Friday, February 26, 2010

‘शिक्षक मित्र' पुरस्कार

अभिनंदन! अभिनंदन! अभिनंदन!




दि. 13 फेब्रुवारी 2010 या दिवशी शिक्षक संघटनेच्या शिक्षक स्नेह मेळाव्यानिमित्त होणा-या कार्यक्रमात आपल्या विद्यामंदिरचे माननीय मुख्याध्यापक 'श्री. दिगंबर के. वाघ' यांना 'शिक्षक मित्र' पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

Sunday, February 21, 2010

61st Republic Day

 

The Republic day was celebrated on a grand scale by all the sections of Vidya Prasarak Mandal on DSF ground. Hon.Shri Vinod Ghosalkar. MLA presided over the function. Hon. Shri. Anilkumar Karkhanis. Asst. Administrator, Indian Law Service
was the Chief Guest. Hon.Shri Bhalchandra. Mhatre, well known corporator was the guest of honour. Flag hoisting was followed by the parade and cultural programmes like patriotic songs, dances, lazim and speech.

ENLGHTENED MINDS Volume VII, the students’ magazine made by the students of English secondary Section and ‘AMRUTVANI ’ made by the students of ‘ Marathi Vangmay Mandal ‘ were inaugurated by the chief guest.

All the programmes including parade were appreciated. The students paid their highest tribute to our martyrs by their dance, ‘Ae mere watan ke logo’
OUR JUNIOUR ARTIST OR ‘MAZI MUMBAI’


MST. JAYESH. S. CHOUDHARY. STD III
(Marathi Primary Section)

AND




MISS. RUTUJA. R. MUNGEKAR. STD VIII B
(English Secondary section)

Have bagged consolation prize of Rs. 1000 in the Drawing Competition organised by Brihan Mumbai Mahanagarpalika,Education Department. The topic was ‘Mazi Mumbai.’ Around 40000 students all over Mumbai participated in the competition and 110 won the prizes. The students were felicitated by the Mayor of Mumbai Mrs. Shraddha Jadhav on 23rd January, 2010.

Tuesday, February 9, 2010

अफगाण मुक्तीचा आक्रोश

हिरॉइन ऑफ अफगाणिस्तान

मीना :- अफगाण मुक्तीचा आक्रोश

लेखिका : मेलडी अर्माचाईल्ड चेव्हिस

अनुवाद : शोभा चित्रे/दिलीप चित्रे राजहंस प्रकाशन

मूल्य - 150 रुपये, एकूण पृष्ठे 177


गेल्या तीन वर्षापासून सर्व पुस्तकप्रेमींसाठी वाचनीय पुस्तकाचे निवडक अभिप्राय याचे टिपण संग्रहित करण्याचे कार्य ग्रंथालयात चालू आहे. हे निवडक अभिप्राय ग्रंथालयातील फलकावर सादर केले जातात. आता हे सदर शाळेच्या ब्लॉगवर सुरू करण्याचे ठरले आहे
हे एक आत्मचरित्र आहे, पुस्तकाच्या मुखपृष्ठावरील चित्रावरूनच स्त्रियांच्या गळचेपीची कल्पना येते. अफगाण कायम अशांत देश. 1955 पासून स्वार्थी अफगाण राजकारण्यांनी रशियाशी संधान साधून रशियन सैन्य अफगाणात घुसविले, त्याला प्रतिकार करण्यासाठी अमेरिकेने आपले सैन्य पाठविले. या दोन महासत्तांच्या लढ्यात अफगाण जनता भरडली जात असताना तालिबानने दहशतवादी पाय पसरायला सुरुवात केली. हिंस्त्र तालिबानीच्या कृत्याने जनता होरपळून गेली. स्त्रियांच्या मुलभूत अधिकारावर, स्वातंत्र्यावर गदा आली. स्त्रियांच्या या दारुण परिस्थिती विरुद्‌ध लढा देण्यास उभी राहिली विशीतली एक तरुणी - मीना. तिने अफगाणमधील सुशिक्षित स्त्रियांना एकत्रित करुन रावा नावाची सामाजिक प्रबोधन करणारी संघटना स्थापन केली. या संघटनेचे भूमिगत कार्य सुरू केले. याचबरोबर राजकीय स्वातंत्र्याविषयी झेन संघटना निर्माण केली. बुध्दिजीवी पुरुषांनी भूमिगत कार्य सुरू केले. त्यात अनेक नेत्यांना तुरुंगात जावे लागे. जीवावर उदार होऊन कार्य चालू होते. यांतच मीनाचा विवाह डॉ. फैस बरोबर झाला तो ही माओवादी असून भूमिगत कार्य करणारा होता. त्यामुळे सतत दोघेही एकमेकांपासून दूरच असत. हे कार्य चालू असताना ओसामा - बिन - लादेनचा अफगाणमध्ये हस्तक्षेप झाला. त्यामुळे तेथील जनतेची न भूतो न भविष्यति अशी दुरवस्था दहशतवादी कारवायांमुळे झाली. या दहशतवादी हल्ल्यात वयाच्या 30 व्या वर्षी मीना मारली गेली.
मुक्तीची किंमत कशी चुकवावी लागते हे प्रभावीपणे जाणवून देणारे आणि प्रत्येकानेच वाचावे असे हे पुस्तक आहे.

- पल्लवी चं राजाध्यक्ष

Friday, February 5, 2010


Congratulation!!!
One more medal in V.PM’s account.


Students of VPM’s Vidya Mandir Dahisar (E) participated in Interschool Table Tennis Tournament organised by Balkan – ji- Bari Club, Santacruz (West).Among 15 teams the following V.P.M’s Junior Girls Team won Dilip Sampat Memorial Trophy. (Left to Right) Ms. Shruta V. Patnekar(V/A), Ms. Pooja M. Natu (VI/A), Ms. Dyuti S. Patki –Captain (V/A), Srushti S. Helangadi – IV/A.


Wednesday, February 3, 2010

माझी मुंबई

जेथे असते सगळ्यास उभारी
जेथून घेतो प्रत्येक भरारी
अशी ही माझी मुंबई

प्रांजली रविंद्र साठे

इयत्ता - 9वी/अ

मुंबई हा शब्द उच्चारला की प्रत्येकाच्या मनात जागतो
तो मराठी बाणा. मुंबईत राहणारा कोणीही असो पंजाबी, बंगाली, गुजराती पण त्या प्रत्येकालाच मुंबईत राहिल्याने समजते ती मराठी भाषामुंबईत अनेक धर्माचे, अनेक प्रांतातील लोक राहतात. मुंबईमध्ये विविधतेत एकता आहे.
मुंबई म्हणजे जिथे प्रत्येकालाच उडण्यासाठी पंख मिळतात. मुंबईत स्वातंत्र्यानंतर अनेक उद्योगधंदे प्रस्थापित झाले. स्वातंत्र्यानंतर मुंबईची आर्थिक प्रगती अतिशय झपाट्याने झालीमुंबईला भारताची आर्थिक राजधानी म्हणतात. मुंबईत ऐतिहासिक वास्तू, नैसर्गिक ठिकाणे, प्रेक्षणीय स्थळे, ग्रंथालये, महाविद्यालये इत्यादी वास्तू आहेत. प्रिन्स ऑफ वेल्स सारखी ब्रिटीशकालीन संग्रहालयेही आहेत. गेट वे ऑफ इंडियासारखी महत्त्वाची वास्तूदेखील मुंबईत आहे. त्यामुळे मुंबई हा शब्द उच्चारला की आपल्या डोळ्यासमोरून तरळून जाते ते मुंबईचे असे विविधांगी व्यक्तिमत्त्व !image, Wikipedia
याच विविधांगी व्यक्तिमत्त्व असलेल्या मुंबईला 1973 मध्ये,  2005ध्ये तसेच 26/11 रोजी ग्रहण लागले. अनेक निष्पाप लोकांना काळाने कवटाळले. आंतकवाद्यांचा नायनाट करण्यासाठी अनेक पोलिस प्राणपणाने लढले. अशी बिकट परिस्थिती ओढवलेली असतानादेखील मुंबई आपल्या पायांवर उभी राहिली.
मुंबई विकासाच्या दृष्टीने वाटचाल करतच आहे. मात्र प्रत्येक मुंबईकराच्या मनात एक खंत राहील ती म्हणजे मुंबई जरी भारताची आर्थिक राजधानी असली तरीही या मुंबईत आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणजे धारावी आहे. मुंबईच्या आर्थिक विकासात आणि सामाजिक विकासातही अडथळा आणणारे धारावी, मुंबईची वाढती लोकसंख्या, अस्वच्छता, भ्रष्टाचार, ढासळणारा पर्यावरणाचा असमतोल हे मुख्य घटक आहेत. या घटकांवर मात करण्यासाठी सर्व जनतेचा सहभाग आणि पाठिंबा असणे आवश्यक आहे.
यावरुन गोष्ट आठवते ती शेतकरी आणि त्याच्या चार मुलांची. शेतकरी आपल्या प्रत्येक मुलाला एक काठी देतो आणि त्याचे तुकडे करायला सांगतो. पहिल्यांदा काठीचे तुकडे होतात. दुस-यांदा होतात. मात्र जेव्हा काठ्यांचे चार तुकडे होतात तेव्हा मात्र ती काठी अजुन तोडू शकत नाही. शेवटी म्हणतात ना एकी हेच बळ त्याचप्रमाणे जेव्हा सारे मुंबईकर एकत्र येतील तेव्हाच आपल्यापुढील बिकट समस्या आपण सोडवू शकू.
यामुळे आपण सर्व मुंबईकर एकत्र येऊया आणि विकसनशील मुंबईला विकसित करूया. शिक्षण पूर्ण झाल्यावर परदेशी जाता मुंबईतच राहूया? अशी प्रतिज्ञा आपण केली पाहिजे.
मुंबईला शांघाय म्हणतात. कोणत्यातरी शहराची उपमा आपल्या मुंबईला दिलेली कोणालाच आवडणार नाही. यामुळे आपण मुंबईची स्वत:ची ओळख जगात निर्माण करूया. आपल्याला मिळालेल्या ऐतिहासिक वारशाचे जतन करुया. ‘कल करेसो आज, आज करेसो अबयाप्रमाणे आतापासूनच या कामाची सुरुवात करूया!!!

Tuesday, February 2, 2010

शाळा

श्रीमती नीता नरेंद्र म्हात्रे

(सहा.शिक्षिका) मराठी माध्यमिक विभाग


दहिसर मुंबईचे उपनगर आहे छान

नगरात या होती आहेत मोठ्या मनाची

शिक्षणप्रेमी, सेवाभावी

गुणसंपन्न माणसे महान

गावात शाळा नाही एकच ध्यास, एकच बोचणी

मना त्यांच्या लागून राहिली

बालगोपालांची शिकण्याची सोय

दहिसरवासीय भूमी-पुत्रांनी आपली भूमी

विनाअट विनाशर्त देऊन केली

उपनगरातील हिरे, माणिक मोत्यांनी

घेतला वसा शाळा स्थापनेचा

आपले तन, मन, धन अर्पून घाम गाळून

पदरमोड करुन या त्यागमूर्तीनी उभी केली

छोटीशी कौलारु शाळा

हळुहळु सोयी सुविधा निर्माण करत

उभी केली मोठी शाळा
clip_image002
दहिसरवासी गरीब, श्रीमंत सर्वच मातापित्यांची

त्यांच्या मुलाबाळांची चिंता दूर केली

प्रयत्नाला त्यांच्या घवघवीत यश शाळेतील

मुलांनी सर्वच क्षेत्रात प्रगति करुन दिले नि

त्यागमूर्तीना शाळा बांधल्याचे समाधान लाभले

यशाची ही परंपरा पुढेही बालमित्रांनो या सरस्वतीच्या

मंदिरात तुम्ही अविरत चालू ठेवा

दहिसर विद्यामंदिर शाळेत विद्याजर्नाचे ज्ञानदानाचे
पवित्र कार्य पवित्र भावनेने अखंड चालू ठेवा

कितीही मोठे झालात तरी शाळेला विसरु नका

शाळेची आठवण सदैव ठेवा

आपल्या दहिसर उपनगरातील विद्यामंदिर

शाळेचे नाव जगात मोठे करा

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषुकदाचन!

धन्यवाद!

Monday, February 1, 2010

The Annual Gathering 2009

The Annual Gathering of Marathi and English Secondary Section was held on 14th,15th and 16th,17th Dec. respectively at Dahisar Sports Foundation hall. Maximum students participated in various cultural programmes. After three years , we enjoyed this gathering. It was pleasant surprise for our children.


जाऊ कसा -कसा मी शाळेला


जाऊ कसा -कसा मी शाळेला
नेहमीच आई तुझी घाई ऽऽऽ सांगतीस शाळेला जायाला ऽऽऽ
जाऊ कसा-कसा मी शाळेला गं, मी नाही जाणार शाळेला.
मी नाही जाणार शाळेला गं, मी नाही जाणार शाळेला।।धृ।।
पहिली होती क्रमिक पुस्तके.
आता आली क्षमताधिष्ठित
लागतीय बुद्धी अजमावयाला गं, जाऊ कसा-कसा मी शाळेला
पहिले होते निबंध, गृहपाठ,
आता आले प्रकल्प प्रोजेक्ट,
लागत्यात वहया वागवायला गं, जाऊ कसा मी शाळेला
पहिले होते मैदानी खेळ
आता आले संगणक खेळ
खेळतात मुलं घरात गं जाऊ कसा-कसा मी शाळेला
पहिली मुलं गुरु प्रिय
आता झाली संगणक प्रिय,
नाही राहिली शिस्त मुलांना गं, गाऊ कसा - कसा मी शाळेला
पहिली संस्कृती आई-बाबांची,
आता झाली ममी-डॅडीची,
लागल्यात ममी- डॅडी बोलायला गं, जाऊ कसा-कसा शाळेला
पहिली शेती उत्तम शेती
आता झाली दुय्यम शेती
लागेल मजुरी करायला रं , जा बाळा आता तू शाळेला
मी जातो आई शाळेला गं. मी जातो आई शाळेला.
श्री. संदीप रा. घार्गे
(विद्या मंदिर दहिसर सहाय्यक शिक्षक मराठी मा. विभाग)