Showing posts with label School Building. Show all posts
Showing posts with label School Building. Show all posts

Saturday, June 19, 2010

हे स्वप्न की म्हणावे...

निर्विघ्नं कुरु मे देव | सर्व कार्येषु सर्वदा ||

जेव्हा स्वप्न साकार होते तेव्हा मनात येणाऱ्या भावभावना अवर्णनीय असतात. हे खरंच प्रत्यक्षात आलंय का असं वाटत राहतं. विशेषतः एखादा उराशी बाळगलेला ध्यास साध्य झाला की स्वत:ला ओतून  घेतल्यावर येणारं प्रसन्न रितेपणही आनंदासोबत असतं. 

साडेबारा कोटी रु पहिल्या प्रवेशाचा मान होता इंग्रजी प्राथमिक विभागाचापये खर्चाच्या प्रकल्पाला ज्यावेळी मराठी शाळा  चालवणारी किंवा मराठी वळणाची इंग्रजी शाळा चालवणारी माणसं हात घालतात त्यावेळी त्यांना बहुतेकांनी वेडात काढलेलं असतं. ‘शाळा बांधताय की मॉल?’ अशासारखी शंकेखोर वक्तव्यं सहन करीत जेव्हा काही ‘पछाडलेली’ मंडळी स्वतःला या कामात झोकून देतात तेव्हा साकारतं एक नवल.

दहिसरच्या विद्या मंदिर शाळेत 14 जूनला जेव्हा मुलांनी शाळेच्या नव्या वर्गांमध्ये प्रवेश केला तेScaling the heightsव्हा असंच नवल प्रत्यक्षात घडलं. 600 चौ.फुटांचे भव्य वर्ग, 4’x16’ लांबीचे मॅग्नेटिक  ग्रीन बोर्डस्, 1’x3’x16’ आकाराचे प्लॅटफॉर्म्स, ही आहे या शाळेची एक झलक.

प्रत्येक वर्गात, प्रत्येक मजल्यावर भरपूर मोकळी जागा आहे. पश्चिमेकडून आणि नैऋत्येकडून येणारा वारा आहे आणि उत्तरेकडून येणारा मोकळा प्रकाश! साऱ्या बाळगोपाळांचे चेहरे आनंदाने फुलून गेले होते. नाचत, उड्या मारत वर्गात शिरणाऱ्या मुलांचा आनंदाचे डोही आनंद तरंग निर्व्याज आनंद पाहण्यासारखा होता.

ह्या स्वप्नपूर्तिसाठी जीवापाड कष्ट केलेली शिक्षक मंडळी हरखून गेलेली हो ती.

‘सुखार्थिनः कुतो विद्या  कुतो विद्यार्थिनः सुखम् । असं म्हणण्याचे दिवस आता गेले आहेत. चिंचोळ्या  गल्लीबोळातला प्रत्येक ‘कोचिंग क्लास’ आता ‘एसी’ असावा लागतो. अशा व्याउभारोनि उंच बाहू... पारी शिक्षणाशी स्पर्धा करण्यासाठी शाळेतल्या शिक्षकांची उमेद आता नक्कीच वाढलेली आहे.

हे नवल घडवलंय  मुख्यतः ह्या शाळेच्या पालकांनी. अनेक वर्षे ह्या पालकांनी पदरमोड करून निधी उभारला. ‘आमअवकाशी आनंदु | कोंदाटला ||  च्या मुलांना तर काही नवी शाळा मिळण्याची शक्यता दिसत नाही’ असा कोतेपणाचा विचार केला नाही. अनेक दानशूर आणि समाजहितैषी सज्जनांनी हातभार लावला. शाळेचे नव्या दमाचे माजी विद्यार्थी संचालकांच्या खांद्याला खांदा लावून सरसावले आणि पत्र्याखाली तापणारी मुलं सुखद गारवा देणाऱ्या छत्राखाली नेण्याचं स्वप्न साकार झाज्ञानसोपान - १  लं.

लवकरच शाळेच्या आवारातील कच्च्या इमारती पाडून मैदान मोकळे केले जाईल. शाळेचे बालोद्यान तळमजल्यावर असून बालोद्यानाच्या नव्या स्वरूपाबद्दल आम्ही तुम्हाला सविस्तर सांगणारच आहोत. शाळेच्या इमारतीच्या केवळ बाह्य स्वरूपातच नव्हे तर अभ्यासक्रमातही गुणात्मक सुधारणा करण्याचा निश्चय शिक्षकांनी केलेला आहे. केवळ शालांत परीक्षेचा निर्णय चांगला  लागतो  आहे ह्यावर समाधान न मानता मुलांना फक्त परीक्षार्थी न करता खरेखुरे विद्यार्थी करण्याचे आव्हान शिक्षकांनी स्वीकारले आहे.

अनेकांचं ऋणज्ञानसोपान - २  शिरावर घेऊन हा टप्पा गाठलेला आहे. शाळेच्या प्रस्तावित इमारतीचा उरलेला निम्मा भागही अजून बांधायचा आहे. तोही तुम्हा सर्वांच्या सहकार्यानं लवकरात लवकर बांधून होईल यात शंका नाही.    


(छायाचित्रे : निशिकांत हंबीर)

Thursday, July 16, 2009

आजि सोनियाचा दिनु

आजि सोनियाचा दिनु

वर्षे अमृताचा घनु

शालान्त परीक्षेclip_image002तील यशस्वी विद्यार्थ्यांचं कौतुक

मा. श्री. अशोक शिंत्रे, मुख्य अभियंता, बृहन्मुंबई महानगरपालिका, यांच्या हस्ते करण्यात आले. कौतुक सोहळ्याच्या ह्या चित्रामध्ये उजवीकडून मुख्याध्यापक श्री. वाघ सर, मा. श्री. अशोक शिंत्रे, मंडळाचे अध्यक्ष श्री. ज. स. साळुंखे, उपाध्यक्ष श्री. सुरेश ठाकूर दिसत आहेत.

व्यासपीठावर स्थानापन्न आहेत, उजवीकडून-उपमुख्याध्याclip_image004पिका सौ. सावे मॅडम, मुख्याध्यापक श्री. वाघ सर, मा. श्री. अशोक शिंत्रे, मंडळाचे अध्यक्ष श्री. ज. स. साळुंखे, उपाध्यक्ष श्री. सुरेश ठाकूर

शालान्त परीक्षेचा निर्णय जाहीर झाला की विद्या मंदिरात आनंदोत्सव सुरू होतो. तो विद्यार्थ्यांच्या शिक्षकांच्या, आणि पालकांच्या श्रमसाफल्याचा दिवस असतो. रोषणाई, फटाके आणि मिठाई अशी दिवाळी साजरी होते. इंग्लिश माध्यमाचा 100% आणि त्यामागोमाग थोडा कमी असा मराठी माध्यमाचा निकाल लागलेला असतो. हे वर्षही त्याला अपवाद नव्हते. 80% च्यावर गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचं शाळेतर्फे कौतुक केलं जातं. शिक्षकांच्या आणि पालकांच्या साक्षीनं विद्यार्थी ह्या हृद्य सोहळ्यात सहभागी होतात.

clip_image006इमारत बांधकामाचे सोबत जोडलेले छायाचित्र दि. 12/07/2009 रोजी घेतलेल आहे. आपण पहाल की नैऋत्येकडील भागात विटांचे बांधकाम गच्चीपर्यंत पूर्ण झालेले आहे. उत्तरेकडे म्हणजेच हॉलच्या वर चौथा स्लॅब टाकण्‌याची तयारी जवळ जवळ पूर्ण झाली असून स्लॅब दि. 14/15 जुलै रोजी स्लॅबचे काम पूर्ण व्हावे.



Please see the link for more photos of "Kautuk Sohala 09" : -
http://picasaweb.google.co.in/lh/sredir?uname=vmandir&target=ALBUM&id=5363105228683179041&authkey=Gv1sRgCIz9iumR9JaCZA&feat=email

Friday, April 24, 2009

नव्या शाळेचे कोडकौतुक

मुंबईच्या आदरणीय महापौर डॉ.सौ. शुभा राऊळ आणि श्री. उमेश राऊळ यांनी मध्यंतरी आपल्या शाळेच्या नव्या इमारतीच्या बांधकामाला भेट दिली. त्यांची कन्या आपल्या शाळेची माजी विद्यार्थिनी आहे आणि ती शाळेत शिकत असल्यापासून श्री. आणि सौ. राऊळ ह्यांना शाळेच्या कार्याविषयी जिव्हाळा आहे. शाळेला विविध वेळी त्यांनी आपुलकीने आणि सक्रिय सहकार्य आणि मार्गदर्शन केलेले आहे. उभयतांचे आभार मानण्याची संधी आम्ही येथे घेत आहोत. सोबतच्या छायाचिclip_image004त्रामध्ये श्री.आणि सौ.राऊळ, शाळेचे आर्किटेक्ट श्री. विजय फुलकर आणि श्री. संजय अर्नाळकर तसेच मंडळाचे उपाध्यक्ष श्री. म्हांबरे आणि स्रोतसंकलन समितीचे अध्यक्ष श्री. सुरेश ठाकूर ह्यांच्यासमवेत दिसत आहेत.

शाळेच्या नव्या clip_image002इमारतीच्या तळमजल्यावरील सभागृहाला आता कुठे आकार येतोय. पण इयत्ता चौथीच्या निवासी शिबिरासाठी शाळेत एक रात्र मुक्काम करणाऱ्या चौथीच्या मुलामुलींचा नव्या शाळेत शिबिर भरवण्यासाठी उत्साह उतू जात होता. शाळेनंही भिंतीचे काम सुरू असलेल्या ह्या सभागृहाला झालरींनी सजवून, नव्या हॉलमध्ये कार्यक्रम करण्याची मुलांची हौस पुरवली. आपल्या नातवंडांचे आणि नव्या शाळेचे कोडकौतुक करायला मुलांचे आजी-आजोबाही आवर्जून उपस्थित होते. सोबतच्या छायाचित्रात याचीच एक झलक दिसते आहे.

clip_image006नवीन बांधकामाचे दि. 20 एप्रिल 2009 रोजी घेतलेले छायाचित्र सोबत जोडले आहे. प्रकल्पाचे काम सुरळीतपणे चालू आहे. पुन्हा एकदा सविनय नमूद करणे आवश्यक आहे की

प्रकल्पाची आजपर्यंतची प्रगती आपल्या सक्रिय पाठिंब्यामुळे शक्य झालेली आहे.

Monday, January 12, 2009

New School Building

VPM's Vidya Mandir Dahisar, is poised to take off to a brighter future with the construction of the new school building progressing in full swing.

The estimated cost of the project is in the region of Rs.12.5 Crores.

M/s. Paranjpe and Deshpande, as Hon. Consulting  Architects have designed the school building and M/s. Phulkar & Kangutkar are overseeing the construction as our chartered architects. M/s. Kankon Managements are the Project Managementimage Consultants and Shri. Harshad Gokani is helping the institution as the Structural Engineer. 

A brief look at the comparative statement below will be helpful to understand the infrastructural enhancements planned.

Total Area under use Current Future
Classrooms 28 (500 Sq.ft. each) 40 (600 Sq.ft. each)
Laboratories 1 (1000 Sq.ft) 3 (1300 Sq.ft. each)
Computer Room 1 (500 Sq.ft) 1 (1300 Sq.ft)
Workshop - 1 (1300 Sq.ft.)
Library 1000 (1000 Sq.ft.) 1 (2550 Sq.ft.)
Atrium - 1 (850 Sq.ft.)
Drawing Studio - 1 (1300 Sq.ft.)
Store room 2 (100 Sq.ft each) 1 (1300 Sq,ft)
Lifts - 3
Staircases 1 2

 

Students presently accommodated in one of the temporary structures are expected to be shifted to the new building with the begining of the next academic year.

Sunday, October 5, 2008

नवीन इमारत साकारते आहे.

 Vidya Mandir School New Bldg.Const.Work 007

आपल्या शाळेच्या नूतन इमारतीचे सुनियोजित बांधकाम सुरू झाले आहे. शाळा व शिक्षणप्रेमी विद्यार्थ्यांनी, पालकांनी, तसेच दहिसरच्या नागरिकांनी शाळेला एकदा अवश्य भेट द्यावी ही विनंती.

Vidya Mandir School New Bldg.Const.Work 011

(Photos : N Mirashi)