Wednesday, July 28, 2010

बालोद्यान - एक आनंदयात्रा

- डॉ. सौ. वसुंधरा नाटेकर

डॉ. सौ. वसुंधरा नाटेकर
अरुणकमल प्राचीवर फुलले ...
पूर्वदिशेला (प्राची) सूर्य (अरुणकमल) उगवला  आणि त्याने साऱ्या सृष्टीत नवचैतन्य, आनंद फुलवला, हे तर अगदी नित्याचेच आहे.  आणि मग आपल्या दैनंदिन यात्रेला आनंदाने सुरुवात होते.  शिक्षणक्षेत्रातही अशीच एक आनंदयात्रा सुरू होते,  बालोद्यान - बालवाडीच्या रूपाने !
'बालोद्यान' - बाळगोपाळांनीं खेळण्याची, हसण्या-बागडण्याची बाग.  त्यांच्या शालेय आयुष्याची इवलीशी आनंदयात्रा सुरू होते ती याच बालोद्यानात.  त्यामुळे या उद्यानाचे अंतर्बाह्य स्वरूप कसे असेल किंवा असावे,  यचे कल्पनाचित्र आपल्या दृष्टीसमोर नक्कीच उभे राहिले असेल.
बालवाडीची संकल्पना मॅडम मॉंटेसरी यांनी मांडली ती अशी- 

'Education is not what teacher gives, it is aquired not by listening to words but by experience from the 'Enviornment '.  It is a method not of 'teaching' a child, but of 'living' by a child.'

    थोडक्यात, शिक्षक काय शिकवतात किंवा मुले शब्दरूपात काय ऐकतात, ते शिक्षण नव्हे, तर आजुबाजूच्या वातावरणातून जो अनुभव मुले घेतात तेच शिक्षण होय .  शिक्षण म्हणजे मुलांना शिकवण्याची पध्दत नसून मुलांकडून शिकण्याची, जाणून घेण्याची प्रक्रिया आहे;  आणि हे सर्वRole Play अगदी नैसर्गिक, हसत-खेळत अत्यंत मोकळ्या - ढाकळ्या , तणावमुक्त वातावरणात होणे हेही तितकेच महत्वाचे आणि अत्यावश्यक आहे; यात दुमत नसावे.

    आपले बाळ घराचा उंबरठा ओलांडून प्रथमच बालोद्यानची पायरी चढते तेव्हा त्याचे स्वागत तेथे कसे होईल? तो रडेल कां? तिथे तो काय करील ? काय शिकेल ? अभ्यास नीट करील नां? यासारख्या असंख्य प्रश्नांनी पालक अस्वस्थ होतात. सध्याच्या स्पर्धात्मक युगात आपले मूल कसे तरून जाईल ? याविषयी साशंक असतात. रोज वर्तमानपत्रातील शिक्षणक्षेत्रातील गोंधळाच्या बातम्यांनी त्यात आणखी भर पडत असते. पालकांच्या जिवाची ही घालमेल काही अंशी कमी व्हावी या उद्देशाने आपल्या बालोद्यानच्या नवीन स्वरूपाविषयी महत्वाची आणि आवश्यक माहिती सविस्तरपणे देत आहे.  बालवाडीचे शास्त्रशुध्द स्वरूप कसे असावे, त्याची उद्दिष्टे कोणती, ती उद्दिष्टे साध्य करण्याकरिता बालवाडीमध्ये लहानग्याना कशा प्रकारे हाताळावे, शिकवावे याविषयीचे माझे हे विवेचन केवळ माझे वैयक्तिक मत नसून मॅडम मॉंटेसरी या पाश्चात्य शिक्षणतज्ञ, तसेच आपल्याकडील श्रीमती ताराबाई मोडक, श्रीमती अनुताई वाघ,  श्रीमती शांताबाई आठवले यासारख्या बालशिक्षणासंबंधी बरेच संशोधन केलेया व्यक्तीचे आहे.

    सर्वप्रथम आपण लहान मुलांच्या शारिरिक, मानसिक भावनिक वाढीसंबंधी शास्त्रीय माहिती पाहू या.  आपल्या संपूर्ण आयुष्याच्या कालखंडाचा विचार केला तर अडीच ते सहा वर्षाचा काळ अत्यंत संवेदनाक्षम आणि संस्कारक्षम असतो.  मुलाच्या अंतरंग विकासाची गती ह्या काळात जेवढी असते तेवढी पुढे सत्तर वर्षापर्यंतही नसते.  तेव्हा हा काळ मुलाच्या व्यक्तिगत सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने किती महत्वाचा आहे ,हे ध्यानात येईल.  मुलाच्या मेंदूची जवळजवळ तीन चतुर्थांश वाढ याच काळात पूर्ण होते.  म्हणून बौध्दिक आणि मानसिक विकासाच्या दृष्टीने हे वय महत्त्वाचे आहे.  या काळात संवेदना ग्रहण करण्याची त्याची शक्ती अधिक तीव्र असते;  आणि शारीरिक जागृत असते.  'हे काय  ? ते काय ? कां ? कसे ?' या जिज्ञासू प्रश्नांचा भडिमार करतात आणि आपण त्याना उत्तरे देताना अगदी मेटाकुटीस येतो याचा अनुभव आपण घेतोच.

    मुलांची ही ओसंडून जाणारी ऊर्जा , प्रचंड जिज्ञासूवृत्ती, संवेदनाशीलता याना जर योग्य प्रकारे वाट दिली, वळण दिले तर त्यांची शारीरिक -मानसिक वाढ अगदी उत्तम होऊ शकेल. आणि त्याच्या उज्ज्वल भविष्याचा पाया आपण सर्वजण म्हणजे मुलांचे पालक, शिक्षक-शिक्षिका -सर्वजण मिळून भक्कम करू.  एक गोष्ट आपण सर्वांनी ध्यानात ठेवली पाहिजे की या वयाची मुले टीपकागदासारखी असतात. त्यांच्यासमोर ठेवलेले सर्व बरे-वाईट ती सर्व चटकन आत्मसात करतात,  त्याचे अनुकरण करतात.  तेव्हा त्यांच्यासमोर कोणते संस्कार-आदर्श ठेवायचे.  याचे आत्मभान आपणा सर्वांनाच हवे.

    पहिली अडीच वर्षे मूल परावलंबी, आत्मकेंद्री असते.  सर्वप्रथम आई, मग बाबा, इतर माणसे यांच्या सहवासात वाढत असते.  हळूहळू  मोठे होताना त्याच्या विकासाला चार भिंतींचे घर अपुरे पडू लागते.  त्याला समवयस्क मित्र-मैत्रिणींची गरज वाटू लागते.  हळूहळू ते समाजात मिसळण्यासाठी तयार होत असते.  याचवेळी त्याला समाजात स्थान मिळवून देणारी ही संस्था आहे.  बालवाडी हा घर आणि समाज याना सांधणारा महत्त्वाचा दुवा आहे.  त्यामुळे  बालवाडीचे स्वरूप काहीसे घरासारखे व काहीसे शाळेसारखे असते.  घरासारखे म्हणजे प्रेमळ, घरगुती गोष्टी बोलणारे, आईसारखी कोणीतरी काळजी घेणारी माणसे असणारे; आणि शाळेसारखे म्हणजे स्वत:बरोबरच इतर मुलांचा विचार करणारे, नाना तर्हेचे खेळ , साधने-साहित्य यांचा भरपूर उपयोग करून देणारे, समूह शिक्षणातून सांघिक वृत्ती जोपासणारे, शिस्त शिकवणारे; स्वच्छतेच्या, वागणुकीच्या चांगल्या संवयी लावणारे, असे बालवाडीचे स्वरूप आहे.

    थोडक्यात, बालवाडी म्हणजे प्राथमिक शाळेचा पूर्वअभ्यासक्रम नसून प्राथमिक शाळेतील अभ्यास आत्मसात करण्याची मुलांची मानसिक बैठक तयार करणारी संस्था आहे.  प्राथमिक शाळेत पुढे करायच्या अनेक गोष्टींची सुरुवात बालवाडीत होते.  उदाहरणार्थ, मुलाला संयम शिकावा लागतो,  हालचालींवर ताबा मिळवावा लागतो, मनाची एकाग्रता वाढवावी लागते.  या सर्व गोष्टी मुलाच्या नकळत सहजपणे बालवाडीत साधल्या जातात.  त्यामुळे पुढे शाळेत सलग चार-पाच तास बसणे, लेखन-वाचन करणे, हे सुसह्य होते. मूल अभ्यास करायला कंटाळत नाही, गोंधळत नाही.

    तात्पर्य, बालोद्यानचा अभ्यासक्रम म्हणजे फक्त 1 ते 10 अंक, क, ख,ग, घ; A, B, C, D, 1-10 अंक हे स्वरूप नसून त्याच्या आरोग्याचा विकास म्हणजे स्वच्छता, आहार, व्यायाम, विश्रांती; त्याची मानसिक गरज म्हणजे प्रेम, संरक्षण, विश्वास, मनोरंजन; त्याचा भावनिक विकास म्हणजे आनंद, सहसंवेदना, शांती- समाधान, प्रेमभावना, आदर; हे सर्व बालोद्यानच्या अभ्यासक्रमात अंतर्भूत आहे.

    एकूण बालोद्यानचे स्वरूप, कार्य, उद्दिष्ट यांचा सविस्तर ऊहापोह केल्यानंतर पुढचा प्रश्र्न-'आपल्या म्हणजे विद्या प्रसारक मंडळाच्या बालोद्यानमध्ये हे सर्व होते कां?'  या प्रश्र्नाचे उत्तर "हो' असे आहे.  आता चर्चा  केलेल्या 
बऱ्याच गोष्टींचा विचार करूनच आपल्या बालोद्यानची आखणी केलेली आहे. मुलांना साधनांद्वारे, खेळण्यांच्या माध्यमातून सर्व प्रकारचे आवश्यक ते शिक्षण आपण देतोच, पण आतापर्यंत शाळेची जागा मर्यादित होती, आणि बालोद्यानसाठी मिळणारा वेळही थोडा कमी होता.  त्यामुळे अनेक गोष्टी करायच्या मनात असूनही करता येत नव्हता.  परंतु  आता आपण आपल्या शाळेच्या नवीन, भव्य, प्रशस्त, हवेशीर वास्तूत प्रवेश केला आहे.  या नवीन इमारतीत बालोद्यानसाठी उपलब्ध जागा खूपच मोठी आणि ऐसपैस आहे.  मोठेमोठे वर्ग, कार्यशाळा, मैदानव्या इमारतीमधील सभागृहात नी खेळ, बैठे खेळ या सर्वांसाठी भरपूर मोकळी जागा, जेणेकरून आपली मुले स्वैरपणे बागडत, हसतखेळत त्यांच्या नकळ्त शिकू लागतील.
बालवाडीची जास्तीत जास्त उद्दिष्टे साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या नवीन वास्तूत नूतन बालोद्यानची रचना अशी आहे-
-30' X 20' = 500 चौ.फूट आकाराचे 3 वर्ग (खोल्या)
-मैदानी खेळ व बैठे खेळ खेळण्यासाठी अतिशय सुरक्षित व खूप प्रशस्त जागा.
-सी-सॉ, घसरगुंडी, झोपाळे, होड्या यांची मोकळ्या जागेत मांडणी
-मुलामुलींसाठी त्यांच्या उंचीस योग्य अशी, स्वतंत्र , स्वच्छतागृहे.
-मुलांचे बूट वर्गातच ठेवण्यासाठी शूरॅक्स तसेच त्यांचे खाऊचे डबे,वॉटरबॅग, बॅग ठेवण्यासाठी रॅक्स -यांची रचना व उंची अशी की प्रत्येक मूल आपले सामान स्वत: घेऊन वापरू शकेल व स्वावलंबनाचा पाठ त्याला त्यामधूनच मिळेल.
-मुलांना वर्गात बसण्यासाठी आकर्षक रंगाची कारपेटस्‌ व त्यावर सुंदर सतरंज्या.  त्याच्यासमोर रंगीबेरंगी छोटी,लांब लाकडी बाकडी त्यांचा उपयोग मुलानी खाऊ खाणे, चित्रकला, हस्तकला, खेळ्-मांडणी यासाठी होईल.

* मुलांना  बसवण्यासाठी मोठी बेंचेस नाहीत.

कारण -     1) या वयातील मुलांनी एकाच जागी बसून राहाणे अपेक्षित नाही.  त्यांच्या शरीराची सतत हालचाल हवी, जी त्यांच्या स्नायूंच्या वाढीला पोषक आहे. एकाच जागी बसणारे मूल आळशी, मलूल दुबळे होते.  त्याच्यातील नैसर्गिक उर्जेला वाव देण्यासाठी त्याने सतत खेळते राहावे.

    2) त्याची सोशल डेव्हलपमेंट होण्याच्या दृष्टीनेही ते एकाच जागी बसणे योग्य नाही.  त्यामुळे ठराविक मुलांशीच त्याचा संवाद होईल.  शेजार, सहकार्य, दुसऱ्याला समजून घेणे या गोष्टींसाठी मुलांनी छोट्या छोट्या ग्रूपमध्ये राहाणे अपेक्षित आहे.

    3) जमिनीवर बसल्याने मुलांच्या शिक्षिका देखील त्यांच्याजवळ तशाच बसून गप्पा-गोष्टी करतील.  त्यांचा सहवास मुलांना सुरक्षितता आणि आईची मायाही देतो, त्यामुळे मुलांची बाईंशी भावनिक जवळीक निर्माण होऊन ती तणावमुक्त वातावरणात हसत-खेळत शिकतील.

    4) शारिरिक वाढीच्या दृष्टीनेही बेंचवर बसल्याने मुलांच्या हालचालीवर बंधन येते.  विशिष्ट कोनातच गुडघे-पाय-राहिल्याने त्यांचे स्नायू, स्नायूबंधने, सांधे यांची वाढ योग्य प्रमाणात न होता ते जखडल्यासारखे होतात.  मांडी घालून बसण्याची नैसर्गिक क्रिया सुध्दा शिकवावी लागते.  आज आपल्या संस्कारातील सूर्यनमस्कार, योगक्रिया यांचे महत्त्व पाश्चात्त्यांना समजले आहे, उद्या मांडी घालून बसण्याचे फायदे आपल्याला त्यांच्याकडून ऐकावे न लागोत !

* मुलाना पेन-पेन्सिल-वही लिखाणासाठी नाही:


या वयातील मुलांनी बाराखडी, अंकलेखन  इ. करणे अपेक्षित तर नाहीच किंबहुना शास्त्रीय दृष्टया ते पूर्ण चुकीचे आहे.  कारण या वयात त्यांच्या हाताची बोटे व मनगटे यांचे स्नायू  व सांधे यांची वाढ झालेली नसते.  अशावेळी लिखाणासारखे काम करताना त्यावर पडणारा अनावश्यक  व अति दाब त्यांच्या नैसार्गिक वाढीला अडथळा करतो.  शिवाय डोळे हे ज्ञानेंद्रिय व हात, बोटे हे कर्मेन्द्रिये यांच्या कामाचा मेळ (co-ordination)  ही व्यवस्थित होत नसतो. परिणामी लेखन-हस्ताक्षर बिघडते; सदोष होते.

    तात्पर्य, या वयातील मुलांना लिखाणाची जबरदस्ती करू नये; इतर शाळांमध्ये बरेच लेखन मुलांना शिकवले जाते म्हणून लिखाणाचा अट्टाहास करू नये.  त्यामुळे आमच्या शिक्षण देण्याच्या मूळ संकल्पनेलाच तडा जाईल.  आपल्या बालोद्यानमध्ये मुलांना भाषाकौशल्य, गणित, इंद्रिय-विज्ञान, संगीत, नृत्य इ.विषय आपण त्यांच्या नियोजित अभ्यासक्रमाप्रमाणे शिकवणारच आहोत, पण ते सर्व साधनांद्वारे, खेळाद्वारे. म्हणजे मनोरंजनातून त्यांचे शिक्षण होईल, जेणेकरून त्या त्या विषयातील मूळ संकल्पना (Basic concepts)  सुरूवातीपासूनच पक्के होतील. तेव्हा दोन वर्ष तरी मुलांच्या अभ्यासाविषयी, गृहपाठाविषयी निश्चिंत राहा आणि हा वाचलेला वेळ आपल्या मुलाबरोबर खेळण्यात, गप्पा मारण्याबालोद्यानातील रंगपंचमी त सत्कारणी लावा.  विश्वास ठेवा, असे केल्याने तुमचे मूल अभ्यासात मागे न राहाता पुढील प्राथमिक अभ्यासाची त्याची पूर्वतयारी इतकी सुंदर होईल की उत्तरोत्तर त्याच्या प्रगतीचा आलेख उंचावलेलाच दिसेल.  आपल्या विद्यामंदिर शाळेचे दरवर्षीचे दहावीचे  निकाल आणि अभ्यासेतर क्षेत्र जसे क्रीडा, गायन-नृत्य, विज्ञान इ.मधील मुलांचे नैपुण्य पाहिले तर आपली खात्री पटेल की, ही संस्था, शाळेचे  शिक्षक मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असतात.  मुलांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांची जडणघडण अशी केली जाते की भविष्यात तो एक सक्षम नागरिक बनेल, आणि त्याची पायाभरणी आपल्या बालोद्यानमध्येच केली जाते. कारण मुलाचे बालपण कसे गेले आहे, त्यावर त्याचे तरुणपणीचे व्यक्तिमत्त्व अवलंबून असते.

    ह्या सविस्तर लेखनाचा समारोप करताना सांगावेसे वाटते की, पालक म्हणून आपण आपल्या मुलांना दोन गोष्टी देऊ शकतो. ताठ उभे राहाण्यासाठी मूळ आणि आकाशात झेप घेण्यासाठी पंख !

Monday, July 19, 2010

कौतुक सोहळा २०१०

शालान्त परीक्षेचा निर्णय लागल्यावर दरवर्षीप्रमाणेच विद्या मंदिरच्या प्रांगणात उत्साहाचे वातावरण होते.

मराठी विभागाचा निर्णय ९१.४९% तर इंग्लिश विभागाचा निर्णय १००% लागला.

 

image image

         image      परुष्णी विलास मांजरेकर ९४%

        image      सूरज उदय पै ९३.३८%

यशस्वी विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा साजरा करताना बेस्ट ऑफ फाइव्हप्रमाणे गुण विचारात घ्यायचे की नाही हे नक्की होत नव्हते. अखेरीस मुलांच्या कौतुकासाठी उशीर तरी किती करायचा ह्या विचाराने पारंपारिक पद्धतीनुसार मिळालेले गुण विचारात घेण्यात आले.

clip_image002clip_image004 

imageimageimage

  ह्या सर्व गुणी विद्यार्थ्यांचं कौतुक २७ जून रोजी विद्या मंदिर शाळेच्या नव्या सभागृहात एका सुंदर सोहळ्यात करण्यात आलं. शाळेचेIMG_6464 (Large) हितचिंतक आणि आश्रयदाते एल अँड टी चे वित्तीय संचालक श्री. यशवंत देवस्थळी समारंभाच्या अध्यक्षस्थानी  होते. विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, सुप्रसिद्ध विमा गणिती, 

श्री. ज. स. साळुंखे, उपाध्यक्ष श्री. सुरेश ठाकूर, शाळा समितीचे अध्यक्ष श्री. दिलीप म्हांबरे, मुख्याध्यापक श्री. दि. का. वाघ सर आणि सौ. जागृती सावे मॅडम ह्यांच्या  सन्माननीय उपस्थितीत हा IMG_6588 (Large)सोहळा साजरा झाला. मंडळाचे सदस्य, हितचिंतक, पालक आणि विद्यार्थी समारंभासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ह्या प्रसंगी यशस्वी विद्यार्थ्यांची, त्यांच्या पालकांची तसेच शिक्ष कांची भाषणे झाली.  श्री. सुधीर देसाई सर आणि श्रीमती उषा शिमोगा मॅडम ह्यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

दरवर्षीप्रमाणेच मुलांच्या यशाचा आढावा घेणारी एक पुस्तिका वितरित करण्यात आली होती.  IMG_6449 (Large)

शाळेच्या नव्या इमारतीमध्ये हा सोहळा साजरा होत असल्याचा विशेष आनंद सर्वांनाच विशेषत: विद्यार्थ्यांना होता.