Tuesday, December 25, 2007

Library@VidyaMandir

Vidya Mandir library completed 5 years of existance, silently growing in strength. It won't be surprising if it succeeds in putting its student members on the blogging map in near future.

Here, two FAQs are answered. We may have to go on to other questions as and when they are posed frequently by the school community. After all, having a library or study room need not be considered a novelty. What we have attempted differently is to try and share the book banks of all the stake-holders at a single place, running 12x7.

अभ्यासिका स्थापन करण्यामागचा हेतू काय ?

शाळेच्या वास्तूमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये आणि शाळेशी संबंधित सर्वजणांमध्ये अभ्यासाचे (स्वयंअध्ययनाचे) वातावरण निर्माण व्हावे हा मुख्य हेतू.

सुजाण लोकसंग्रहाची संधी अभ्यासिकेमुळे मंडळाला अनायासे मिळेल हा त्याचा आनुषंगिक फायदा आहे.

प्रत्येक शालेय विभागाचे विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी असे स्वतंत्र ग्रंथालय विभाग असताना वेगळ्या अभ्यासिकेचा प्रपंच कशासाठी केला ?

मंडळाचे हितचिंतक, शाळेतील पालक, माजी विद्यार्थी या सर्वांना अभ्यासिकेचा फायदा घेता यावा हा हेतू आहे. सर्वांनी आपले संग्रह एकत्रित केले तर त्याचा तोटा काहीच नाही पण फायदा मात्र सर्वांनाच आहे. अनुदानित विभागांमध्येही या उपक्रमावर करावयाच्या खर्चावर मर्यादा आहे. सर्व ग्रंथालय विभागांना रोटरीसारख्या संस्थांच्या किंवा इतर देणगीदारांच्या पाठबळाचा फायदा होईल असाही हेतू होता.

No comments: