Wednesday, January 9, 2008

अभ्यासिका

विद्या प्रसारक मंडळ ग्रंथालय संगणक अभ्यासिका

वार्षिक अहवाल 2006-07

दूरध्वनी क्र. 65205520

रोटरी क्लब, दहिसर, श्री सौ. शंतनू दंड - युएसए आणि रोटरी इंटरनॅशनल ह्यांच्या आर्थिक सहकार्यातून दि.14 नोव्हेंबर 2002 रोजी विद्या मंदिर ग्रंथालय आणि अभ्यासिकेची सुरुवात झाली. पहिल्या महिन्यात सभासदसंख्या 22 होती.

विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना अभ्यासक्रमासाठी पूरक संदर्भसाहित्य मिळावे, संगणकाचे अद्ययावत् ज्ञान मिळावे, वाचनाची आवड असलेल्या कोणाही व्यक्तीला वाचनाचा आनंद घेता यावा, शालेय तसेच इतर विद्यार्थ्यांची अभ्यासाची सोय व्हावी असा हेतू विद्या प्रसारक मंडळाच्या ह्या ग्रंथालयाचा संगणक अभ्यासिकेमागे आहे.

1. ग्रंथालयाची वेळ :- ग्रंथालय सकाळी 7.00 ते संध्याकाळी 7.00 या कालावधीत चालू असते.

2. ग्रंथालय संपदा :- ग्रंथालयात शैक्षणिक , मनोरंजन, माहितीपर इत्यादी विविध प्रकारचे वाचनसाहित्य उपलब्ध आहे.

3. सभासदांना देण्यात येणाऱ्या सुविधा :- एका वेळी 1 पुस्तक ( परत करण्याची मुदत 1 महिन्यापर्यंत) , 1 मासिक ( परत करण्याची मुदत 15 दिवसापर्यंत ) किंवा 1 सी. डी. ( परत करण्याची मुदत 5 दिवसांपर्यत ) घरी नेता येते.

4. आकडेवारी : - सभासद संख्या - 865

पुस्तके - सुमारे 8500

मासिके - 37

सी.डी. - 387

5. ग्रंथालय समिती :-

अध्यक्ष - श्री. महादेव . तायशेटे

कार्यवाह - श्री. प्रविण पुरळकर (ग्रंथपाल)

सदस्य - श्रीमती राजश्री गोसावी

- श्रीमती अजिता गाडगीळ

- श्री. प्रसाद कुळकर्णी

- श्रीमती मधुरा जठार

6. ग्रंथालयाद्वारे संपन्न होणारे उपक्रम :-

) शैक्षणिक : - अभ्यासक्रमाचा भाग म्हणून शिक्षकांना विद्यार्थ्यांना विविध माहिती उपलब्ध करून दिली जाते. यासाठी ग्रंथालयातील संदर्भग्रंथ, कात्रणे, इत्यादींच्या माध्यमातून ही माहिती पुरविली जाते. शालेय बहि:शाल परीक्षांच्या मागील वर्षातील प्रश्नपत्रिकांच्या झेरॉक्स प्रती विद्यार्थ्यांना दिल्या जातात.

) इतर :

1) विनामूल्य वाचनालय :-मे महिना दिवाळीची सुट्टी या कालावधीत वाचकांना ग्रंथालयामध्ये बसून वाचनाचा आनंद विनामूल्य घेता येतो.

2) अल्पमुदत सभासदत्व :- विविध विद्यापीठीय व्यावसायिक परीक्षांना प्रविष्ट होण्याऱ्या विद्यार्थ्यांसाठी अल्पमुदत सभासदत्वाद्वारे अभ्यासिकेची सोय करण्यात आली आहे.

3) दिवाळी अंक :- विविध विषयांवरील दिवाळी अंक वाचकांना उपलब्ध व्हावेत याहेतूने ही योजना गेली तीन वर्षे राबविण्यात येत आहे.

4) अग्रहक्क योजना :- ग्रंथालयात नवीन नोंद होणारी पुस्तके अग्रहक्क विभागात ठेवून ती वाचकाच्या अग्रहक्क क्रमाने वाचकांना उपलब्ध करून दिली जातात. ह्या योजनेसाठी तसेच आपल्याकडील पुस्तकांची मुदत वाढविण्यासाठी सभासद दूरध्वनीचा वापरही करू शकतात.

1 comment:

Anonymous said...

इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांना English च्या धड्यांचे वाचन Computer वर करण्यासाठी http://adf.ly/a8GP
या link वर क्लिक करा.
पाटील सर