Tuesday, January 13, 2009

बालोद्यानातील बालगोपाळांसमवेत...

22 नोव्हेंबर ते 09 जानेवारी 2009 पर्यंतचा अहवाल.

                                                                     प्रेषिका : सुषमा प्रधान, संगीता तांबे

गुरुवार दिनांक 20 नोव्हेंबर 2008 रोजी ’चिन्मय मिशन’ संस्थेतर्फे गीतापठण स्पर्धा झाली (आठवा अध्याय - 6 श्लोक पाठांतरासाठी होते.) स्पर्धेत 15 विद्यार्थ्यांनी भाग घेतला. त्यापैकी 3 स्पर्धकांची निवड दुसऱ्या फेरीसाठी झाली. सर्व विद्यार्थी बालवर्ग/Sr.K.G. चे होते.

शनिवार दिनांक 29/11/2008 रोजी ’पालक-शिक्षक’ सभा घेण्यात आली.

सोमवार दिनांक 01/12/2008 ते 03/12/2008 पर्यंत बालोद्यानमध्ये क्रीडामहोत्सव साजरा करण्यात आला. मुलांनी विविध खेळामध्ये उत्साहाने भाग घेतला.

बालवर्ग/Sr.K.G. साठी - धावणे, अडथळा शर्यत, संगीतखुर्ची.

शिशुवर्ग/Jr.K.G. साठी - धावणे, बेडूक उडी, नागमोडी चालणे हे खेळ घेण्यात आले.

शुक्रवार दिनांक 05/12/2008 रोजी बालवर्ग/Sr.K.G. आणि शिशुवर्ग/Jr.K.G. या वर्गाची श्लोक पाठांतर स्पर्धा घेण्यात आली. प्रतिसाद चांगला होता.

शनिवार दिनांक 06/12/2008 रोजी ’बॉम्बे आर्टस अॅन्ड स्पोटर्स’ आयोजित आंतरशालेय समूहगान स्पर्धा ‘दिनानाथ मंगेशकर’ नाट्यगृह पार्ले येथे घेण्यात आली. या स्पर्धेत बालवर्ग/Sr.K.G. च्या 10 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. समूहगानाचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी उत्तम प्रकारे केले. सर्व स्पर्धक विद्यार्थ्यांना आयोजकांतर्फे प्रशस्तिपत्रक व खाऊ देण्यात आला.

रविवार दिनांक 07/12/2008 रोजी ’चिन्मय मिशन’ तर्फे घेण्यात आलेल्या गीतापठण स्पर्धेत दुसऱ्या फेरीत निवड झालेल्या 3 विद्यार्थ्यांची स्पर्धा ’चिल्ड्रन्स अॅकेडमी’ कांदिवली - पूर्व,

येथे घेण्यात आली. त्यापैकी 1 स्पर्धकाची निवड तिसऱ्या फेरीसाठी म्हणजे राज्यपातळीवरील स्पर्धेसाठी करण्यात आली. ही तिसरी फेरी जानेवारी 2009 मध्ये होणार आहे. शनिवार दिनांक 13/12/2009 रोजी सकाळी 10.00 ते 10.30 या वेळेत शाळेच्या संकुलातील सर्व शिक्षकांसाठी सौ. मीनल दिक्षित, मुख्याध्यापिका, गोदावरी पोद्दार हायस्कूल, सांताक्रूझ, यांचे व्याख्यान आणि कार्यशाळा आयोजित केली होती. कार्यशाळा खूपच छान झाली.

वात्सल्य ट्रस्टतर्फे ’भाऊबीज भेट’म्हणून जो निधी जमा करण्यात येतो त्या निधीस यावर्षी बालोद्यान विद्यार्थ्याकडून 2000/- रुपये जमा करून देण्यात आले. सोमवार दिनांक 22/12/2008 ते बुधवार दिनांक 24/12/2008 पर्यंत शिशुवर्ग/ Jr.K.G. ची वर्गाप्रमाणे ’वेशभूषा’ स्पर्धा घेण्यात आली.यावर्षी स्पर्धेसाठी प्रत्येक वर्गाला विषय दिला होता. (Jr.K.G.A - देव, Jr.K.G.B. - संत , शिशुवर्ग -आपले मदतनीस.) स्पर्धेला प्रतिसाद चांगला होता.

गुरुवार दिनांक 25/12/2008 आणि शुक्रवार दिनांक 26/12/2008 रोजी बालोद्यानाला नाताळची सुट्टी होती.

सोमवार दिनांक 29/12/2008 व मंगळवार दिनांक 30/12/2008 रोजी प्राथमिक इंग्रजी विभागाच्या विद्यार्थ्यानी ’विज्ञान प्रदर्शन मांडले होते ते बालोद्यानाच्या विद्यार्थ्यांना दाखविले. मुलांना त्याची मजा वाटली. त्यांनी वर्गात प्रश्न विचारले व उत्तरे समजून घेतली

. बुधवार दिनांक 31/12/2008 रोजी मराठी माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. आसावरी सुर्वे यांचा निरोप समारंभ दहिसर स्पोर्टस् फाऊंडेशनच्या सभागृहात झाला. सौ. आसावरी सुर्वेमॅडम यांच्याविषयी बालोद्यानातर्फे सौ. कल्पिता वर्तक यांनी शाळेच्या माजी विद्यार्थीनी व आता एक शिक्षिका या नात्याने आपले मनोगत व्यक्त केले व बालोद्यानातर्फे मुख्याध्यापिका सौ. जोशीमॅडम यांच्या हस्ते सौ. सुर्वेमॅडमना भेटवस्तू देण्यात आली.

शुक्रवार दिनांक 02/01/2009 रोजी ’नवीन वर्षाचे’ स्वागत उत्साहाने करण्यात आले. मुलांना खाऊ म्हणून मक्याचा चिवडा देण्यात आला. रविवार दिनांक 04/01/2009 रोजी ’चिन्मय मिशन’ गीता श्लोक पाठांतर स्पर्धेत तिसऱ्या फेरीत निवड झालेल्या एका स्पर्धकाची स्पर्धा ’सांदिपनी साधना विद्यालय’, पवई येथे घेण्यात आली. ही राज्यस्तरीय स्पर्धा होती. विद्यार्थ्याचे सादरीकरण उत्तम होते.

बुधवार दिनांक 07/01/2009 रोजी बालवर्ग /Sr.K.G. विद्यार्थ्यांची सहल ’टिकूजीनी वाडी घोडबंदर, ठाणे, येथे गेली होती. सहलीचा मुलांनी भरपूर आनंद घेतला. वेगवेगळ्या क्रीडासाधनांवर मुले बागडली. सहलीच्या सहभोजनाचा आस्वाद घेतला. सर्व शिक्षकही मुलांबरोबर मूल होऊन सहलीचा आनंद लुटत होते. बसमधून जाता-येता मस्त गाणी गप्पा अशी खूपच धमाल केली. दुसऱ्या दिवशी येताना मुलांनी ’सहल’ या विषयावर उत्तम चित्रे काढून आणली होती.

No comments: