मुंबईच्या आदरणीय महापौर डॉ.सौ. शुभा राऊळ आणि श्री. उमेश राऊळ यांनी मध्यंतरी आपल्या शाळेच्या नव्या इमारतीच्या बांधकामाला भेट दिली. त्यांची कन्या आपल्या शाळेची माजी विद्यार्थिनी आहे आणि ती शाळेत शिकत असल्यापासून श्री. आणि सौ. राऊळ ह्यांना शाळेच्या कार्याविषयी जिव्हाळा आहे. शाळेला विविध वेळी त्यांनी आपुलकीने आणि सक्रिय सहकार्य आणि मार्गदर्शन केलेले आहे. उभयतांचे आभार मानण्याची संधी आम्ही येथे घेत आहोत. सोबतच्या छायाचित्रामध्ये श्री.आणि सौ.राऊळ, शाळेचे आर्किटेक्ट श्री. विजय फुलकर आणि श्री. संजय अर्नाळकर तसेच मंडळाचे उपाध्यक्ष श्री. म्हांबरे आणि स्रोतसंकलन समितीचे अध्यक्ष श्री. सुरेश ठाकूर ह्यांच्यासमवेत दिसत आहेत.
शाळेच्या नव्या इमारतीच्या तळमजल्यावरील सभागृहाला आता कुठे आकार येतोय. पण इयत्ता चौथीच्या निवासी शिबिरासाठी शाळेत एक रात्र मुक्काम करणाऱ्या चौथीच्या मुलामुलींचा नव्या शाळेत शिबिर भरवण्यासाठी उत्साह उतू जात होता. शाळेनंही भिंतीचे काम सुरू असलेल्या ह्या सभागृहाला झालरींनी सजवून, नव्या हॉलमध्ये कार्यक्रम करण्याची मुलांची हौस पुरवली. आपल्या नातवंडांचे आणि नव्या शाळेचे कोडकौतुक करायला मुलांचे आजी-आजोबाही आवर्जून उपस्थित होते. सोबतच्या छायाचित्रात याचीच एक झलक दिसते आहे.
नवीन बांधकामाचे दि. 20 एप्रिल 2009 रोजी घेतलेले छायाचित्र सोबत जोडले आहे. प्रकल्पाचे काम सुरळीतपणे चालू आहे. पुन्हा एकदा सविनय नमूद करणे आवश्यक आहे की
प्रकल्पाची आजपर्यंतची प्रगती आपल्या सक्रिय पाठिंब्यामुळे शक्य झालेली आहे.
No comments:
Post a Comment