Showing posts with label Thoughts. Show all posts
Showing posts with label Thoughts. Show all posts

Monday, October 25, 2010

सुजाण पालकत्व

मातृदेवो भव । पितृदेवो भव ।
भारतीय संस्कृतीचा ठेवा, हे आता फक्त लिहून वाचण्यापर्यंत शिल्लक राहिलेले आहे. पण आजचा विद्यार्थी खरेच असा का बनत चालला आहे? याचा खोलवर विचार केल्यास भूतकालीन आयुष्याची चित्रे उलगडून स्मरणात येते की, पूर्वी एकत्र कुटुंबामुळे आईचे नाते, बाबांचे नाते सहवासातून, स्पर्शातून, संवादातून गहिरे असायचे. मुलांना आई-वडिलांची  ओढ असायची. आई कितीही कामात असली तरी ‘घार उडते आकाशी मन असे पिल्लाशी’ म्हणीप्रमाणे आई मुलांची नजरानजरही गोड वाटायची.
आजची स्थिती आई, बाबा, दोन मुले असे विभक्त कुटुंब त्यात आई-बाबा दोघेही नोकरीच्या निमित्ताने बाहेर. पाल्यासाठी वेळ देऊ शकतो का? पाल्याच्या मनात आपल्याबद्दल प्रेम निर्माण असण्यासाठी आपण कोठे कमी पडता? पैशाने सर्व सुखे मिळत नाहीत. काही वेळा शब्दांचा दिलासा, कौतुकाची थाप व मुलांच्या कुतुहल बुद्धीचे, शंकांचे निरसन या गोष्टींचेही पालकांनी पाल्याचे स्वागत करावे. कधी रागावणे, कधी धाक दाखवणे, कधी त्याचा मित्र बनून खेळणे, कधी त्याचा नवीन विषयाचा अभ्यास घेणे, निदान शाळेतलाच अभ्यास पुन्हा घेऊन पक्का करणे, हे महत्त्वाचे आहे.
आजच्या शिक्षणात आणखी वाढते विषय भरीस पडले आहेत. जसे मूल्य शिक्षण, सामान्य ज्ञान, पर्यावरण, संगणक, व्यक्तिमत्त्व विकास शिक्षणाचा दर्जा उंचावत चाललेला आहे. उच्च स्तरावर शिक्षणाची पातळी वाढत चालली आहे. उंचावलेला हा वटवृक्ष फांद्यांचा एकमेव आधार आहे. शाळेत विद्यार्थी 5 ते 6 तास असतो. वर्गातील 70 ते 75 मुलांना काही-काही मिनिटांत तो विषय अभ्यासक्रमाप्रमाणे संपवायचा असे बंधन असते. मनात असूनही शिक्षकांना विषयांचे सविस्तर शिक्षण विद्यार्थ्यांना देणे वेळेअभावी शक्य नसते. अशावेळी 24 तासांतील 5 ते 6 तास शाळा, 8 तास झोप व उरलेल्या तासांत पालक काहीतरी वेळ पाल्यासाठी नियोजनपूर्वक मनात असेल तर काढू शकतात. सुट्‌ट्यांतही ते पाल्याला काही शिकवू शकतात. निदान नवीन विषयांची जाण पाल्याला अधिक माहितीपूर्वक देऊ शकतात. जरी शाळेत, शिकवणीत विद्यार्थी शिकत असला तरी घरच्या शिक्षणातही सहभाग असणे आजच्या स्पर्धात्मक युगात जरुरीचे आहे. विद्यार्थ्यांना टीव्हीवरील शैक्षणिक कार्यक्र्रम दाखवायला हवेच, पण सर्वच कार्यक्रम आवश्यक नाहीत. शैक्षणिक कार्यक्रम दाखविल्यास त्याचा फायदा होईल व इतर कार्यक्रमांचे दुष्परिणामही कमी होतील व वेळही सार्थकी लागेल.
पालकांनी आपल्या पाल्यासाठी शाळेत 15-15 दिवसांनी शिक्षकांना भेटायला हवे. पाल्याचे मित्र कोण? वर्गात त्याचे लक्ष कितपत असते? गृहपाठ वेळेवर करतो का? त्याचे वागणे, बोलणे, राहणे, आहार या सर्व बारीक गोष्टींतूनही पालकांनी जागृत असावे. घरच्या वातावरणातील संवाद एकमेकांसाठी सहकार्याची भावना, घरातील प्रत्येक माणूस कुटुंब, समाज, मग देश हे सारे माणुसकीचे माणूस म्हणून जगण्यासाठी, पुढची पायरी भविष्यकाळात उज्ज्वल दिशा होण्यासाठी आजची पिढी आजच्या भक्कम पायाचा खंबीर आधार, मजबूत मूल्यांच्या संस्काराचे शिक्षण हृदयात जतन करायला पाहिजे, तरच शिक्षणाचे उद्दिष्ट सफलपूर्ण होईल.
स्पर्धायुगातील टक्केवारीत सूडाची भावना व्यक्त होऊ न देता प्रत्येकाला स्पर्धा ही जीवनासाठी हितकारक आहे, अशी मनाची धारणा ठेवल्यास, समाधानाची शिदोरी पाल्यास दिल्यास पालकत्व चिरंतन मूल्यांचे वाटेल, यात शंका नाही. सरळ-सरळ जीवनाला सामारे जाण्याची ताकद निर्माण करण्याचे काम पालकांचे आहे.
तत्त्वज्ञानाच्या उच्च भाषेपेक्षा प्रेमाची भाषा, आपुलकीची भावना जास्त जवळची वाटेल. आजचे शिक्षण विद्याथ्यांचे कुवतीबाहेरचे आहे. तरीही त्यांची कुवत व्यवस्थित असण्यासाठी पालकांनी मेहनत घेणे जास्त गरजेचे आहे. चंदनासारखे झिजल्यावर सुगंध दरवळतोच, पण आधी झिजण्याची क्रिया व्हावी लागते.
मुले ही तर निरागस, निष्पाप असतात. त्यांना वेळीच घडवणे, आकार देणे हे पालकांच्या हातात असतो. जसे पेरावे तसे उगवते या उक्तीप्रमाणे व्यवस्थित खतपाणी घातल्यास पाल्यांची उज्ज्वल पहाट नक्कीच उजाडेल.
"मुले ही फुले" असे नेहमी नेहरूजी म्हणत. सुंदर फुले, गोड फळे मिळण्यासाठी आधी कष्ट करावे लागतात. मगच त्यांचा आस्वाद सुखकारक वाटतो. संस्कारांच्या खतपाण्याची जबाबदारी पालकांची असते.
आजचा विद्यार्थी पालक व शिक्षकांचा आदर तेव्हाच करील जेव्हा दोघांचेही त्याला मार्गदर्शन लाभेल. कितीतरी वेळा मुलांना यश मिळाल्यावर ते नेहमीच मुलाखतीत आपल्या आई-वडिलांचे व गुरुंचे श्रेय, आशीर्वाद म्हणूनच मी आज काही करू शकलो असे सांगतात. त्याचे कारण मुलांच्या अनुभवांतून त्यांचे उद्‌गार आनंदाने बाहेर पडतात. आई-वडिलांनाही मग मुलांबद्दल अभिमान वाटतो.
म्हणूनच सुजाण, सुशिक्षित, आदर्श पालकत्व होण्यासाठी पाल्याचे जीवन सार्थकी लावणे, त्यांच्या शिक्षणात हातभार लावणे पालकांची जबाबदारी व कर्तव्य आहे.

-    सौ. श्वेता सं. संखे

Tuesday, October 19, 2010

नमस्कार...आचार्य... विरुद्ध गुड मॉर्निंग टीचर...


काही दिवसांपूर्वी शाळेतील आजी विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्गात जाऊन भेटण्याचा योग आला ...तेव्हा वर्गात प्रवेश करताच सर्व विद्यार्थी वन... टु... गुड मॉर्निंग टीssssचर. असा घोष करीत कसेतरी उभे राहिले. हे दृश्य अतिशय विचित्र वाटलं ... मराठी माध्यमाच्या वर्गात शिक्षकांचे स्वागत इंग्रजीमधून व्हावे हा विरोधाभास वाटला...मृदुला कुलकर्णी
भाषेचा मुद्दा सोडला तरी आपली संस्कृती लक्षात घेता शिक्षकांनी वर्गात येताच विद्यार्थ्यांनी केवळ उठून उभे राहून हात जोडून नमस्कार करणे बरे दिसते. त्या साठी उगाच काही वेळ घालवून बालिश पणाने वन ... टु... असे म्हणत स्वागत करणे काही बरे वाटत नाही. एवढेही जमत नसल्यास केवळ उठून उभे राहणे पुरेसे आहे...
नमस्कार करण्यामागचा किंवा उठून उभे राहण्या मागचा उद्देश शिक्षकांना सन्मान देणे एवढाच असतो... त्याकरता विद्यार्थ्यांनी केवळ उठून नमस्कार करणे एवढी क्रिया पुरे आहे असे मला वाटते ...
आपली शाळा संस्कृतीचे जतन करणारी एक अग्रगण्य संस्था आहे ...  तेव्हा कृपया वरील मुद्द्याचा विचार केला जावा अशी विनंती ...
धन्यवाद ...
मृदुला कुलकर्णी ...

Wednesday, May 20, 2009

POSITIVE ATTITUDE

My friend, Reena, has lots of friends and seems to have all the luck in the world. She sees the proverbial glass to be half full instead of half empty. She would be an asset to any organization playing a key role in keeping the morale of the players at a constant high.

What makes her click?

She has a positive attitude.

We can, all of us, work on our attitude on a daily basis to ensure that we are having a positive effect on our institute, our colleagues, parents and the little children in our charge.

SEPARATE MOOD FROM ATTITUDE

Our interactions are largely governed by our mood on that particular day. This in turn is dependent on the atmosphere at home, the scenario in school and the events till that moment. Is it possible to exude positivity when we are angry or depressed? OF COURSE! Would you forgive a surgeon for doing a shabby job because he was upset with his wife? OF COURSE NOT! All of us have to strive to be actors, to behave in a certain prescribed way regardless of our feelings. We must remember that 50-70 tiny-tots are looking up at us with eagerness and trust. They would be hurt if we suddenly changed from a smiling individual to a frowning one. Their innocent faces should work as a salve on our wounds. We must be our organizations ‘star performers’. This does not mean that we should be ‘mere robots’ performing the mechanics of teaching. What a different workplace we would create if all of us would be focused on the noble task of instructing, encouraging and moulding.

AVOID NEGATIVE PEOPLE AND NEGATIVE THOUGHTS

A negative person has the capacity to spoil your day. We must avoid them like the plague. At least limit our interactions to a minimum. Kudos to those, who are so strong as to bring them around to see their own point of view. We must evaluate ourselves on a daily basis. Put a check on all negative thoughts. Get into the daily habit of giving ourselves positive inputs. The subconscious mind has tremendous power. It will work to fulfill our thoughts both negative as well as positive. We should do what we love to do most. A daily walk, half an hour in the pursuit of a hobby and 20 minutes devoted to oneself, for the purpose of introspection, will work wonders.

BE SELF MOTIVATED

One often hears that organizations aren’t profuse in appreciating good work. They expect all the employees to put in their best but are slow to praise. Motivation is an ‘inside job’. Though it is easier said than done, all of us must be self propelled. Our ‘star performers’ shouldn’t depend on the fruits of their labour to perform once again. It should be a labour of love with no expectations. Remember--The source of all bliss is the dedicated performance of duty.

In short we should-----

# Want to work sincerely

# Enjoy what we do

# Take pride in our work

# Care about our colleagues, students and their parents

# Be dependable, energetic, enthusiastic and open to new ideas

# Be fun to be with

# Be a positive influence through our words and action.

So let us analyse our attitude and create and sustain a healthy work environment.

Let us be positive in our outlook

Mrs. JYOTI R HONKOTE

ENGLISH PRIMARY SECTION

Wednesday, January 21, 2009

2009- A bad year?

by Jyoti Honkote

For the first time, prophets, soothsayers, astrologers and all of their kind are unanimous in their predictions for the year 2009. Put briefly, what they say is, “Life is going to be gloomy, folks.”

As far as I am concerned every new day ushers in a new sun, warm and fresh, bringing in opportunities and challenges. Maria Rilke said, “The future is time’s excuse to frighten us.”

Image via Wikipedi

Eager faces welcome me as I walk through the school gates and a constant and enthusiastic clamour of “Good Morning Teacher” accompanies me till I step into the office. One feels like The Queen. The tiny tots cast a spell on me and negative thoughts take wings.

Well the year 2009 seems to be good for us at Vidyamandir. When I look out of the window, the new building construction work seems to be progressing well. A slow but steady stream of donations is also coming in.

MakarSankranth was celebrated with the usual gaiety. Spring is around the corner. Several children won awards in Camel Colour contest, a few more prizes are expected in other spheres. Children are bright and energetic. The unit test cannot dampen their spirits. The present looks good and the future doesn’t seem bad either. There is no point in worrying. We are here to live life. Let us go forward and embrace whatever it has to offer.


HAVE A STUPENDOUS 2009.


Monday, December 29, 2008

यत्न तो देव जाणावा

समर्थांचे विचार -
जीवनात आपल्या वाट्याला जी सुखदु:ख येतात किंवा जे यश-अपयश मिळते. ते प्रारब्धाच्या अधीन असते का प्रयत्नावर निर्भर असते? मानवी मनाला पडलेले हे कोडे खूप जुने आहे. समर्थ रामदासांनी ‘प्रयत्न श्रेष्ठ की प्रारब्ध श्रेष्ठ’ या नावाचे एक ओवी शतकच लिहिले आणि त्यामध्ये समारोप करताना प्रयत्नाला श्रेष्ठत्व दिले.

प्रयत्न श्रेष्ठ हे सांगताना समर्थांनी फार चांगला युक्तिवाद केला. ते म्हणाले, की आधी आपण प्रयत्न करतो आणि फळ मिळाले नाही म्हणजे प्रारब्धाला दोष देतो. याचा अर्थ आधी प्रयत्न आहे आणि मग प्रारब्ध आहे. जे आधी येते ते श्रेष्ठ आहे. समर्थ प्रयत्नवादाचे कट्टर पुरस्कर्ते होते. प्रयत्न करूनही जर माणूस अपयशी झाला तर ते प्रारब्धावर ढकलत नाहीत ते म्हणत्तात-


अचूक यत्न करवेना । म्हणौनी केले ते सजेना ।
आपला अवगुण जाणवेना । काही केल्या ।।


जर चुकीच्या दिशेने प्रयत्न केल्यामुळे अपयश आले, तर प्रारब्धावरती का ढकलायचे?


प्रारब्ध ही आळशी माणसाने शोधून काढलेली लपायची जागा आहे. एकदा प्रारब्धाच्यामागे लपायचे ठरले के आत्मपरीक्षण थांबून जाते. विज्ञानात ज्याप्रमाणे प्रयोगशील अंत:करण असावे लागते त्याप्रमाणे कर्म करताना चिंतनशीलता हवी. माणसाने जर नीट विचार केला आणि नियोजनपूर्वक कर्म केले, तर ताे कधीही अपयशी होणार नाही. जीवनात यशस्वी झालेल्या सगळ्या महापुरूषांनी विवेकपूर्वक निर्णय घेतले आहेत. त्यांनी अविरत कष्ट केले आहेत.


आधी कष्ट मग फळ । कष्टचि नाही ते निष्फळ ।।
सापेक्षेमुळे केवळ । वृथापुष्ट ।।


असे समर्थ रामदास म्हणतात. कष्टाशिवाय मी द्रव्यार्जन करणार नाही, असा संकल्प जर प्रत्येकाने सोडला तर भ्रष्टाचार विसर्जित होईल. अनेक लोक नियोजन करण्यापेक्षा ज्योतिषाला पत्रिका दाखवून निर्णय घेतात.
याबाबतीत समर्थ पुरूषार्थावादी आहेत, ते म्हणतात-


रेखा तितुकी पुसोन जाते । प्रत्यक्ष प्रत्ययास येते ।
डोळे झाकणी करावी ते । काय निमित्त ।।
घालून अकलेचा पवाड । व्हावे ब्रह्मांडाहूनी जाड ।
तेथे कैचे आणिले द्वाड । करंटपण ।।


जो भविष्य सांगतो त्याच्याकडे जाण्यापेक्षा जो भविष्य घडवितो त्याच्याकडे जावे. समर्थांनी दौर्बल्याची सामर्थांना विलक्षण चीड होती. दुबळा माणूसच लपण्यासाठी जागा शोधून काढतो. कोणत्याही उद्योगपतींचे चरित्र बघा किंवा एखाद्या वैज्ञानिकाचे चरित्र बघा. त्याचा जीवनात प्रयत्नवादाची उपासना पहायला मिळते.


भारतीय शिक्षण परंपरेत विद्यार्थी दहा-बारा वर्षे गुरुकुलात राहत असे. गुरुकुलातले जीवन अत्यंत खडतर असे. तिथे विद्यार्थ्यांना अध्ययनाबरोबरच आश्रमातील कामेदेखील करावी लागत. अलिकडे काही
गरीब विद्यार्थी कमवा आणि शिका - अर्न अँड लर्न - या योजनेनुसार शिकतात. गुरुकुलामध्ये राजपुत्रांनादेखील कष्ट करावे लागत. याचा अर्थ माणसाने सुखात राहूच नये, असे समर्थांचे मत होते, असे मुळीच नाही. त्यांच्या मते, कष्ट हे कारण आहे आणि सुख हे कार्य आहे.


संताना कुणीही शत्रू असत नाही; पण समर्थांना दोन शत्रू होते. एक आळस आणि दुसरा दुश्चितपणा. आळसामुळे मनुष्य प्रयत्न करायचे टाळतो. विनोदाने समर्थ म्हणतात की आळशी माणसाला पडून राहण्याचे काम एवढे मोठे असते की त्यानेच तो थकून जातो. कष्ट टाळण्यासाठी माणूस आळसाच्या मागे लागतो.


दुश्चितपणा हा आळसाचा परिणाम आहे. दुश्चित याचा अर्थ कुठेच लक्ष नसणे. शरीराने एखाद्या ठिकाणी उपस्थित असणे आणि मनाने तेथे नसणे याला समर्थ दुश्चित म्हणतात. विद्यार्थी वर्गाात बसला असेल; पण त्याचे जर तासाकडे लक्ष नसेल तर तो वर्गात असून नसल्यासारख्याच आहे. आळस आणि दुश्चितपणा या दोन दोषांमुळे माणूस एकतर प्रयत्न करायचे टाळतो किंवा प्रयत्न करताना चुकतो आणि अपयश आले म्हणजे नशिबाला दोष देतो. माणसाला अपयशाचे खापर फोडण्यासाठी जागा हवी असते . प्रारब्ध अथवा नशीब ही ती सुरक्षित जागा आहे. एखाद्या व्यक्तिला दोष दिल्यास ती व्यक्ती भांडायला उठेल; पण गुपचूप ऐकून घेणे हेच नशिबाच्या नशिबात लिहिले आहे.

(संकलन - सौ.वनमाळी, सौ जोग.)