योत्तमांची मांदियाळी - 2

शिष्यवृत्ती परीक्षांमधील यशापाठोपाठ शाळेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात शाळेला सुवर्णाची खरीखुरी झळाळी मिळवून दिली ती शाळेच्या शालांत परीक्षेत मराठी आणि इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी, अनुक्रमे 93.2% आणि 100% निर्णय नोंदवून !

ह्या विद्यार्थ्यांचा एक हृद्य कौतुक सोहळा शाळेच्या नव्या सभागृहामध्ये रविवार दि. 3 जुलै 2011 रोजी साजरा झाला. समारंभाचे अध्यक्ष होते फ्युचर कॅपिटलच्या कॉर्पोरेट सेंटरचे प्रमुख आणि मुख्य वित्तीय अधिकारी, सुप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ मा. श्री. अशोक शिनकर.

लेझीमच्या तालावर विद्यार्थ्यांनी पाहुण्यांचे नवीन इमारतीत स्वागत केले.

पाहुण्यांचे आगमन

त्यानंतर पाहुण्यांनी मंडळाच्या सदस्यांसमवेत शाळेच्या नव्या इमारतीची पाहणी केली. 

नव्या इमारतीमध्ये फेरफटका नव्या इमारतीमध्ये फेरफटका

नव्या इमारतीच्या उभारणीमध्ये श्री. अशोक शिनकर ह्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. कॉर्पोरेट क्षेत्रातील आश्रयदात्यांना शाळेच्या नव्या इमारतीसाठी मदतीचे आवाहन करणे सोपे जावे म्हणून त्यांनी स्वखर्चाने शाळेला एक लघुपट तयार करून दिला तसेच अनेक महत्त्वाच्या व्यक्तींना निधीसाठी वैयक्तिक आवाहनही केलेले आहे.

सौ. व श्री. शिनकर ह्यांनी दीपप्रज्वलन करून सरस्वतीपूजन केले.

प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः सा मां पातु सरस्वति भगवति

व्यासपीठावर स्थानापन्न झालेले मान्यवर पुढील चित्रात दिसत आहेत. डावीकडून- इंग्रजी माध्यमाच्या उपमुख्याध्यापिका सौ. सावे मॅडम, मंडळाचे उपाध्यक्ष श्री. सुरेश ठाकूर, सौ. शिनकर, श्री. शिनकर, मंडळाचे अध्यक्ष श्री. ज. स. साळुंखे, मुख्याध्यापक श्री. बेंडाळे सर, शाळा समितीचे अध्यक्ष श्री. दिलीप म्हांबरे.

व्यासपीठावर स्थानापन्न झालेले मान्यवर

कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवनाने झाली.

या कुन्देदुतुषारहारधवला...

उपमुख्याध्यापिका सौ. थरवळमॅडम आणि मंडळाचे अध्यक्ष श्री. साळुंखेसर ह्यांनी अनुक्रमे सौ. व श्री. शिनकर ह्यांचे स्वागत केले.

सौ. शिनकर ह्यांचा सत्कार   श्री. शिनकर ह्यांचा सत्कार

८५ टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळवणा-या विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी सोहळा आयोजित करण्यात आला होता. श्री. शिनकर ह्यांच्या हस्ते प्रमाणपत्र, रोख रक्कम आणि गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

85% आणि अधिक गुण मिळवून शालांत परीक्षेत यशस्वी झालेल्या शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या तब्बल 111 होती.

गुणवंत विद्यार्थ्यांची यादी पुढीलप्रमाणे :

इंग्रजी माध्यमिक विभाग :

1

Pallavi Prakash Sapale

536

97.45

2

Shubham Sanjiv Kumthekar

529

96.18

3

Gauri Prasad Joshi

525

95.45

4

Akshay Baburao Gawas

522

94.91

5

Krutika Sandeep Sawant

522

94.91

6

Rahul Rajendra Gosavi

520

94.55

7

Prajakta Uday Kothawadekar

520

94.55

8

Amey Rajeev Joshi

519

94.36

9

Namita Chandrashekhar Powar

519

94.36

10

Prachi Sunil Hatkar

519

94.36

11

Saloni Mahendra Parab

516

93.82

12

Gaurav Shekhar Darekar

515

93.64

13

Shashank Shyamsunder Rane

514

93.45

14

Divya Nitin Kamat

513

93.27

15

Radhika Santosh Chitale

513

93.27

16

Kshitija Kishor Govekar

510

92.73

17

Narendra Sanjay Patil

508

92.36

18

Rohan Shivaji Hatekar

506

92.00

19

Sarvesh Rajesh Agrawal

506

92.00

20

Prasad Dilip Bagwe

506

92.00

21

Eshani Hemant Dalvi

504

91.64

22

Vaibhavi Arjun Korgaonkar

503

91.45

23

Sunidhi Gururaj Desai

499

90.73

24

Amrita Subramaniam Pillai

497

90.36

25

Uday Ramesh Dalvi

496

90.18

26

Vedika Shashikant Parab

496

90.18

27

Goutham Ushanath Shenoy

496

90.18

28

Rutwij Ravindra Ghaisas

495

90.00

29

Prachi Ajay Gawande

495

90.00

30

Amey Dinesh Malekar

495

90.00

31

Amruta Sadashiv Bagwe

493

89.64

32

Kanksha Vasant Marathe

491

89.27

33

Shubham Sanjay Kaundanyapure

490

89.09

34

Mitralee Nishikant Save

445

89.00

35

Shivani Prashant Vartak

489

88.91

36

Bhagyashree Arvind Ghag

487

88.55

37

Chinmay Ulhas Rahate

486

88.36

38

Kaustubh Prabhakar Bhosale

485

88.18

39

Manashree Jayprakash Shirgurkar

485

88.18

40

Pranali Shailesh Deshpande

485

88.18

41

Aditya Mukund Deo

485

88.18

42

Abhishek Lahu Pawar

485

88.18

43

Sampada Suhas Kudalkar

485

88.00

44

Esha Purushottam Bhat

483

87.82

45

Mukta Harishkumar Parab

483

87.82

46

Mansi Ashok Chavan

482

87.64

47

Alisha Anand Gothankar

481

87.45

48

Aishwarya Krishnakant Rane

478

86.91

49

Menita Sachin Mulye

475

86.36

50

Shivangi Shrikant Kulkarni

475

86.36

51

Sanat Sanjay Gawade

473

86.00

52

Mohit Dipesh Tanna

472

85.82

53

Urvee Shrikant Mankame

470

85.45

54

Akshaya Arvind Mhatre

470

85.45

55

Namaratha Gurunath Shenoy

470

85.45

56

Siddhesh Sandip Sawant

470

85.45

57

Janhavi Vinaykumar Morajkar

467

84.91

58

Neerja Shrikant Surve

466

84.73

59

Vaidehi Vijay Akshekar

465

84.55

 

Pallavi Prakash Sapale

Shubham Sanjiv Kumthekar

मराठी माध्यमिक विभाग :

1

आरती प्रकाश शिंगण

95.82

527

2

ॠषिकेश हर्षल गोखले

95.45

525

3

अमेय मंगेश डोंगरे

95.27

524

4

गणेश जयवंत कोठवळे

95.09

523

5

क्षितिज सहदेव मोंडे

95.09

523

6

निकीता अरूण कुलकर्णी

94.18

518

7

अमेय मधुकर मोहिते

94.00

517

8

संजना रोहिदास लस्ते

93.82

516

9

चिराग किशोर भोईर

93.64

515

10

सई जयंत पवार

93.45

514

11

मनाली मनोज पाटील

92.36

508

12

भाग्यश्री मिलिंद शंकपाळ

92.36

508

13

सुमित गोविंद तरळकर

91.82

505

14

अशोक गोविंद बोडके

91.45

503

15

विनायक किसन सावंत

91.09

501

16

ममता दिलीप साळवी

90.73

499

17

प्रांजली रविंद्र साठे

90.73

499

18

निधी दयानंद वैदय

90.55

498

19

स्नेहल गंगाधर जगताप

90.36

497

20

समिधा सखाराम वळंजू

90.36

497

21

अजय मनोहर जवंजाळ

90.18

496

22

श्रुती मुकुंद आठवले

89.45

492

23

प्राजक्ता अनिल पाटील

89.45

492

24

सिध्देश पद्‌माकर सावे

89.45

492

25

स्मृति चंद्रकांत सावंत

89.27

491

26

मयुरी महादेव कारते

89.27

491

27

अभिजित मनोज काळे

88.91

489

28

नितेश महेंद्र म्हात्रे

88.91

489

29

अभिषेक राजेश कदम

88.73

488

30

मुग्धा श्रीकांत चंद्रात्रेय

88.18

485

31

दर्शना श्रीमंत पवार

88.18

485

32

देवश्री मिलिंद रोपळेकर

88.00

484

33

वरूण मंगेश पाटील

87.64

482

34

वैभव कारभारी पावडे

87.45

481

35

राहूल हरिश्चंद्र रसाळ

87.27

480

36

दर्शना चंद्रकांत डोंगरकर

87.27

480

37

याज्ञिका संजय पाटील

87.27

480

38

पुनम संपत आणेकर

87.09

479

39

हर्षदा शशिकांत पांचाळ

87.09

479

40

धनश्री हरिभाऊ पाटील

86.91

478

41

जयेंद्र अजय म्हात्रे

86.91

478

42

जितेंद्र चांदोरकर

86.80

434/500

43

रूचिता सदानंद ढगे

86.73

477/550

44

अमेय भरत आठवले

86.73

477/550

45

तेजस मधुकर मोहिते

86.55

476

46

अनिकेत चंद्रकांत गराटे

86.55

476

47

भाग्येश नारायण पुनाळेकर

86.00

473

48

तन्मय दीपक आर्ते

85.82

472

49

रूपाली चरणसिंग चव्हाण

85.64

471

50

माधुरी विलास उकिर्डेे

85.64

471

51

साधना उत्तम इंचनाळे

85.40

427

52

तन्वी अशोक घुगे

85.00

425

आरती प्रकाश शिंगण ॠषिकेश हर्षल गोखले Gauri Prasad Joshiअमेय मंगेश डोंगरे 

कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन सौ. गुळवे मॅडम आणि सौ. शेणॉय मॅडम ह्यांनी केले.

सौ. गुळवेमॅडम आणि सौ. शेणॉय मॅडम

कार्यक्रमासाठी पालक, विद्यार्थी, विद्या प्रसारक मंडळाचे सदस्य आणि भूतपूर्व पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते.

पालक, विद्यार्थी

उपस्थित शिक्षकवर्ग

सत्कारमूर्ती

Parents, Students and Teachers

श्रोतृवृंद

श्रोतृवृंद

श्री. राहुल केळकर, श्री. योगेश सांगळे, श्री. सुदर्शन परब, श्री. प्रभाकर साठे, श्री. प्रभाकर ठाकूर आणि श्री. उल्हास देशपांडे खालील चित्रामध्ये दिसत आहेत.

श्रोतृवृंद

श्री. राजेंद्र गोसावी, डॉ. वसंत पाटणकर, श्री. बाळासाहेब तावडे, श्री. मधुकर सुर्वे आणि श्री. वसंत मानकामे आदि मान्यवर पुढील चित्रामध्ये दिसत आहेत :

श्रोतृवृंद

कार्यक्रमास गर्दी झाल्याने सभागृहाबाहेर उपस्थितांसाठी स्क्रीनची व्यवस्था करण्यात आलेली होती. पुढील चित्रामध्ये सौ. आणि श्री. आठवले, श्री. तायशेटे, श्री. पेंढारकर आणि श्री. ठाकरे दिसत आहेत.

श्रोतृवृंद

शिक्षकांतर्फे श्री. टंकसाळी सर आणि सौ. सावे मॅडम ह्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आपल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करताना सारेच शिक्षक भावविवश झाले होते.

श्री. टंकसाळी सर सौ. सावे मॅडम

पालकांच्या वतीने श्री. सापळे आणि श्री. शिंगण ह्यांनी आपले विचार मांडले. यशस्वी विद्यार्थ्यांचे त्यांनी तोंड भरून कौतुक केले आणि शाळेतील शिक्षकांना मन।पूर्वक धयवाद दिले.

श्री. सापळे श्री. शिंगण

कु. पल्लवी सापळे आणि कु. आरती शिंगण ह्या अनुक्रमे मराठी आणि इंग्रजी विभागांमध्ये प्रथम क्रमांकावर आलेल्या विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांच्या वतीने शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त केली आणि "विद्या विनयेत शोभते'' ह्या वचनाचा प्रत्यय दिला. 

कु. पल्लवी सापळे कु. आरती शिंगण

प्रमुख पाहुण्या सौ.शिनकर, मंडळाचे अध्यक्ष श्री. ज. स. साळुंखे, मंडळाचे उपाध्यक्ष श्री. सुरेश ठाकूर आणि शाळा समितीचे अध्यक्ष, श्री. दिलीप म्हांबरे आणि मुख्याध्यापक श्री. बेंडाळे सर ह्यांच्या हस्तेही पारितोषिके स्वीकारण्याचा मान विद्यार्थ्यांना मिळाला.

सौ.शिनकर ह्यांच्या हस्ते पारितोषिक स्वीकारण्याचा मान

 श्री. ज. स. साळुंखे ह्यांच्या हस्ते पारितोषिक स्वीकारण्याचा मान  

श्री. सुरेश ठाकूर ह्यांच्या हस्ते पारितोषिक स्वीकारण्याचा मान श्री. दिलीप म्हांबरे ह्यांच्या हस्ते पारितोषिक स्वीकारण्याचा मान

श्री. बेंडाळे सर ह्यांच्या हस्ते पारितोषिक स्वीकारण्याचा मान

श्री. म्हांबरे सरांनी आपल्या भाषणात शिक्षकांच्या प्रयत्नांबद्दल त्यांना श्री. दिलीप म्हांबरे धन्यवाद दिले आणि विद्यार्थ्यांनी केवळ मेडिकल किंवा इंजिनिअरिंगलाच न जाता आयएएस आणि आयएफएस अशा करिअर्सचे आह्वानही स्वीकारावे असा सल्ला दिला.

समारंभाचे अध्यक्ष श्री. अशोक शिनकर ह्यांनी गोष्टी सांगत सांगत विद्यार्थ्यांचे उद्बोधन केले आणि जीवनात यशस्वी

श्री. अशोक शिनकर

होण्याचे तीन महत्त्वाचे मंत्र त्यांना सांगितले.

ह्या प्रसंगी मंडळाच्या अध्यक्षांनी केलेले आवाहन पुढे देत आहोत :
"सादर नमस्ते,
विद्या मंदिरच्या ज.स.साळुंखे  गुणी विद्यार्थ्यांचं आपण सर्वांनी केलेलं कौतुक ही आमच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अतिशय भाग्याची गोष्ट आहे.
अनेक शुभ घटनांची मालिका सध्या आपण अनुभवीत आहोत. पूर्वमाध्यमिक आणि माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये  शाळेतील विद्यार्थ्यांनी विक्रमी यश मिळवले आहे. शालान्त परीक्षेच्या निर्णयाने ह्या यशोमंदिरावर कळस चढलेला आहे.
शाळेच्या नवीन इमारतीच्या बांधकामाचा पहिला टप्पा आता पूर्ण होत असून ह्या वर्षी आणखी 12 नवीन वर्ग विद्यार्थ्यांना उपलब्ध झाले आहेत.  दहिसरच्या भूमिपुत्रांच्या त्यागातून आणि गावकऱ्यांच्या श्रमातून साकारलेली ही संस्था आणखी जास्त विद्यार्थ्यांच्या अधिक चांगल्या शिक्षणाची सोय करण्‌यास सज्ज झालेली आहे.
शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक, संस्थेचे हितचिंतक आणि श्री. यशवंत देवस्थळी, श्री. शंकरराव बोरकर, श्री. अशोक शिंत्रे, श्री. सुरेश ठाकूर असे दानशूर आश्रयदाते तसेच ऍक्सिस बॅंकेसारख्या सामाजिक बांधीलकी जपणाऱ्या संस्थांच्या पाठबळावर मंडळाने सुमारे 12.5 कोटी रुपयांचा हा प्रकल्प हाती घेतलेला आहे.
संस्थेच्या सर्व आजी-माजी विद्यार्थ्यांनी, त्यांच्या पालकांनी आणि हितचिंतकांनी ह्या कामासाठी सढळ हस्ते मदत करावी असे आवाहन ह्या निमित्ताने आम्ही करीत आहोत. आपल्या देणग्यांवर आयकर अधिनियमाच्या कलम 80 जी कलमांतर्गत करसवलतही मिळू शकेल. आपल्या देणग्यांचे धनादेश आपण विद्या मंदिर, दहिसर (पूर्व) येथे मंडळाच्या कार्यालयात सादर करू शकता अथवा शाळेच्या शिक्षकांकडे सुपूर्द करू शकता.
ह्या कामी आवाहनपत्रिका किंवा पुस्तिका हव्या असल्यास किंवा इतर माहिती हवी असल्यास आपण शाळेच्या अभ्यासिकेशी आठवड्याचे सातही दिवस, सकाळी 7 ते सायं 7 वाजेपर्यंत 6520 5520 ह्या क्रमांकावर संपर्क साधू शकता.
ज.स.साळुंखे 
अध्यक्ष, विद्या प्रसारक मंडळ, दहिसर''

कार्यक्रमाच्या शेवटीश्री. बेंडाळे सर मुख्याध्यापक श्री. अविनाश बेंडाळे ह्यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि आभारप्रदर्शन केले. चांगल्या निर्णयाबद्दल त्यांनी आपल्या सहकारी शिक्षक-शिक्षकेतरांना धन्यवाद दिले आणि पुढीलवर्षी ह्यापेक्षाही चांगला निर्णय असेल अशी ग्वाहीही आपल्या भाषणात दिली.

कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा एक अनौपचारिक मेळावाच नंतर जणू सुरू झाला. कोणाचाच पाय निघत नव्हता. अखेरीस पंडितकाकांच्या वड्याचा आस्वाद घेत सर्वांनी शाळेचा निरोप घेतला.

शाळेचा 50वा वर्धापन दिन

 

आईप्रमाणे आपल्यावर चांगले संस्कार करुन, जी आपल्याला आयुष्यात एक चांगली व्यक्ती म्हणून घडविते ती म्हणजे आपली शाळा.

ज्या मंदिरात आपण विद्या मिळवतो त्या मंदिराचा म्हणजे आपल्या दहिसर विद्यामंदिर शाळेचा 50वा वर्धापन दिन.

शाळेची स्थापना 18 जून 1962 रोजी झाली. त्यावेळी दहिसर गावात एकही मराठी शाळा नव्हती. या गावातील सर्व विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी रेल्वे ने दुसऱ्या ठिकाणी जावे लागत असे.

एकदा रेल्वे अपघातात देसाई नावाच्या विद्यार्थ्याला आपला प्राण गमवावा लागला. तेव्हा येथील सर्व सामान्य लोकांनी एकत्र येऊन या दहिसर विद्या मंदिर शाळेची स्थापना केली आणि आज या वास्तूने 50 व्या वर्षात पदार्पण केले आहे.

या 50 वर्षात शाळेची खूपच प्रगती झाली आहे. आज मोठ्या दिमाखाने ही शाळेची वास्तू 5000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना ज्ञान देत आहे आणि त्यांना घडविण्याचे कार्य करत आहे.

शाळेची इमारत भव्य असून शाळेत इंग्रजी व मराठी माध्यमाचे वर्ग भरतात. प्रत्येक तुकडीसाठी स्वतंत्र वर्ग असून तो सर्व सोईंनी सुसज्ज असा आहे.

कु. प्रिअल पाटील शाळेत वाचनालय, संगणक वर्ग तसेच प्रयोग शाळेची अत्यंत चांगल्या तऱ्हेने स्वतंत्र सोय केलेली आहे. शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक व इतर कर्मचारी वर्ग सतत शाळेच्या प्रगतीसाठी झटताना दिसतात. शाळेचे व्यवस्थापन अतिशय शिस्तबद्ध आहे.

अशा या माझ्या शाळेचा आम्हां सर्वांना अभिमान असून तिची उत्तरोत्तर अशीच प्रगती व्हावी हीच सदिच्छा!

“ धन्य धन्य ती शाळा!
जी देशासाठी तयार करिते बाळा।। ”

कु. प्रिअल पाटील
9 अ.
मराठी माध्यमिक विभाग.

Wednesday, July 20, 2011

।।श्री स्वामी समर्थ ।।

गुरु हा एक अर्थपूर्ण शब्द भारतीय संस्कृतीत गुरुभक्ती म्हणजे एक अंत्यत मधुर असे काव्य आहे. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या तेराव्या अध्यायात या गुरुभक्तीचा अपार महिमा गायिला आहे. गुरु आपणांस ज्ञानाच्या गाभा-यात घेऊन जातो. ज्ञानाशी तन्मय झालेला गुरु शिष्याची समाधी लावतो. नम्रता हा ज्ञानाचा खरा आरंभ आहे. गुरुजवळ शिष्य रिकामे मन घेऊन येतो व जाताना ज्ञानाचा सागर घेऊन जातो.

गुरु म्हणजे एकप्रकारे आपले ध्येय, ज्ञानाची तहान. गुरुभक्ती म्हणजेच ध्येयभक्ती. ध्येय सदैव वाढत असते. ध्येयरूपी गुरु अनेक आहेत. त्यांची कितीही सेवा केली तरी ती अपुरीच असते. गुरु म्हणजे मूर्त ज्ञानपिपासा, तळमळ असते. खरा गुरु आपल्या पुढे जाणा-या शिष्याचे कौतुक करतो. शिष्याचा विजय हा गुरुचा विजय. गुरु आपले सर्व ज्ञान शिष्याला विजय हा गुरुचा विजय. गुरु आपले सर्व शिष्याला देतो. श्रीरामकृष्ण परमहंस विवेकानंदाना म्हणाले, ‘ मी सारे तुला देऊन टाकतो. माझी सारी साधना आज तुझ्या हृदयात ओततो. गुरुला ज्ञानाचा वृक्ष वाढत जावा, असे वाटत असते. शिष्याला स्वत:च जीवनातील सारे अर्पण करतो. गुरुला आंधळी भक्ती आवडत नाही. निर्भयपणे नम्रपणे उपासना करणे, यातच गुरुभक्ती आहे. श्रीदत्तगुरुंपुढे नतमस्तक होऊ न आपले जीवनकार्य करीत रहावे, हेच आपले कर्तव्य आहे.

गुरुपौर्णिमेला ‘ व्यास पौर्णिमा’ असे म्हणतातimage. गुरुजवळ बसून शिष्य नम्रता, जिज्ञासा, सेवा शिकतो. गुरुंचे पूजन ध्येयपूर्तीसाठी असते. भारतीय संस्कृतीने गुरुमध्ये कळसरूप अशा सद्‌गुरुला नेहमी पूजिले आहे. गुरु विश्वाच्या अनंततेचे तसेच सृष्टीच्या ज्ञानाचे दर्शन करतो. सद्‌गुरु जीवनाची कला शिकवून मानवाला ईश्वराभिमुख बनवतो. अध्यात्म विद्येचे दर्शन करणारा, जीवनाला सुंदर, निर्दोष व पवित्र बनवून, आपला हात पकडून प्रभूचरणाजवळ आपल्याला घेऊन जाणारा हा सद्‌गुरु आहे. सद्‌गुरु हाच भक्त व परमेश्वर यांच्यामध्ये मध्यस्थाचे काम करतो.

पी. सी. राजाध्यक्ष

उपमुख्याध्यापिका, 

मराठी माध्यमिक विभाग.

Friday, July 15, 2011

शिष्योत्तमांची मांदियाळी

शाळेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षासाठी शाळेतील शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी शाळेला सुंदर बक्षीस दिलं. या वर्षी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती  आणि माध्यमिक शिष्यवृत्ती ह्या शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये चमकणाऱ्या आपल्या विद्यार्थ्यांची आजपर्यंतची विक्रमी संख्या आहे - एकूण 71 विद्यार्थी.

V. P. M'S VIDYA MANDIR – ENGLISH SECONDARY SECTION

HIGH SCHOOL SCHOLARSHIP RESULTS

(2010 – 2011)

MERIT HOLDERS

SR. NO.

Name of the Student

Marks

Rank

1

Kunal Kausturbh Joshi

262

7th

2

Pratiksha Prasad Parulekar

246

15th

3

Tejas Sadashiv Desai

240

18th

4

Prathamesh Sandeep Naik

240

18th

5

Disha Nishikant Save

232

22nd

6

Abhishek Satish Bhalerao

228

24th

7

Chirayu Prasad Kushalkar

220

28th

8

Devyani Ranjan Sawant

218

29th

9

Apurva Sanjay Kamble

216

30th

10

Shruti Hemant Chaudhary

214

31st

11

Ishani Vinay Mhatre

214

31st

12

Prathamesh Avinash Joshi

212

32nd

13

Shravani Swapnil Patil

212

32nd

14

Prashant Ramesh Chari

208

34th

15

Riddhi Rajendra Nikam

206

35th

16

Pranjali Harish Tendulkar

206

35th

17

Saiesh Rajesh Naik

204

36th

18

Bhavik Rajendra Sankhe

204

36th

19

Shreyas Rajesh Kulkarni

202

37th

20

Hardik Pradeep Pachgade

200

38th

21

Nikhil Mangesh Jog

198

39th

22

Shlesha Shirish Kamat

196

40th

23

Nilay Sunil Gawde

196

40th

24

Shubham Narendra Bhagat

194

41st

25

Mst. Abhijit Satish Bhalerao

194

41st

26

Mst. Mitesh Nandkumar Vishwasrao

192

42nd

27

Tanvi Ramesh Dalvi

190

43rd

28

Mahi Nishad Mhatre

188

44th

29

Arya Nitin Patil

188

44th

30

Manali Sunil Vichare

188

44th

31

Sarvesh Sanjay Ayare

186

45th

32

Jay Sanjay Parab

184

46th

33

Viraj Vijayendra Pai

184

46th

34

Tanvi Sadashiv Desai

184

46th

35

Anushree Anand Nayak

182

47th

36

Siddhi Madhusudan Martal

180

48th

37

Ameya Bhushan Dalvi

180

48th

Total no. of Students

76

Students Appeared

75

Absent

1

Passed

71

Failed

4

Passing Percentage

94.66%

Merit Holders

37

TEACHERS IN- CHARGE

Ms. Vaishali B. Patil

English & History

Mrs. Harshika M. Chowkekar

Maths & Science

Mrs. Poonam V. Vaidya

I.Q.

Ms. Suhasini B. Aivale

Marathi

Ms. Lathika S. Menon

Geography

(माध्यमिक इंग्रजी विभागाचे गुणवंत विद्यार्थी)

चौथीच्या आणि सातवीच्या वर्षामध्ये अनुक्रमे पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी आणि माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी भरपूर जास्तीची मेहनत करून हे यश संपादन केलेले आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांचाही ह्या यशामध्ये मोठा वाटा आहे.

ENGLISH PRIMARY SECTION

MIDDLE SCHOOL SCHOLARSHIP EXAM RESULTS

MARCH- 2011

MERIT HOLDERS

Sr.No

Name of candidate

Total marks

1

Kini Roshni Ravindra

272

2

Walavalkar Sujit Sushil

272

3

Nikam Shruti Rajendra

270

4

Ranaware Chaitanya Jayraj

270

5

Sawant Purva Prasad

268

6

Padhyegurjar Shaunak Arvind

264

7

Prabhu Shubham Keshav

264

8

Mahajan Isha Pravin

262

9

Dhogde Shriya Shriram

260

10

Sakhalkar Vaibhavi Vinod

258

11

Nayak Aditya Srinivas

254

12

Deshpande Saakshi Shrinivas

252

13

Narvekar Sahil Uttam

252

14

Raut Avnish Jayprakash

250

15

Pujari Samaa Sudhir

250

16

Yadav Sahil Roshan

246

17

Sarfare Surabhi Ashish

240

Total students appeared - 53

N0. of merit holders - 17

No. of pass students - 53

Total percentage secured - 100%

The subjects were taught by the following teachers:

1. Mrs. Jyoti Honkote - English

2. Mrs. Pratima Chawla - Intelligence

3. Mrs. Leena Namye – Maths

(प्राथमिक इंग्रजी आणि मराठी विभागाचे गुणवंत विद्यार्थी)

प्राथमिक मराठी विभागातील यशस्वी विद्यार्थी -

अ.क्र.

विद्यार्थ्याचे नांव

मिळालेले गुण

यादीतील क्रमांक

1

कु. चौधरी जयेश सतीश

276

11 वा

2

कु. गावडे मृण्मयी संजय

270

14 वा

3

कु. जायभाये हर्षल गोवर्धन

266

16 वा

4

कु. सावंत तीर्था संदेश

256

21 वा

5

कु. हळवलकर रुचिरा राजेंद्र

256

21 वा

6

कु.पाटील वेदांती अविनाश

254

22 वा

7

कु. मोरये अमेय दिलीप

254

22 वा

8

कु. सोनार संस्कृती उमेश

246

26 वा

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा सन २०१०-११ :

मार्गदर्शक शिक्षक :
१) सौ. नीता जयंत मोरजे
२) सौ.विनिता विनय सावंत
३) कु. सोनाली गणपत कांबळे

(माध्यमिक मराठी विभागाचे गुणवंत विद्यार्थी)

माध्यमिक मराठी विभागातील यशस्वी विद्यार्थी -

अ.क्र.

विद्यार्थ्याचे नांव

मिळालेले गुण

यादीतील क्रमांक

1

वैभव सुनिल गावडे

224/300

26

2

चैतन्य विजय खामकर

214/300

31

3

निखिल रंगनाथ गोडे

208/300

34

4

चिन्मय सुधन बापट

202/300

37

5

ओजस उदय घोणे

202/300

37

6

अक्षता संदेश तळणकर

200/300

38

7

चैताली सुधीर पांढरकामे

196/300

40

8

निनाद रविंद्र शेटये

184/300

46

9

विकास चंद्रकांत शिंदे

182/300

47

मराठी माध्यमिक शिक्षकांची नावे -:

1. श्रीमती. संपदा गुळवे

2. श्री. सयाजी तोरवणे

3. श्री. किशोर पाटील

4. श्रीमती. श्वेता संखे.

 

एकूण विद्यार्थी संख्या  - 50

उपस्थित विद्यार्थी संख्या - 49

अनुपस्थित विद्यार्थी संख्या - 1

उत्तीर्ण विद्यार्थी संख्या - 38

अनुत्तीर्ण विद्यार्थी संख्या - 11

शिष्यवृती धारक विद्यार्थी संख्या – 09

 

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन !

Speech by our student on foundation day

‘Our respected teachers and my dear friends’

It is a very special day at school today, School Foundation Day. It falls on the 18th of June every year. Would you like to know why this particular date has been chosen? Because, it is the day when our school started its journey 50 years back with just 89 students. Our school was the first non municipal school of Dahisar built by residents of Dahisar for the local children. Before 1962, the children from Dahisar used to go to distant schools often involving railway travel. So, may I first of all pay the gratitude on behalf of all the students to the founder members of the school. Without these noble minds and their sincere efforts, we would not have been sitting here in this temple of knowledge for celebrating the ‘Golden Jubilee’ year of the school.

The temple of knowledge kept expanding room by room starting with 89 secondary marathi students in 1962 then to pre-primary sections in 1972 then to primary sections in 1982 then to all the sections of both the mediums in 1992 and now to new school building accommodating 5000 students. The school has been trend setter and has played a leading role for the aspiring student community.

The most important fundamental that I like about my school is the mission of our school i.e. “Prajwalito Dyanamay Padeepaha” which means “a lamp of knowledge had been lit and that all may bathe in its sight”. The school has been successful in this mission all along the years by providing all round development of the children. There are many big schools in Mumbai which charge big fees to the students, but I can proudly say that our school is the only school in my knowledge which provides education to socially deprived class.

Avani V. Newrekar The school has been successful in creating talents in different parts of the society in the roles of engineers, doctors, artists, actors, and politicians. This achievement is possible only with the capable teachers and the love and care that they show towards the students. On this occasion, we must express deep gratitude to all our teachers who help us learn not just the lessons from the books but also qualities that make good human beings. The manners and the opportunities that they provide help us to show and develop the hidden talents and skills. This is the reason why this school is also known as “Samannanchi Asamanya Shala”

Dear Friends, just like other ex-students, we also should aim to contribute to the school development after passing out from the school. This is the only way we can make our school more better. Fellow students, it is not just enough to say “Thank You” to our school. The best way we can show our gratitude is to grow into worthy citizens of this nation and this world.

Avani V. Newrekar, Std. VII-B

Unique School.

Honorable teachers and my dear friends,
It gives me immense pleasure to be speaking on this occasion of our school foundation day.

It was 18th June in the year 1962 that our school started with only 84 students in a tiny shed. The upcoming year is therefore the 'Golden Jubilee' year of our school.
From 84 students in 1962 to 4500 in 2011, our school has a long way. Our school is unique in many ways.

It was founded by the locals of Dahisar at entirely their own expense. Great and humble people like Mr.Tare, Mr.Patil and Mr.Kini donated land for purpose of making a school. Do you know why? It was because Dahisar never had secondary school at that time and had to travel places as far as Vile Parle by trains for a good education. Students suffered accidents in train travels and only way to stop this was to have a school in Dahisar.

The school's founder members honorable, Shri.Thakur, Rane, Raote, Parab, Thakre went door to door and collected funds and raised the school's initial structure. Ever since 1962, our school is managed by the locals of Dahisar for the people of Dahisar. That is another unique feature of our school.

Many of the ex students of our school are the part of managing board of our school. That is the third unique feature of our school.

What's more…….the kind of airy classrooms, the size of playground our school has is rare to find in Mumbai's suburbs.

The level of extra curricular anSuchitra V Haranhallid sports activities our school has is also in comparable with best of the schools in Mumbai.

Over the past 49 years, VPM's Vidya Mandir Dahisar has transformed from the school to a social movement.Ex students of this school have excelled in various walks of life, making the school proud. Amongst the ex students we have virtually everyone from MLAS to commissioned defense officers, IITANS and doctors.

I am proud to be students of this school. I am also glad to be associated with such caring and dedicated teachers.

I understand that we, as a student can best advertise for the school by being successful in our own careers. On this occasion we promise our teachers to put best possible efforts as students to bring glory to our school. I thank all my teachers for having given this opportunity to speak and also all of you for giving me patient hearing.

Suchitra V Haranhalli. Std. VII A

Friday, June 24, 2011

मुलांचे आरोग्य

   
                              - डॉ. सौ. वसुंधरा नाटेकर

आपल्या सर्वांच्या, विशेषकरून आई-आजी झाimageलेल्यांच्या एका जिव्हाळ्याच्या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत.  भरण-पोषणाची जबाबदारी निसर्गत:च स्त्रीवर्गाकडे आलेली आहे.  या पृथ्वीतलावरील यच्चयावत्‌ प्राणीमात्रांच्या, (म्हणजे मनुष्यप्राण्यासकट !) उदरभरणासाठी पृथ्वी म्हणजे जमीनच अन्नधान्य पिकवते.   सर्वांचा भार सहन करणारी ही 'सर्वसहा पृथ्वी', ही वसुंधरा आपल्या सर्वांचेच पोषण करते, तशाच आपणही सर्वजणी आपले बाळ आपल्या गर्भात असताना आपल्या रक्तामांसाने त्याला पोसतो आणि तो जन्मल्या दिवसापासून अगदी आपल्या अखेरपर्यंत म्हणजे आपण म्हातारे होईपर्यंत एका गोष्टीविषयी सतत काळजीत असतो की आपला 'तो' किंवा 'ती' पोटभर जेवला की नाही !  कारण आपली मुले कितीही मोठी झाली तरी आपल्यासाठी ती मुलेच असतात, आणि आपल्यापेक्षा लहानच असतात.  अगदी आपल्या कर्त्या मुलाची काळजी घेणारी त्याची हक्काची, प्रेमाची बायको आली तरी आपल्या मुलाच्या खाण्यापिण्याच्या बाबतीत आई नेहमीच काळजीत असते !


थोडक्यात, काळानुसार आपल्या राहणीमानात, विचारात-आचारात कितीही बदल झाला तरी एक गोष्ट शाश्वत आणि सत्य आहे की मुलाने खाऊन पिऊन भरल्यापोटी ढेकर दिला तरी ते पाहून समाधानाचा नि:श्वास टाकणारी ती आईच असते.  आणि लहान मुलांच्या बाबतीत म्हणाल तर आपले बाळ कटकट न करता पोटभर जेवले तर त्या तृप्तीचा पहिला ढेकर मनोमन देते, ती आईच !  अगदी दिवसाचे सार्थक झाल्यासारखे तिला वाटते !


    लहान मुलांच्या बाबतीत भेडवसावणारे प्रश्र्न म्हणजे -माझा मुलगा अगदीच बारकुडा आहे, तो काही खात नाही, शेजारच्या राहुलपेक्षा अगदीच हाडकुळा आहे;  माझा मुलगा भात-पोळी खात नाही, भाजी तर त्याला डोळ्यासमोर नको ! कोशिंबिरीला हात लावत नाही, कुठलंच फळ त्याला आवडत नाही; सारखी गोळ्या-चॉकलेटं खातो.  डॉक्टर, त्याला भुकेसाठी काही टॉनिक लिहून द्या ना !  अभ्यासातही अगदीच 'ढ' आहे,  एखादं बुध्दीचं टॉनिक आहे कां हो ?- या आणि कितीतरी प्रश्नांचे भुंगे आपल्या डोक्यात भिरभिरत असतात, त्यामुळे आपण  अस्वस्थ होतो, त्याबद्दल आपण स्वत:च जवाबदार आहोत अशी समजूत करून अपराधीपणाची भावना आपल्याला स्वस्थ बसू देत नाही, हे खरे आहे, पण मी देखील तुमच्यापैकीच एक म्हणजे प्रथम आई आहे आणि जोडीला वैद्यकीय व्यवसायातील अनुभवाने आलेला काहीसा शास्त्रीय दृष्टीकोन आहे.  'आई' ही पालकत्वाची पहिली पदवी पार पडली आहे आणि आता 'आजी' च्या पद्‌व्युत्तर परीक्षेचा अभ्यास सुरू आहे तेव्हा ही सर्व जमेची बाजू धरून मी बोलणार आहे.  


    आजचा मूळ विषय आहे, 'मुलांचे आरोग्य'. विषयांची व्याप्ती खूप मोठी आहे.  आरोग्य म्हणजे केवळ शारिरिक स्वास्थ्य नव्हे तर शारीरिक आरोग्याच्या बरोबरीने मानसिक आरोग्याचा ही विचार करणे म्हणजे संपूर्ण आरोग्य !  काळाच्या ओघात हळूहळू लोप पावत चाललेली आपली सांयप्रार्थना आठवा -


'शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा ।
शत्रुबुद्धिविनाशाय, दीपज्योति नमोस्तुते ।।

हे दीपज्योती, मी तुला नमस्कार करते-कशासाठी ? शुभ-कल्याण करण्यासाठी, आरोग्य, धन-संपत्ती प्राप्त होण्यासाठी, दुष्टबुध्दीचा नाश करण्यासाठी ...! इथे 'आरोग्य' या शब्दाला किती प्राधान्य दिले आहे पहा !  कारण आरोग्य असेल, तर धन, संपत्ती ... सर्व आपोआप सहजपणे प्राप्त होते. 

दुसरे एक वचन -'शरीरमाद्यं खलुधर्मसाधनम्‌।' म्हणजे सद्‌धर्माचे आचरण, धर्माची प्राप्ती करण्यासाठी शरीर हे मुख्य साधन आहे. 

एकूण  आरोग्याचे अनन्यसाधारण महत्व आपण सर्वजण  ओळखून आहोत.
    आज मुलांच्या शारीरिक आरोग्याविषयी चर्चा करूया. यामध्ये प्रामुख्याने मुलांचा आहार म्हणजे खान-पान सेवा, विहार म्हणजे त्यांचा व्यायाम, खेळ, झोप, विश्रांती, इतर आवड, छंद, त्यांचा आरोग्यदायी, स्वच्छतेच्या सवयी, सद्‌वर्तन... असे बरेच काही त्यात येते.  अलीकडे मुलांना दिल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या आजारांच्या प्रतिबंधक लसी (व्हॅक्सीन्स्‌) यांचाही त्यांच्या आरोग्यात महत्वाचा वाटा असतो.  कारण या लसी म्हणजे मुलांची कवचकुंडले आहेत.
    आपल्या जन्मापासून अखेरपर्यंत आपल्याला सात्म्य झालेली संवयीची गोष्ट म्हणजे आपले अन्न; किंबहुना या अन्नावरच आपण वाढत असतो.  इथे एक महत्त्वाचा फरक तुमच्या लक्षात आणून द्यावासा वाटतो, तो म्हणजे वाढ आणि विकास या दोन गोष्टींमध्ये फरक आहे. आपण शब्दप्रयोग असा करतो- 'मुलांची शारीरिक वाढ' आणि 'मुलांचा सर्वांगीण विकास.'   वाढ ही संख्यात्मक बाब आहे.  म्हणजे शरीराची वाढ होते ती वजनात, उंचीत किंवा इतर अवयवांच्या आकारमानात मात्र विकास हा गुणात्मक आहे.  मुलांची ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रियांची मुख्य कार्य योग्य व चांगल्या प्रकारे होतात की नाही, यावर त्याच्या विकासाची गती अवलंबून असते.  तात्पर्य म्हणजे आपल्याला आपल्या मुलाची शारीरिक वाढ आणि त्याच्या बुध्दीचा विकास चांगला व्हावा ही अपेक्षा असते.  यासाठी मुलांच्या आहाराकडे जितक्या आपुलकीने आपण लक्ष देतो, तितक्याच कळकळीने त्याचा व्यायाम, खेळ, झोप, सवयी, छंद याकडेही डोळसपणे पाहणे गरजेचे आहे.
    आता आहाराविषयी जुजबी शास्त्रीय माहिती घेऊया.  आपले शरीर कार्यरत राहाण्यासाठी आवश्यक असणारी उर्जा आहारातून मिळते.  आहारातील महत्त्वाचे घटक आपल्याला माहीत आहेत.


1.    पिष्टमय पदार्थ-कर्बोदके-Carbohydrates
2.    नत्रयुक्त पदार्थ-प्रथिने- Proteins
3.    स्निग्ध पदार्थ -चरबी - Fats
4.    जीवनसत्त्वे-    Vitamines -अ,ब,क,ड,ई
5.    क्षार- Minerals
6.    पाणी- Water


    या आहारघटकांचे प्रमुख कार्य- शरीराला ऊर्जा पुरवणे, शरीराची  झीज भरून काढणे, शरीराची वाढ करणे, शरीरात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करणे.  थोडक्यात शरीरवाढीसाठी आणि ते निरोगी ठेवण्यासाठी या सर्व घटकांचा समावेश आपल्या रोजच्या आहारात असणे आवश्यक आहे.  ऊर्जा म्हणजे थोडक्यात इंधन शरीरव्यापारासाठी लागणारी उर्जा मोजण्याचे परिमाण म्हणजे कॅलरी.  हा शब्द आपल्या परिचयाचा असेल. 1 लीटर पाण्याचे तपमान 10सेंटिग्रेडने वाढविण्यासाठी लागणाऱ्या उष्णतेला आहारशास्त्रात कॅलरी म्ह्नणतात.  श्रमाची कामे करणाऱ्याना बैठे काम करण्यांपेक्षा जास्त ऊर्जा/जास्त कॅलरी लागतात.  आपल्या मुलांचे वय (31/2 ते 6 ) लक्षात घेता, यांची वाढ होत असताना ती सतत धावत-पळत-खेळत असतात.  त्यांच्या दृष्टीने ते श्रमाचेच काम आहे.  या वयात त्यांचे शरीरही झपाट्याने वाढत असते, त्यामुळे त्याना जास्त ऊर्जा लागते.  ही ऊर्जा म्हणजेच कॅलरीज्‌ ते आपल्या आहारातून घेत असतात.  या वयातील मुलांची दिवसभराची गरज 1690 कॅलरीज ची असते.
1.पिष्टमय पदार्थ-कर्बोदके मिळणारे पदार्थ म्हणजे गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, ग़ूळ, साखर, साबुदाणा, केळी, आंबा, द्राक्षे, सुकामेवा - यामुळे शरीराला ऊर्जा मिळते.
2.प्रथिने-दोन प्रकारची.  वनस्पतिजन्य व प्राणिजन्य.
वनस्पतिजन्य म्हणजे कडधान्ये व डाळी पासून मिळणारी प्रथिने प्राणिजन्य म्हणजे मांस, मासे, अंडी, दूध यापासून मिळणारी प्रथिने.  प्रथिनांमुळे शरीराची झालेली झीज भरून निघते व वाढ होते, शरीर सुदृढ होते, म्हणून याना Body builders म्हणतात.
3. स्निग्ध पदार्थ-चरबीयुक्त पदार्थ-सर्व तेले, लोणी, तूप, मांस, मासे, सुका मेवा.
यामुळे देखील शरीराची वाढ होते, शरीराची उष्णता राखली जाते, हार्मोन्सची निर्मिती, पेशींच्या बाह्य आवरणाची निर्मिती होते.
4.जीवनसत्त्वे-रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.  शरीरक्रिया सुरळीतपणे पार पाडल्या जातात.
'अ' - गाजर, दूध, पालेभाज्या, लालभोपळा, पपई, आंबा यासारखी गडद रंगाची फळे.
'ब' - दूध, दुधाचे पदार्थ, सोयाबीन, धान्यांचा कोंडा, कडधान्ये, सुकामेवा
'क' - लिंबू, संत्रे, मोसंबी, आवळा, टोमॅटो
ड - दूध, दुधाचे पदार्थ, मासे, सूर्याचे कोवळे ऊन
ई - पालेभाज्या, तेलबिया, वनस्पतीजन्य तेले, सोयाबीन ,मका, गव्हांकुर
5. क्षार - लोह-(रक्तवाढीसाठी), कॅल्शियम(हाडे व दात मजबुती)
           सोडियम, पोटॅशियम
6. पाणी - सर्व द्रवपदार्थ, रक्ताचा पातळपणा टिकवते, अन्नाचे पचन करण्यासाठी. तात्पर्य, या सर्व पदार्थांचा आपल्या आहारात समावेश हवा.  अर्थात ऋतुमानानुसार शरीराला गरज असेल त्याप्रमाणे आहारात बदलही करावा लागतो.
    आहाराविषयी एवढी माहिती घेतल्यानंतर या 31/2 ते 6 वर्षाच्या मुलांच्या आहाराविषयी सविस्तर बोलू.
    दिवसभरात तीन वेळा पोटभर जेवण म्हणजे सकाळी भरपेट नाश्ता, दुपारी जेवण व रात्री जेवण आणि मधल्या वेळेचे खाणे दोन वेळा, असे एकूण दिवसभरात पाच वेळा मुलानी खावे.  अर्थात त्यांच्या शाळेची आणि भुकेची वेळ यांची सांगड घालून आईने कल्पकतेने त्याची आखणी करावी.  याबाबत आईसारखा मॅनेजमेंट गुरु दुसरा नाही !
    सकाळचा नाश्ता पोटभरीचा हवा.  त्यासाठी शिरा, उपमा, पोहे, घावन, परोठे देणे उत्तम.  बरोबर एखादे केळे किंवा कोणतेही फळ दिले तरी चालेल.  हो, दिवसभरात 1 तरी फळ मुलांच्या पोटात जायला हवे.
    दुपारच्या जेवणात भात-वरण किंवा आमटी, पोळी-भाजी, कोशिंबीर, आठवड्यातून 2-3 वेळा आवडीची खीर किंवा मुरांबा द्यावा.  इथे मला एक सुचवावेसे वाटते की, जेवणाचे ताट अशाप्रकारे वाढावे की ते बघताक्षणी मुलाला जेवावेसे वाटेल.  म्हणजे ताटातील पदार्थांची रंगसंगती असावी .  म्हणजे पांढरा भात -लालसर आमटी, डाव्या बाजूला काकडीची कोशिंबीर, उजवीकडे बटाट्याची पिवळी भाजी, तर कधी पांढऱ्या भातावर पिवळे वरण, डावीकडे लाल टॉमेटोची कोशिंबीर, उजवीकडे लाल रस्सा किंवा हिरवी भाजी... असे रंगीबेरंगी सजलेले ताट पाहून सर्वात प्रथम डोळे तृप्त होतात; मग त्याच्या वासाने घाणेंद्रिय तृप्त होते, मग रसना म्हणजे जीभ त्या अन्नाचा आस्वाद घ्यायला अधीर होते.  मग हाताने स्पर्शाने ते सुखावत आणि पटपट जेवते !  एक राहिले; मुलाला जेवण्यासाठी बोलावणारी पहिली हाक प्रेमाची असेल तर ती ऐकून मुलाचे कर्णेंद्रिय ही सुखावते !  एकूण काय, तर मूल पंचज्ञानेंद्रियांनी जेवते आणि तेच त्याच्या  अंगी लागते, कारण ते खरे तृप्त होते !  रात्रीचे जेवण दुपारप्रमाणेच पण थोडे फेरफार करून असावे, खूप उशिरा त्याला जेवायला देऊ नये.  नाहीतर नीट पचन होत नाही.
    आता मधल्या वेळच्या खाण्याचे लाडू रोज रोज मधल्या वेळी काय खायला द्यायचे हा यक्षप्रश्र्न असतो.  मी असे सुचवेन की येता जाता खाण्यासाठी भाजलेले चणे-शेंगदाणे, कुरमुरे, घरी केलेली शेव, शेंगदाणा-खोबरे, तीळ, चण्याची डाळ, राजगिरा यांची चिकीचा किंवा साधा गूळ घालून केलेली चिक्की-यामधून चांगले प्रोटीन्स मिळतात. फ्रूटचाट; फळांमध्ये मोड आलेले मूग, उकडलेले हरभरे ,बटाटा, रताळे; कांदा-कोशिंबीर, मीठ-मिरपूड घालून केलेला मिक्स चाट; या सर्व वस्तूंमध्ये चुरमुरे व थोडी शेव घालून केलेला मिक्स चाट; या सर्व वस्तूंमध्ये चुरमुरे व थोडी शेव घालून किसलेले गाजर, कोथिंबीर, आंबटगोड चटण्या यापासून केलेले भेळ, ही देखील चटकदार लागते, मुलांना आवडते.  याशिवाय भूकलाडू, तहानलाडू म्हणून प्रसिध्द असलेले गव्हाच्या कणकेचे गुळाच्या पाकात केलेले लाडू, गूळपापडी; खोबऱ्याच्या, गाजर-दुधीच्या वड्या; असे अनेक प्रकार आणि जोडीला लिंबू, कोकम,आवळा यांची सरबते ही अधून मधून देता येतील.
    आपल्याला सोबत एका कागदावर,मला सुचलेल्या आणि वापरलेल्या काही झटपट पाककृती (खास मुलांसाठी करण्याच्या) लिहून दिल्या आहेत.  त्यांचा हे वापर करावा.
    मला माहीत आहे, तुम्ही म्हणाल, 'करता खूप येईल पण वेळ कु ठे आहे ?' पण आवड असेल तर सवड मिळते.  पुरुषांच्या हृदयाचा मार्ग त्यांच्या उदरातून जातो, हे आपण सतत ऐकत आलो आहोत, पण मला वाटते, पुरुषांच्याच नव्हे तर सगळ्यांच्याच हृदयाचा मार्ग त्यांच्या पोटातून जातो.  म्हणूनच मुलांच्या मनाचा ताबा घ्यायचा असेल तर आधी त्यांचा पोटोबा शांत करायला हवा.  आपल्या वेळेचे थोडेसे नियोजन, आणि काही गोष्टींची पूर्वतयारी करून ठेवली तर सगळे काही सुकर होते, हा माझा अनुभव !
    आता मुलांना काय देणे टाळावे ते पाहू या - मुलाना आवडणारी बिस्किटे-चॉकलेट, गोळ्या, शीतपेये, हवाबंद केलेले फळांचे रस यामध्ये  Preservatives म्हणून काही रासायनिक द्रव्ये टाकली जातात.  त्यांची बऱ्याच मुलांना ऍलर्जी असू शकते.  तसेच या रासायनिक प्रकिया करताना त्यातील पोषणद्रव्ये नाश पावतात.  त्यामुळे ती अपायकारक असतात.  फळांचे रस पिण्यापेक्षा  फळ खाणे चांगले, कारण त्यामधून फायबर म्हणजे चोथा मिळतो, जो आपल्या शरीरशुद्धिसाठी आवश्यक असतो.
    वेफर्स, फरसाण, फास्टफूड (पिझ्झा- वगैरे...) यामध्ये वापरलेली तेले व मीठ यांचे प्रमाण खूप असते आणि ते वाढत्या वयासाठी तसेच आरोग्यासाठी धोकादायक असते.  म्हणून नेहमी देऊ नये.  मात्र त्याविषयी  craving   म्हणजे खाण्याची तीव्र इच्छा टाळण्यासाठी मुलाला काही खास प्रसंगी, अधून -मधून गमंत म्हणून द्यायला हरकत नाही.
    डायबेटीस, ह्रदयविकार, उच्चरक्तदाब या जीवघेण्या व्याधीची पाळे-मुळे, बीजे, लहान वयातच पेरलेली असतात.  त्याला कारण म्हणजे खाण्यापिण्यातील असमतोल म्हणजेच संतुलित आहार ( Balance diet) न घेणे, जंकफूड-फास्टफूड म्हणण्यापेक्षा नाहक भीती, टी.व्ही-व्हिडिओ-कंप्यूटर यांचा अतिप्रभाव !
    तेव्हा आपले मूल भविष्यात अशा गंभीर आजाराना बळी पडू नयेत म्हणून या लहान वयातच त्याना दैनंदिन जीवनातील खाण्यापिण्याच्या, वागण्याच्या, अारोग्याच्या चांगल्या संवयी लावल्या पाहिजेत कारण साधारण 3 ते 8-10 वर्षापर्यंतचा क़ाळ म्हणजे मुलांचे अत्यंत संवेदनाक्षम, संस्कारक्षम असे वय.  या वयात वयात ते जे आत्मसात करतील त्यावर त्याच्या उभ्या आयुष्याची इमारत उभी असते.
    आहारानंतर येतो तो व्यायाम म्हणजे खेळ.  हे वयच खेळण्या बागडण्याचे असते.  त्यामुळे रोज संध्याकाळी किमान एक तास तरी मूल मोकळ्या हवेत खेळले पाहिजे.  त्यामुळे होणाऱ्या व्यायामामुळे त्याचे स्नायू, सांधे, हाडे बळकट, मजबूत होतात, भरपूर प्राणवायू मिळाल्याने रक्ताभिसरण सुधारते.  पेशी ताज्यातवान्या होऊन कामाचा (म्हणजे मुलांच्या अभ्यासाचा) उत्साह वाढतो.  मन प्रसन्न राहाते.  साहाजिकच त्याचा परिणाम त्याच्या अभ्यासावर चांगलाच होतो.  त्यांची आकलनशक्ती, स्मरणशक्ती वाढते.  याशिवाय सर्वांशी मिसळून राहिल्याने सहभावना, सहकार म्हणजे मदतीची भावना, समंजसपणा, सहनशीलता, वाढते.  सूर्यनमस्कार हा व्यायामाचा एक उत्तम प्रकार आहे.
    विश्रांती -याचीही मुलाना गरज असते.  त्याच्यासाठी झोप हीच विश्रांती.  झोपेमुळे मुलांच्या थकलेल्या शरीराला विश्रांती मिळते आणि मेंदू आपले काम उत्तम प्रकारे करण्यासाठी सज्ज होतो.  या वयातील मुलांसाठी कमीत कमी 8 तास झोप हवीच.  झोप पूर्ण झाली तर त्याचा बुध्दीवर चांगला परिणाम होतो; पर्यायाने अभ्यास चांगला होतो.  तसे दिवसा झोपणे आरोग्यासाठी हितकर नाही, मात्र 31/2 -4 वर्षाच्या मुलानी दुपारी 1-11/2 तास झोपावे हे उत्तम.  सध्याच्या ग्रीष्म ऋतूत सर्वांनीच 1/2 तास झोपावे, असे आयुर्वेदशास्त्र सांगते.
    या वयातच मुलाना हळूहळू वाचनाची सवय लावावी.  स्तोत्रे, प्रार्थना, उजळणी या कालबाह्य होत चाळेेलल्या गोष्टींची पुन्हा आठवण करून द्यावीशी वाटते.  कारण स्तोत्रपठण, उजळणी यामुळे आपली स्मरणशक्ती शाबूत राहाते, वाणी स्वच्छ-शुध्द होते.
    आता आरोग्यदायी संवयीविषयी बोलताना प्रथम जेवणासंबंधी सांगते
* मुलाला भूक लागली असेल तेव्हा आणि तेव्हाच त्याला जेवायला , खायला द्यावे.  भूक नसताना किंवा भुकेची वेळ टळून गेल्यानंतर खायला देऊ नये.
* मूल जेवत असताना त्याच्या अभ्यासासारखा अप्रिय विषय किंवा अन्य कारणाने त्यावर तोंडसुख घेऊ नये.  त्यामुळे मूल नाराज झाले तर पाचकरस निर्माण होण्यात अडथळा येऊन पचन नीट होत नाही.
* मुलाला घाईघाईत खाण्याची संवय लावू नये.  तसेच अगदी रेंगाळत जेवणेही चांगले नाही.
* दिवसभरातील एक तरी जेवण सर्व कुटुबीयांबरोबर होईल असे पहावे.
* "उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म' याचे भान ठेवावे !

आरोग्यदायी संवयीमध्ये दांताची काळजी महत्त्वाची आहे.
* दिवसातून 2वेळा म्हणजे सकाळी उठल्यावर व रात्री झोपण्यापूर्वी असे 2 वेळा दात घासण्याची संवय मुलाला लावावी.
* काहीही खाल्ल्यानंतर चूळ भरावी.
* चिकी किंवा गोळीचॉकलेट सारखे गोड व चिकट पदार्थ खाल्ल्यावर मुलाचे दात घासून खळखळून चूळ भरावी.
* कुटुंबातील प्रत्येकाने ही शिस्त सांभाळावी.
* दर 6 महिने/1 वर्षाने दंतवैद्यांकडून मुलाचे दात तपासून घ्यावेत.

अन्य संवयी -
मुलाचे/मुलीचे केसांवर तेल घालून विंचरून भांग पाडून/वेणी घालून शाळेत किंवा बाहेर पाठवावे.
नखे नियमितपणे कापावीत.
मुलांच्या कानांची स्वछता करावी.
मुलांना दररोज दूध पिण्याची संवय असेल तर उत्तमच परंतु एखाद्या मुलाला दुधाचा तिटकारा असेल तर त्याला दुधासाठी फार आग्रह धरू नये.  मात्र इतर आहार व्यवस्थित आहे ना, याकडे लक्ष द्यावे.
    मुलांच्या आरोग्याविषयी बोलू तेवढे थोडेच आहे.  एवढे मात्र निश्र्चित की त्यांच्या आरोग्याची योग्य प्रकारे काळजी घेतली तर भविष्यात काळजी करण्यासारखे काही उरणार नाही, कारण लहानपणीचे जपलेले आरोग्य ही त्याची आयुष्यभराची शिदोरी असेल !

Monday, October 25, 2010

सुजाण पालकत्व

मातृदेवो भव । पितृदेवो भव ।
भारतीय संस्कृतीचा ठेवा, हे आता फक्त लिहून वाचण्यापर्यंत शिल्लक राहिलेले आहे. पण आजचा विद्यार्थी खरेच असा का बनत चालला आहे? याचा खोलवर विचार केल्यास भूतकालीन आयुष्याची चित्रे उलगडून स्मरणात येते की, पूर्वी एकत्र कुटुंबामुळे आईचे नाते, बाबांचे नाते सहवासातून, स्पर्शातून, संवादातून गहिरे असायचे. मुलांना आई-वडिलांची  ओढ असायची. आई कितीही कामात असली तरी ‘घार उडते आकाशी मन असे पिल्लाशी’ म्हणीप्रमाणे आई मुलांची नजरानजरही गोड वाटायची.
आजची स्थिती आई, बाबा, दोन मुले असे विभक्त कुटुंब त्यात आई-बाबा दोघेही नोकरीच्या निमित्ताने बाहेर. पाल्यासाठी वेळ देऊ शकतो का? पाल्याच्या मनात आपल्याबद्दल प्रेम निर्माण असण्यासाठी आपण कोठे कमी पडता? पैशाने सर्व सुखे मिळत नाहीत. काही वेळा शब्दांचा दिलासा, कौतुकाची थाप व मुलांच्या कुतुहल बुद्धीचे, शंकांचे निरसन या गोष्टींचेही पालकांनी पाल्याचे स्वागत करावे. कधी रागावणे, कधी धाक दाखवणे, कधी त्याचा मित्र बनून खेळणे, कधी त्याचा नवीन विषयाचा अभ्यास घेणे, निदान शाळेतलाच अभ्यास पुन्हा घेऊन पक्का करणे, हे महत्त्वाचे आहे.
आजच्या शिक्षणात आणखी वाढते विषय भरीस पडले आहेत. जसे मूल्य शिक्षण, सामान्य ज्ञान, पर्यावरण, संगणक, व्यक्तिमत्त्व विकास शिक्षणाचा दर्जा उंचावत चाललेला आहे. उच्च स्तरावर शिक्षणाची पातळी वाढत चालली आहे. उंचावलेला हा वटवृक्ष फांद्यांचा एकमेव आधार आहे. शाळेत विद्यार्थी 5 ते 6 तास असतो. वर्गातील 70 ते 75 मुलांना काही-काही मिनिटांत तो विषय अभ्यासक्रमाप्रमाणे संपवायचा असे बंधन असते. मनात असूनही शिक्षकांना विषयांचे सविस्तर शिक्षण विद्यार्थ्यांना देणे वेळेअभावी शक्य नसते. अशावेळी 24 तासांतील 5 ते 6 तास शाळा, 8 तास झोप व उरलेल्या तासांत पालक काहीतरी वेळ पाल्यासाठी नियोजनपूर्वक मनात असेल तर काढू शकतात. सुट्‌ट्यांतही ते पाल्याला काही शिकवू शकतात. निदान नवीन विषयांची जाण पाल्याला अधिक माहितीपूर्वक देऊ शकतात. जरी शाळेत, शिकवणीत विद्यार्थी शिकत असला तरी घरच्या शिक्षणातही सहभाग असणे आजच्या स्पर्धात्मक युगात जरुरीचे आहे. विद्यार्थ्यांना टीव्हीवरील शैक्षणिक कार्यक्र्रम दाखवायला हवेच, पण सर्वच कार्यक्रम आवश्यक नाहीत. शैक्षणिक कार्यक्रम दाखविल्यास त्याचा फायदा होईल व इतर कार्यक्रमांचे दुष्परिणामही कमी होतील व वेळही सार्थकी लागेल.
पालकांनी आपल्या पाल्यासाठी शाळेत 15-15 दिवसांनी शिक्षकांना भेटायला हवे. पाल्याचे मित्र कोण? वर्गात त्याचे लक्ष कितपत असते? गृहपाठ वेळेवर करतो का? त्याचे वागणे, बोलणे, राहणे, आहार या सर्व बारीक गोष्टींतूनही पालकांनी जागृत असावे. घरच्या वातावरणातील संवाद एकमेकांसाठी सहकार्याची भावना, घरातील प्रत्येक माणूस कुटुंब, समाज, मग देश हे सारे माणुसकीचे माणूस म्हणून जगण्यासाठी, पुढची पायरी भविष्यकाळात उज्ज्वल दिशा होण्यासाठी आजची पिढी आजच्या भक्कम पायाचा खंबीर आधार, मजबूत मूल्यांच्या संस्काराचे शिक्षण हृदयात जतन करायला पाहिजे, तरच शिक्षणाचे उद्दिष्ट सफलपूर्ण होईल.
स्पर्धायुगातील टक्केवारीत सूडाची भावना व्यक्त होऊ न देता प्रत्येकाला स्पर्धा ही जीवनासाठी हितकारक आहे, अशी मनाची धारणा ठेवल्यास, समाधानाची शिदोरी पाल्यास दिल्यास पालकत्व चिरंतन मूल्यांचे वाटेल, यात शंका नाही. सरळ-सरळ जीवनाला सामारे जाण्याची ताकद निर्माण करण्याचे काम पालकांचे आहे.
तत्त्वज्ञानाच्या उच्च भाषेपेक्षा प्रेमाची भाषा, आपुलकीची भावना जास्त जवळची वाटेल. आजचे शिक्षण विद्याथ्यांचे कुवतीबाहेरचे आहे. तरीही त्यांची कुवत व्यवस्थित असण्यासाठी पालकांनी मेहनत घेणे जास्त गरजेचे आहे. चंदनासारखे झिजल्यावर सुगंध दरवळतोच, पण आधी झिजण्याची क्रिया व्हावी लागते.
मुले ही तर निरागस, निष्पाप असतात. त्यांना वेळीच घडवणे, आकार देणे हे पालकांच्या हातात असतो. जसे पेरावे तसे उगवते या उक्तीप्रमाणे व्यवस्थित खतपाणी घातल्यास पाल्यांची उज्ज्वल पहाट नक्कीच उजाडेल.
"मुले ही फुले" असे नेहमी नेहरूजी म्हणत. सुंदर फुले, गोड फळे मिळण्यासाठी आधी कष्ट करावे लागतात. मगच त्यांचा आस्वाद सुखकारक वाटतो. संस्कारांच्या खतपाण्याची जबाबदारी पालकांची असते.
आजचा विद्यार्थी पालक व शिक्षकांचा आदर तेव्हाच करील जेव्हा दोघांचेही त्याला मार्गदर्शन लाभेल. कितीतरी वेळा मुलांना यश मिळाल्यावर ते नेहमीच मुलाखतीत आपल्या आई-वडिलांचे व गुरुंचे श्रेय, आशीर्वाद म्हणूनच मी आज काही करू शकलो असे सांगतात. त्याचे कारण मुलांच्या अनुभवांतून त्यांचे उद्‌गार आनंदाने बाहेर पडतात. आई-वडिलांनाही मग मुलांबद्दल अभिमान वाटतो.
म्हणूनच सुजाण, सुशिक्षित, आदर्श पालकत्व होण्यासाठी पाल्याचे जीवन सार्थकी लावणे, त्यांच्या शिक्षणात हातभार लावणे पालकांची जबाबदारी व कर्तव्य आहे.

-    सौ. श्वेता सं. संखे

Tuesday, October 19, 2010

शाब्बास ! आगे बढो !

आमच्या दोन माजी विद्यार्थिनी आणि इयत्ता 9 वी मध्ये शिकत असलेला एक आजी विद्यार्थी ह्यांच्या सुयशाने आम्ही हरखून गेलो आहोत.

तीन शिलेदार 

कु. आकांक्षा राणे - (शालान्त परीक्षा 2005)

आकांक्षा मुंबई विद्यापीठाचा बीएससी 2010 परीक्षेत गणितात 91% गुण मिळवून सर्वप्रथम आली आहे. आता गणितातच संशोधन करून डॉक्टरेट मिळवण्याची तिची महत्त्वाकांक्षा आहे.कु. आकांक्षा राणे

 

एसएससीपासूनच कोणत्याही कोचिंग क्लासला न जाणारी आकांक्षा, सुप्रसिद्ध गणितज्ज्ञ आणि "इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स' चे भूतपूर्व संचालक डॉ. व्ही. व्ही. राणे ह्यांची कन्या आहे.

कु. मृदुला कुलकर्णी - (शालान्त परीक्षा 2003) मृदुलाने "वेदान्त शास्त्रा'मध्ये मुंबई विद्यापीठाच्या एम.ए. 2010 परीक्षेत सुवर्णपदक मिळवलेले आहे. कु. मृदुला कुलकर्णी

मृदुलाचा शास्त्रीय संगीताचाही अभ्यास असून संस्कृत श्लोक गाण्याची तिला आवड आहे. इतकेच नाही तर लावण्या आणि फिल्मी गाण्यांचे संस्कृतमध्ये रूपांतर करून गाण्याचा तिचा अनोखा छंद आहे.

कु. ओंकार मसूरकर, 9वी ब (इंग्रजी माध्यम)

ओंकारने राष्ट्रीय स्तरावरील 2010 ची एनटीस शिष्यवृत्ती पटकु. ओंकार मसूरकरकावली आहे. त्याच्या ह्या यशाचे टप्पे पुढीलप्रमाणे आहेत :

टप्पा 1 - एसटीएस (राज्यस्तरीय). राज्यातून निवडलेल्या 500 विद्यार्थ्यांपैकी एक. गुण 164/200 थिअरी

टप्पा 2 - एनटीएस (राष्ट्रीय स्तर). अखिल भारतातून निवडलेल्या 4000 विद्यार्थ्यांपैकी एक. गुण 165/200 थिअरी

टप्पा 3 - एनटीएस (राष्ट्रीय स्तर). अखिल भारतातून निवडलेल्या 1000 विद्यार्थ्यांपैकी एक. गुण 19/25 मुलाखत.

भारतात 25 वा क्रमांक

नमस्कार...आचार्य... विरुद्ध गुड मॉर्निंग टीचर...


काही दिवसांपूर्वी शाळेतील आजी विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्गात जाऊन भेटण्याचा योग आला ...तेव्हा वर्गात प्रवेश करताच सर्व विद्यार्थी वन... टु... गुड मॉर्निंग टीssssचर. असा घोष करीत कसेतरी उभे राहिले. हे दृश्य अतिशय विचित्र वाटलं ... मराठी माध्यमाच्या वर्गात शिक्षकांचे स्वागत इंग्रजीमधून व्हावे हा विरोधाभास वाटला...मृदुला कुलकर्णी
भाषेचा मुद्दा सोडला तरी आपली संस्कृती लक्षात घेता शिक्षकांनी वर्गात येताच विद्यार्थ्यांनी केवळ उठून उभे राहून हात जोडून नमस्कार करणे बरे दिसते. त्या साठी उगाच काही वेळ घालवून बालिश पणाने वन ... टु... असे म्हणत स्वागत करणे काही बरे वाटत नाही. एवढेही जमत नसल्यास केवळ उठून उभे राहणे पुरेसे आहे...
नमस्कार करण्यामागचा किंवा उठून उभे राहण्या मागचा उद्देश शिक्षकांना सन्मान देणे एवढाच असतो... त्याकरता विद्यार्थ्यांनी केवळ उठून नमस्कार करणे एवढी क्रिया पुरे आहे असे मला वाटते ...
आपली शाळा संस्कृतीचे जतन करणारी एक अग्रगण्य संस्था आहे ...  तेव्हा कृपया वरील मुद्द्याचा विचार केला जावा अशी विनंती ...
धन्यवाद ...
मृदुला कुलकर्णी ...