शैक्षणिक गुणवत्ता हे ध्येय आहे, तंत्रज्ञान हे ध्येय नव्हे, असे भान ठेवून काळाबरोबर राहण्यासाठी आवश्यक तितकाच तंत्रज्ञानाचा अंगीकार करावा. गुणवत्तेचे प्रश्न अमूकच तंत्रज्ञान वापरून सुटतील असे नाही. साधनसामग्रीचा वापर गुणवत्तावर्धनासाठी कसा करावा ह्याचा विचार प्रामुख्याने करायचा आहे.
अध्ययनक्षेत्रात तंत्रज्ञानाची, विशेषतः इंटरनेटची मर्यादा स्पष्ट करणारे सादरीकरण येथे उपलब्ध आहे ते अवश्य पहावे. पूर्णतः इंटरनेटवर अवलंबून राहण्याऐवजी इंटरनेटच्या जोडीने संगणकाचा वापर सादरीकरणे तयार करण्यासाठी वापरणे हा सुवर्णमध्ये ठरू शकतो. शिक्षकाचे श्रम आणि विद्यार्थ्यांचा वेळ वाचणार असेल तर असे तंत्रज्ञान अवश्य वापरावे. इंटरनेटवर विनामूल्य वापरासाठी अध्ययनसाहित्य, चित्रे, आकृत्या, ऍनिमेशन्स, व्हिडिओज् वगैरे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. (उदाहरणार्थ सोबत दिलेली प्रतिमा विकीमीडियावरील आहे) आपल्याला हवे ते शोधण्याचे कष्ट घेतले तर शिक्षकांना आकर्षक सादरीकरणे तयार करता येतील.
3 comments:
आपली संस्था ब्लॉग चालवते आहे हे पाहून फार बरे वाटले. वेबसाइट्ला ब्लॉग हा एक चांगला पर्याय आहे व प्रसिद्धीचे वा माहितीप्रसारणाचे काम ब्लॉगने सुलभपणे करता येते. आपल्या उपक्रमशीलतेबद्दल आपले अभिनंदन! आपले विद्यार्थी वा त्यांचे पालक यानाही या उपक्रमांत सहभागी करून घेतां येईल असे सुचवावेसे वाटते.
आपला ब्लॉग नजरेला आला व एका संस्थेने चालवलेला ब्लॉग यातील नावीन्य जाणवून उत्सुकतेने वाचला. मी आमच्या ’सोबती’ या ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने एक ’सोबती’ याच नावाने ब्लॉग सुरू केला त्याला आठ महिने झाले. असे काहीतरी करणारा मी पहिलाच असा मला गर्व वाटत होता! तुमचा ब्लॉग त्याहूनहि जुना आहे हे पाहून माझा गर्व लयास गेला! आपण ब्लॉग उत्तम प्रकारे चालवत आहात हे पाहून फार आनंद झाला. मराठीतून नवे तंत्रज्ञान वापरण्यात शैक्षणिक संस्थांनीच पुढाकार घ्यायला हवा, ते तुम्ही करीत आहात याबद्दल अभिनंदन.
प्र. के. फडणीस. विले-पार्ले पूर्व.
श्री. फडणीस साहेब,
आपल्या अभिप्रायाबद्दल आणि प्रोत्साहनाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
आपल्या सूचनेनुसार विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा सहभाग वाढविण्याचा आम्ही अवश्य प्रयत्न करू.
Post a Comment